भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 237, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 237

सार्थ तुकारामगाथा २०३ ४१० आणीक काय थोडीं । परि तीं फार खोटीं फुडीं ॥ १ ॥ सदा मोकळींच गुरें । होतो फजीत तीं पोरे ॥ २ ॥ सदा घालिती हुबरी । एक एकाचे न करी ॥ ३ ॥ तुका म्हणे घरीं । माय वेळोवेळा मारी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - फुडीं-वाईट अर्थ - आम्ही पोरे काय थोडी आहेत ? पण ती सारी खोटी व वाईट बुद्धीची आहेत १ ज्याच्या इंद्रियरूपी गाई नेहमी मोकळ्याच राहतात त्याची फार फजिती होते २ नेहमीच ते अहंब्रह्मची हुबरी घालतात ते एकमेक एकमेकांसारखे करीत नाहीत ३ मग असल्या पोरांना तुकाराम महाराज म्हणतात, त्याची आई घरी मार देत असते ४ ४११ बहुतांचे संगती । बहु पावलो फजिती ॥ १ ॥ बरें केले मदयाळें । मागिलाचे तोड वाळें ॥ २ ॥ माझा करितील तटा । लपती आलिया चोभाटा ॥ ३ ॥ तुका म्हणे काई । किती म्हणो बाप आई ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मदयाळें-श्रीकृष्णान अर्थ - अनेक लोकाच्या संगतीत आतापर्यंत मी चांगलाच फजीत पावलो होतो १ पण आता आपली सोबत देऊन या कृष्णाने फार चांगले केले मागच्या सर्व सोबत्याची तोडेच काळवडून टाकली २ हे सर्व सोबती माझ्या बाबतीतले गाऱ्हाणे सांगून तटा धरतात व स्वतःचे काही बाहेर आले की मग लपून बसतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांना, सोबत्याना आईबाप म्हणून मी किती जवळ करावे ? ४ ४१२ गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले सवगडे सहित गाई ॥ १ ॥ चोरिले नवनीत वाधविला गळा । जे तुम्हीं गोपाळा छंद केले ॥ २ ॥ मोहिल्या गोपिका पाव्याच्या छंदें । केली ते गोविंदें क्रीडा गाऊ ॥ ३ ॥ मायबापा लाड दाखविले कौतुक । तें या आणू सुख अंतरासी ॥ ४ ॥ निर्दाळिले दुष्ट भक्ता प्रतिपाळी । ऐसा म्हणो बळी आमुचा स्वामी ॥ ५ ॥ तुका म्हणे सरसी असो येणे बोधें । लागोनि सबधें सर्वकाळ ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - लीळा-क्रीडा अर्थ - आपले स्वतःचे सोबती व गाई यांचे तुम्ही रक्षण केले अशा अनंग कृत्यांचे व क्रीडांचे पवाडे मी गात राहीन १ तुम्ही गोकुळात लोणी चोरून आपला गळा वाढवून घेतलात श्रीकृष्णा, गोकुळात ज्याज्या क्रीडा केल्यात त्या सर्वांचे मी वर्णन करीन २ तुम्ही तुमच्या मुरलीच्या नादाने सर्व गोपींना वेधून टाकले त्याच्याबरोबर रासक्रीडा केलीत, त्याचे वर्णन आम्ही मोठ्या संतोषाने करू ३ तुम्ही तुमच्या आईबापांना जे लाडाने व कौतुकाने क्रीडाविश्व दाखविले ते सर्व सुख आम्ही आमच्या मनात साठवून ठेवू ४ भक्ताचा सांभाळ करण्यासाठी तुम्ही दुष्टाचा नाश केलात असा हा आमचा बलवान स्वामी आहे असे आम्ही म्हणू ५ तुकाराम महाराज म्हणतात, या आमच्या श्रीकृष्णबोधाचाच विजय नेहमी असावा त्याचाच सबंध सर्वकाळ आम्हास घडावा ६ डांका-अभंग ८ ४१३ चौक भरियेला आसनों पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनि ये धावोनी झडकरी ॥ १ ॥ १०