सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 233, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १९९ भावे गेले म्हणून न व्हावा वियोग । मनिचे आर्त जन्मांतरीं व्हावा सग । तो तो केले हे पाठमोरे जग । ऐसे काय जाणे हे तुझे रंग ॥ ३ ॥ काय करू या नागविले कामें । लागलें तयातव इतुके सोसावे । नाहीं तरी का नव्हती ठावीं वर्मे । परद्वारीं ऐसा हाकलीती प्रसिद्धनावे ॥ ४ ॥ काय किती सागावे तुझे गुण । न फुटे वाणी निष्ठुर ऐसा निर्गुण । आप पर न म्हणसी माय बहीण । सासूसुनास लावुनि याहासी भाडण ॥ ५ ॥ इतुकियावरी म्हणे वैकुंठींचा राणा । होऊन गेलें तें नये आणू मना । आता न करीं तैसे करी क्रिया आणा । भक्तवत्सल म्हणे तुकयाबंधु कान्हा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - नवाजिले-नावाजले, चांगले म्हटले, बचनुक-फसवणूक, सत्राजिताची कुमरी-सत्रा- जिताची कन्या सत्यभामा, फुसरी-कौशल्य, आर्त-इच्छा अर्थ - श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून त्यावर ती म्हणाली, 'हृषीकेशी, देवा, तुम्ही तुमच्या चांगुलपणास नावाजिले तरी, मग तुमची अशी फसवणूक का होते ? तुमच्या मनात हे सर्व सोंग असून तुम्ही त्याची बतावणी मात्र फार चांगली करता १ सत्राजिताची कन्या सत्यभामा मग पुन म्हणाली 'देवा, दूर व्हा आता तुम्ही, तुमच्या शब्दांचे हे कौशल्य मी चांगलेच जानते ना असेच लाघव करून आजवर मला फसविलत २ देवा, तुमचा वियोग कधीही न व्हावा म्हणून मी तुमच्याकडे आले जन्मोजन्मी तुमची संगत घडावी अशी माझ्या मनाची तीव्र इच्छा म्हणून तर जग पाठमोरे करून त्याची पर्वा न करता, तुमच्याकडे आले पण हे तुमचे असले ढंग मला काय माहीत ? ३ काय करू हो देवा ? माझ्या या कामी मनानेच मला फसविये हो म्हणून तर मला इतके सोसावे लागले नाही तर देवा, तुमच्या कृती काय मला माहीत नव्हत्या ? दुसऱ्याच्या स्त्रियाबद्दलची तुमची रहस्ये प्रसिद्धच आहेत ४ देवा, आणखी किती गुण तुमचे सागावेत ? तुमची निष्ठुरता व दुर्गुणता वर्णन करण्यास वाणीसुद्धा समर्थ नाही तुमच्या दृष्टीत आपले परक्याचे असे काही नाहीच आई, बहीण असाही फरक तुमच्या दृष्टीत नाही तुम्ही सासूसुनांचे भाडण लावून देता ५ सत्यभामा जेव्हा इतके निष्ठुरपणे बोलली तेव्हा तो वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण तिला म्हणाला, 'भामे, आता पूर्वी जे होऊन गेले ते गेले पुन ते काही मनात आणू नकोस मी पुन तसल्या गोष्टी करणार नाही अशी शपथ घेतो पाहा तुमच्यासाठी तुकयाबंधू कान्होबा म्हणतात, असा हा श्रीकृष्ण भक्तावर दया करणारा आहे ६ ४०४ कान्हो ऐकली रे ऐकली रे । तुजसवे चुकले¹ रे । भय वाटे वनीं² मज अबळा धाकली रे ॥ १ ॥ निघता घरीं आई बा वारी । तुजसवे का आलियें हरी ॥ २ ॥ लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलियें ॥ ३ ॥ पिकल्या चोरी जाले सामोरी । काय जाणे कोठें राहिला हरी ॥ ४ ॥ आड खुट जालिय जाळी । काय जाणो कान्हे माडिली रळी ॥ ५ ॥ तुका म्हणे जाउ आलिया वाटा । पाहो हरी पायीं न मोडे फाटा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - अबळा-अबला, बलहीन स्त्री, बा-वडील, वारी-नको म्हणत असताना, रळी- मस्करी, चट्टा अर्थ - श्रीकृष्णा, मी एकटीच आहे रे एकटी तुझ्या बरोबर येऊन चुकले १ आता या वनात मला भय वाटते रे मी एक लहान, बलहीन अशी स्त्री आहे रे, घरून निघताना मला आई, वडील नको म्हणत असताना मी तुझ्या बरोबर का आले कुणास माहीत ? २ वाटेने लोक सांगत होते की, तू खोटा आहेस, लबाड आहेस पण मला १ चुकली, २ जनी,