भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 231, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 231

सार्थ तुकारामगाथा १९७ अर्थ:- आकाशासारखी निळसर अशी ज्याची शोभा आहे ती पाहावयास मी गेले होते तेव्हा त्याची शोभा फारच चांगली दिसली १ तो माझ्या मनात बसला आहे म्हणून कोणी लावू नका. २ माझ्या जीवाला तो स्वतःच्या गोपापेक्षा आवडतो. माझ्यापासून तो एक क्षणभरही वेगळा होत नाही ३ तुकयादासी ही त्याच्या स्वामीसारखी, विश्वंभरासारखीच बनून गेली आहे. ४ ४०० कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥ १ ॥ देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ २ ॥ आपुलियाचा विसर भोळा । गोविंद फळा कौतुकें ॥ ३ ॥ तुका म्हणे हांसे जन । नाही कान ते ठायी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा.- भुलली-विसरली, फळा-कला अर्थ :- कुणी एक गवळण श्रीकृष्णाच्या नादात इतकी रमून गेली, स्वतःस इतके विसरली की, डोक्यावरील ओझे आठवून 'गोरस घ्या, दही दूध घ्या' असे म्हणायच्या ऐवजी ती 'श्रीहरी घ्या' असेच म्हणू लागली १ तिने जो डोळ्यांनी पाहिला तोच तिच्या मनात स्थिर झाला असून तो तिच्या तोंडूनही उच्चारला जात आहे. २ तिला स्वतःला आपला विसर पडला व ती गोविंदाच्या फलकौतुकात रममाण झाली ३ तुकाराम महाराज म्हणतात, या तिच्या कृत्यास लोक हसतात तरी ती त्यांच्याकडे लक्ष देत नाही त्यांच्याकडे कानच देत नाही ४ ४०१ करुनी आइत सत्यभामा मंदिरिं रे । वाट पाहे टळोनि गेली रात्री रे । न येचि देव येतील कामलहरी रे । पडिलो बुद्दिचिती तंव तो कवाड टिमकारी रे ॥ १ ॥ सर गा परता कळला तुझा भाव रे । कार्या पुरते हे दाविसी लाघव रे । बोलतोसी ते अवघो तुझी माय रे । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥ २ ॥ मीच वेडी तुजला बोल नाहीं रे । दानावेळे विटंबणा जाली काय रे । मागुती ब्रम्हासि भेटी दिली तंई रे । विश्वास तो तुझ्या बोला आझुनि १तरी रे ॥ ३ ॥ भ्रम होता तो अवघा कळों आला रे । मानवत होतें मी भला भला रे । नटा क्रिया नाहीं मी तुझ्या बोला रे । तुकयाबंधु स्वामी कानडचा कौसल्या रे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आइत-सर्व सामग्रीची तयारी, सत्यभामा-श्रीकृष्णपत्नी, कवाड-दार, टिमकारी-धक्का दिला, माय-गोटी माया, कानडा-न कळण्यासारखा अर्थ - एके दिवशी श्रीकृष्णपत्नी सत्यभामेने रात्री आपल्या मंदिरात श्रीकृष्णभेटीसाठी सर्व प्रकारचा साज- शृंगार करून तयारी केली व सबंध रात्र संपून गेली तरी ती कृष्णाची वाट पाहात बसली परंतु श्रीकृष्ण काही आले नाहीत तिच्या अंगच्या कामलहरी वाढत राहिल्या ती अशा प्रकारे चिंतामग्न असतानाच दारावर कुणी तरी धक्का दिला १ तेव्हा रागावून सत्यभामा त्या श्रीकृष्णास म्हणाली, 'दूर सरा तुम्ही, तुमची मजविषयी प्रीती आहे ती समजली मला. केवळ कार्य साधण्यासाठी तुम्ही हे गोडीचे कौतुक दाखविता. पण तुम्ही जे बोलता ते सर्व खोटेच असते जाणूनबुजून जनु माझी थट्टा करण्यासाठीच तुम्ही उजाडता उजाडता आलात २ पण याचा बोल तुम्हास देऊन काय उपयोग ? मी भोळी वेडी ना ! नारदास मी तुमचे दान दिले तेव्हा माझी विटंबना झाली ती पुरी वाटली नाही. पुनः ब्रह्मास भेट दिली त्यावेळीही अशीच विटंबना माझी झाली असे असून अजूनही मी तुमच्यावर विश्वास ठेवीत आहे हेच माझे चुकले ना. ३ माझा सर्व भ्रम होता तो आता समजला, दूर झाला मी तुम्हास भला मानून चालत होते. पण तुमची क्रिया तुमच्या बोलण्याप्रमाणे नाही असे मला कळून आल्यामुळे तुम्ही नटाप्रमाणेच मला वाटता. तुकया बंधूचा हा स्वामी सहजासहजी न समजणारा असून मोठा खुशाल आहे. ४ १ नाही

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 231, कुल 611 में से · BharatKosha