भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 238, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 238

रंगा येईं वो विठाई सांवळिये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरें ते मी केधवां देखेन ॥ २ ॥ रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती । अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥ ३ ॥ मन मारोनियां मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी¹ । भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥ ४ ॥ डाका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे । आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करीं तुकयासी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- डाका-मोठा नगारा, खुनी माणसाचा तपास करण्यासाठी कुंभार वाजवितो ते वाद्य; चौर-देवीला बसण्यासाठी पाटावर वस्त्र ठेवून त्यावर गहू, तांदूळ वगैरे धान्यानी काढलेल्या चतुष्कोनाची आकृती, पाचारिली-बोलाविली, मनसा-इच्छा, हाकारा-पुकारा, पुरस्कार-देणगी अर्थ :- या आसनावर चोक भरून कुळस्वामिनीला हाक मारली आहे. 'वैकुंठवासिनी विठाई ये धावत लौकर' अशा तीव्र हाकेने तिला जागृत केले आहे. १ विठाई, सावळिये आई, तू डोळस आहेस, माझ्या अंत करणाचा रंग ओळखून, भाव पाहून लौकर धावत ये. तुझे सुंदर श्रीमुख मी केव्हा पाहीन असे मला झाले आहे २ रजतमाची धूपारती व पंचप्राणाची आरती अशी सर्व तयारी करून मी आज तू धावत झटकन ये अशी विनवणी करीत आहे. ३ मनरूपी मेंढा एका घायासरसा मारून त्यातील आशा, इच्छा, तृष्णा याना काढून, सुटचा करून मी भक्तिभावाने नैवेद्य ताटात वाढलेला आहे आणि तुला हाक मारण्यासाठी पुकारा करीत आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, अनुहात नादाचा डाका-नगारा ऐकून या देवीने माझ्या अंगात संचार केलेला आहे आणि आपले देणगी घेऊन मला आरोग्यदान दिले आहे ५ विवरण - येथून पुढचे सात अभंग 'डाका' या नावाखाली असून ते सर्व रूपकात्मक असे आहेत. बहुजनात भक्तिमार्ग प्रिय होण्यासाठी जे लोकवाड्मयात्मक असे भारूड वाङ्मय साधुसंतानी निर्माण केले त्यातलाच एक प्रकार, 'डाका' म्हणजे मोठा नगारा देवाची आरती वगैरे सुरू असताना याच्या आवाजाने आसमंत दुमदुमून जातो या ठिकाणी गोंधळाच्या वेळी जसे प्रमुख व इतर देवदेवताना पाचारण केले जाते त्याचप्रमाणे येथेही महाराष्ट्राची कुलस्वामिनी, संतांची कुलदेवता वैकुंठवासिनी 'श्रीविठाई सावळिये' हीस पाचारण केले आहे आसन, चौर, धूपारती, आरती, मेंढ्याचा बळी, अनुहात गजर, पुरस्कार वगैरे शब्दातून देवीच्या उपासनेचे रूपक या अभंगात केलेले दिसून येईल ४१४ साच माझा देव्हारा । माफ ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनति सांगतों ॥ १ ॥ माझें दैवत हे रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं । भरले मग अंगीं । निवाड करी दोहोंचा ॥ २ ॥ तुझें आहे तुजपासी । परि तूं जागा चुकलासी । चिघडूनियां नासी । तुझ्या घरिच्यांनीं केली ॥ ३ ॥ आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवे । अंधकार व्हावे । नासु ठाव शोधावा ॥ ४ ॥ १ तुटी