सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 232, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१९८ सार्थ तुकारामगाथा विवरण - सत्यभामा ही श्रीकृष्णाची एक पट्टराणी तिने एक नाजूक तक्रार या अभंगात केलेली आहे श्रीकृष्णभेटीसाठी आसुसलेल्या चित्ताने ती रात्री वाट पाहात असताना मध्यरात्र उलटून गेली तरी श्रीकृष्ण आला नाही म्हणून ती रागवली आहे श्रीकृष्ण इतर नायिकाच्या बहुधा रुक्मिणीच्या मंदिरातच रमला असावा अशा शंकेने ती व्यथित होऊन त्याला रागावून बोलत आहे याच वेळी नारदास देण्याच्या तुलादानाचे समयी सर्व दागिन्यानी भरलेली पण समतोल न झालेली व रुक्मिणीच्या तुलसीपत्राने समतोल झालेली तुला ध्यानात येताच ती रुष्टी झालेली आहे या आपल्या विटंबनेची खंत तीव्र वेदना तिच्या मनात होती नारदानी स्वर्गांतून आणलेली पारिजातपुष्पे कृष्णास दिली ती त्याने सत्यभामेशिवाय इतर स्त्रियाना दिली नाही कृत्याचा राग सत्यभामेस आला तिच्या रागाची अशी निमित्ते वारंवार उमटलेली दिसतात त्यातील एक बारीक निमित्त बुवांनी या अभंगात साकार केले आहे येथून पुढचे काही अभंग 'तुकयाबंधू' या नावाने मुद्रांकित झाले आहेत याचा अर्थ तुकारामबंधू म्हणत आहे किंवा तुकारामबंधू सांगत आहे असा घेता येतो तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा नावाचे होते त्यांनीही काही अभंग केले असावेत या कान्होबाचा उल्लेखही पुढे काही अभंगातून आहे हा कान्होबा शब्द श्रीकृष्णवाचक दितो व तुकोबाच्या बंधूचा उल्लेख म्हणून किती हे सांगणे कठिण आहे ४०२ तव तो हरि म्हणे वो निजगाने वो । लाइ नीच का देसीस डोहणे वो । मजपें दुजें आलें ते देव जाणे वो । शब्द फाय हे बोलसी ते उणे वो ॥ १ ॥ पाहा मनीं विचारूनी आधि वो । साडूनि देईं¹ भ्रांति करों स्थिर बुद्धि वो । तट केले हे माझें तुझें उपाधीं वो । उघडी डोळे आजुनि तरी घरी शुद्धि वो ॥ २ ॥ कोठें तरी दुनियांत वर्तले वो । स्त्रियानों भ्रतारा दाना दिले वो । फंसा भला मी नव्हे ते सोसिंले वो । रुसतेसी² तू उफराटें नवल जाले वो ॥ ३ ॥ काय सांग म्या दैन्य केली कैसी वो । तुझ्या गर्वं आणविले हनुमंतासि वो । कष्टी केले मज गरुडा भीमकीसि वो । तुकयाबंधू म्हणे खरे खोटें नव्हे यासि वो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लाइ- अति, डोहणे-टोमणे, मजपें-मजकड तट-बडबड तटा अर्थ - सत्यभामेचे वरील भाषण ऐकून तो श्रीकृष्ण मग तिला म्हणाला, प्रिये असे अति वाईट बोलून मला टोमणे का देतेस ? माझ्याकडे दुसरे कुणी आले असेल तर एक देवच जाणे उगाच उणेदुणे शब्द का बोलतेस मला ? १ तू मनात तुझा विचार करुन पाहा ना सर्व भ्रम सोडून तुझी बुद्धी स्थिर करुन पाहा आजपर्यंत तुझे माझे अशी बडबड करुन जो तटा केलास त्याचा काय उपयोग ? नीट डोळे उघडून अजून तरी शुद्धीवर ये ना २ असे कुठे तरी जगात घडले आहे का ? स्त्रियांनी आपल्या पतीचे दान दिल्याचे कुठे कधी घडले का ? पण ती गोष्ट तू केलीस ; व मी ती सोसली असा पाहा मी किती चांगला आहे असे सांगून तूच रुसतेस माझ्यावरच हा उलटाच न्याय म्हणायचा नवलच म्हणायचे ३ सांग बरे, मी काय तुझी विटंबना केली ? तुझा गर्व दूर व्हावा म्हणून मी हनुमंताला आणले यावेळी हनुमंत व गरुड यांच्यात भांडण होऊन गरुडास किती त्रास झाला बरे मलाही राम होण्यासाठी, रुक्मिणीस सीता होण्यासाठी किती त्रास झाला ? तुकयाबंधू म्हणत आहे, खरेच खऱ्याखोट्याचा निवाडाच कुणी करीत नाही ४ ४०३ तव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो। नवाजिले³ तुम्हीं म्हणा आपणासि वो । तरी कां वचनुक सुमनासि वो । नट नाटय बरे सपादू जाणतोसि⁴ वो ॥ १ ॥ सर हो परता परता⁵ हो आता हरी । म्हणे सनाजिताची कुमरी । जाणतें मी या शब्दाच्या कुसरी। ऐसेच करून ठकविले आजिवरी ॥ २ ॥ १ दहेभ्रांती, २ रमसी ते ३ नावाजीत होता आपणासी ४ जाणसी परी, ५ आता हरी आता हो,