सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 236, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२०२ सार्थ तुकारामगाथा दोही' संधी² बाहे । धरुनि नेती माते पाहे । काय नासी केली आहे । घरामाजी येणें । तुका म्हणे मुख । त्याचें वाढों नेदी दुःख । बसवंती कवतुक । करुनी रंजविल्या ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाजें-रागाने, धमाने, काळोखाचे-अधाराच्या, पिलंगत-लपत छपत. अर्थ :- मोठ्या कष्टाने, त्रासाने गोकुळच्या गोळणी एकत्र झाल्या व म्हणू लागल्या, या ग, आज आपण त्याची राखण करू व सापडताच त्यास माजघरात कोंडून ठेवू. त्यानी मग दार उघडेच ठेविले व त्या पाचसातजणी एकत्र येऊन अंधाराच्या आड मौन धारण करून गप्प राहिल्या. १ मनात म्हणत राहिल्या, हा देव रोज घरी येऊन चोरी करून दूध लोणी खायला सोकावलाय किती सांगितले तरी त्याकडे लक्षच देत नाही आता बरा सापडणार आहे. याला काही कुणी आता जियत सोडणार नाही २ या गोळणींचा हा बेत जाणून श्रीहरी त्याच घरी चोरी करण्यासाठी आला. त्याने आपले सोबती बाहेर ठेविले व त्याने पूर्वच्या दाराने आत प्रवेश केला. त्या गोपींच्या भीतीने सभोवताली पाहात पाहात तो लपत छपत चालू लागला आणि त्याने समोर पाहिले तो त्यास लोणी दिसले. ३ मग त्याने शिक्यापरचे ते लोणी काढले. त्याने ते चाखून पाहिले. त्याला फार गोड लागले आणि त्यातील सर्वांत गोड लोणी होते ते त्याने एकमेकांच्या हातानी लांबविले आणि जिथे गोळणींनी चांगली राखण ठेवली होती तिथे त्याने दह्यादुधाचा चांगलाच नाश केला. मग त्या देवाने आपली चोरी समजावी म्हणून लोण्याचे हात जागोजागी पुसले ४ त्या सर्व गोळणींनी मग त्याचे हे मूळ रहस्य जाणले. त्याला घरात कोंडून धरून ठेविले आणि त्यांनी म्हटले, 'श्रीकृष्णा, असे आम्हास का सतावतोस ? आमच्या मागे का लागला आहेस ? यादृर्वा तू जे जे खाल्लेस तेहो मी परत आणवीन अशाने ' ५ मग त्यानी त्याला दोन्ही बाजूनी धरून त्याच्या आईपाशी नेले व म्हटले, 'या तुझ्या मुलाने आज काय घरात नासाडी केली आहे पाहा.' तुकाराम महाराज म्हणतात, पण त्या श्रीहरीच्या मुखाकडे पाहताच त्या गोळणींना दुःख वाटेनासे झाले. त्या यशोदा मातेनेही मुलाचेच कौतुक करून त्या गोपींचे रंजन केले ६ ४०९ आलियें धांवति धांवति भेट होईल म्हणून । तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥ १ ॥ आतां काय करूं सांग वो मज भेटेल कैसा । हरिलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥ २ ॥ लाधिला उशीर बहुतीं बहु ओढिती ओढा । सांभाळितां सांग असांग दुःख पावल्यें पीडा ॥ ३ ॥ जळो आतां संसार वो कईं शेवट पुरे । तुकयाच्या स्वामी गोपाळालागीं जीव झुरे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सीण-त्रास, सांग-पूर्ण, असाग-अमर्याद अर्थ :- या श्रीहरीची भेट होईल म्हणून मी धावतच आले. पण वेळ निघून गेल्यामुळे तो निघून गेला व मला मात्र त्रास झाला १ आता मी काय करू सांग ? तो श्रीकृष्ण मला कसा भेटेल ? त्या श्रीहरीसाठी माझा प्राण फुटून आता बाहेर जात आहे त्याची फार मोठी आशा मला आहे हो २ पुष्कळांची पुष्कळ ओढ असल्यामुळे याच्या भेटीस मात्र उशीर होतो इतर सगळे सांभाळताना हा न मिळाल्यास अमर्याद दुख होते. ३ हा संसारहो त्या श्रीहरीशिवाय असेल तर जळून जावा. याचा कधी शेवट होणार आहे काय ? तुकाराम महाराजांच्या स्वामीच्या साठी, गोपाळासाठी जीव मात्र माझा झुरतच चालला आहे. ४ १ देहिं संदे बाहे, २ सदी.