भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 235, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 235

सार्थ तुकारामगाथा २०१ सर्वजणी आता मला परक्याच आहात. जे काही मला शब्द बोलाल, नावे ठेवाल, ते सर्व खोटे होईल. २ याच्या भेटीमुळे माझे मन व माझे डोळे याच्याच स्वरूपात जडून राहिले आहेत. आता त्याच्यापासून वेगळे असण्याचा एक क्षणही मला आवडणार नाही. ३ मला कसलेही काम आता नकोसे झाले आहे. दुसऱ्याने काही बोललेले मला आवडणार नाही कारण या श्रीकृष्णाच्या कामबाणांनी मी विद्ध झालेली आहे. ४ आता या कृष्णाशिवाय जगणे म्हणजे त्या जिण्यास आग लागो. आता माझ्या मनाने याची संगत निश्चीत केली आहे ती काही मी सोडणार नाही. तेथून काही मागे परतून फिरणार नाही. ५ आता माझ्यासंबधी काही मोठ्या आशा धरल्या असतील तर त्या सोडून द्या. कारण मी आज तुकयाचा दाता स्वामी श्रीकृष्ण याच्या शय्येवर झोपलों आहे. ६ ४०७ हरिरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥ १ अवघ्या अंगें सर्वोत्तम । भोगी काम भोगता१ ॥ २ ॥ याचा वाच्यत्वासि न ये । कोठें काय करावें ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा ऐसा । देवपिशा उदारा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा .- हरिरता-हरीशी रममाण झालेल्या, लागवरी-गर्भधारणेच्या स्थितीत, देवपिशा- देवाविषयी वेड्या अर्थ :- श्रीहरीशी रममाण झालेल्या या गोपी फार चपळ असून त्याचा संग गर्भधारण करण्याच्या स्थितीत कधीच येत नाही. १ अनेक भोग जरी त्यांनी भोगले तरी त्या सर्वांगानी उत्तम व पवित्र राहतात. २ त्याचे संबंध, व त्याचे पावित्र्य याचे वर्णन वाणीने करता येण्यासारखे नाही. यासाठी काय करता येण्यासारखे आहे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे या उदार गोळणी देवाविषयी वेड्या झालेल्या आहेत. ४ ४०८ गोळणी आल्या याज२ । म्हणती या गे३ राखो आज । सांपडवुनी माज- । घरांत धरुनी कोंदू । उघडें४ कवाड उभ्या कान्होशाचे आट । साता पाँचा एक भीड मौनेंची ठेल्या ॥ १ ॥ नित्य सोंकवला नेदी । सांगो चित्त बोला । आतां सांपडतां याला कोण सोडी जीवें ॥ २ ॥ जाणोनियां हरी त्याच घरा आला चोरी । गडिया ठेविनि बाहेरी पूर्वद्वारें शिरे । त्यांच्या भयाभीत चाले पिलंगत भोंवतालें । पाहे तंव देखियेलें नवनीत पुढें ॥ ३ ॥ उतरोनि सिकें । पाहे चाखोनियां निकें । गोड तेंचि एका एकें । हातीं लांभवितो । जाणे राखती तयांसि । तेथें अधिकचि नासी । माग लावी हात पुसी । चोरी जाणावया ॥ ४ ॥ जाणोनियां नारी । मूळ वर्मद्वार धरी । माज५ कोडूनी भीतरी । घरांत६ घरीयेला । कां रे नागविसी । माझें मुळीं लागलासी । आणवीन तुजपासीं । मागें खादले तें ॥ ५ ॥ १ पुरता, २ बाजें, ३ रे, ४ उभे, ५ माजे, ६ घरात घरी एवला तु गाथा .२६