सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 234, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२०० सार्थ तुकारामगाथा
तुझ्याच संगतीची चट लागली होती. ३ बोरीचा वृक्ष समृद्ध झालेला पाहून मी त्याच्या समोर आले, पण काय झाले कुणास माहीत, हा श्रीहरी कुठे गेला ? ४ आता पुढे खुंट जाळपाच तेवढ्या दिसतात. बोरीच्या काटेरी जाळयाच दिसतात, फळे नाहीत. या हरीने ही काय मस्करी आरंभिली आहे कुणास माहीत ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, तो मग म्हणाली, 'चला आपण आल्या वाटेनेच जाऊन त्या श्रीहरीस पाहू या. म्हणजे पायास काटा लागणार नाही' ६
४०५ क्याला मज आपो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी ॥ १ ॥ बहु दिसीं जाली यासीं मज¹ भेटी । आतां वाटे तुटी न परावी ॥ २ ॥ कोवळें बोलतो मना आवडेतें । डोळियांचें पातें ढापवेना ॥ ३ ॥ आजि सकळांसी आलें चोलुनियां । कां नो पाठी वांयां पुरविली ॥ ४ ॥ तुमचें तें काय खोळंबलें काज । भल्या कां नो मज फोडा घरी ॥ ५ ॥ तुकयाचा धनी गोकुळनायक² । सरा कांहों एक बोलतो मी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- क्याला-कशाला, आपो-आई, सोकरा-छोकरा, मुलगा, ढापवेना-हालत नाही, चोलुनिया-चोरून, भल्या-बऱ्या, चांगल्या अर्थ :- आई, मला घरी चल, घरी चल असे का म्हणतेस ? मला का निवारतेस ? मी नंदाचा मुलगा श्रीकृष्ण याच्याशी खेळत आहे ग. १ फार दिवसांनी त्याची माझी भेट झाली आहे ना त्याची व माझी तुटी आता होऊ नये अशी इच्छा आहे. २ तो कृष्ण फारच मृदू बोलतो, त्याचे शब्द माझ्या मनास फारच आवडतात. त्याला पाहाताना माझ्या डोळ्याचे पाते हालत नाही ३ आजही सगळ्यांना चोरून मी त्याच्याकडे आली आहे. पण तुम्ही माझी पाठ विनाकारण का ग पुरविता ? ४ यात तुमचे काय काम खोळंबिले आहे ? तुम्ही चांगल्या दिसत असून मला का ग घरी फोडून ठेविता ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, माझा हा धनी गोकुळाचा नायक श्रीकृष्ण आहे, दूर व्हा. मी त्याच्याशी काही थोडे बोलणार आहे आता ६
४०६ आतां न यें मागें । मी आलें याच्या रागें । काय माझें जगें । कोपोनियां करावें ॥ १ ॥ कां गो कलित्यां कोल्हाल । तुम्ही भलत्याच सकल । येचाल ते बोल । झुठे होती बोलिले ॥ २ ॥ याचे भेटी माझें मन । स्वरूपीं ठाकले लोचन । वेगळें तें क्षण आतां होऊं नावरे ॥ ३ ॥ काज काम नको जालें । बीजें नावरे बोलिलें । यांचिया भेदिलें । कामबाणीं अंतर ॥ ४ ॥ या वेगळें होणें । आतां जळो तैसें जिणें । घेतलें तें मनें । आतां मागें न फिरे ॥ ५ ॥ आतां मोटी बार । माझी³ नका धरूं चार । तुकयाचा दातार । शेजे तो मी सुतलों⁴ ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- रागें-प्रीतीने, कलिथ्या-करता, कोल्हाल-गोंगाट, झुठे-खोटे, बीजें-दुसऱ्याने, मोटी-मोठी आशा, सुतलों-निजलो अर्थ :- मी काही आता मागे परतणार नाही मी आता या श्रीकृष्णाच्या मागेमागेच आले आहे. जगाने माझ्यामागे काय रागाने बोलायचे असेल ते बोलून घ्यावे. १ तुम्ही सर्वजणी आता गोंगाट का ग करता ? तुम्ही
१ मसी, २ वैकुंठनायक, ३ माजी, ४ सुतले