भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 230, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 230

१९६ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा - मिस-निमित्त, चिरें-कपडे, तटस्थ-तटस्थ, दंतधावन-दात घासणे अर्थ - या श्रीकृष्णाबरोबर गाई व गोपाळ हे यमुनेचे पाणी पिण्यासाठी नदीच्या तीरावर सर्व मिळून येतात व चौगुणांचा चेंडू वाळवंटात खेळू लागतात अशा या श्रीकृष्णास चला आपण पाहू या असे त्या गोपी परस्परांत म्हणू लागल्या १ अशा या गोपी त्या भगवंताविषयो कामातुर झाल्या असून त्यांचे चित्त विव्हळ झालेले असते हरीला पाहण्यासाठीच त्या पाणी भरण्याचे निमित्त करून बारा सोळा गोपिका यमुनेच्या तीरावर येतात २ पण त्यांचे लक्ष जर श्रीकृष्णमूर्तीकडेच एकसारखे लागलेले असल्याने त्या कपडे किंवा धोळधा धुण्याचे विसरूनच जात आपले कूळ काय, आपली जात कोणती याची आठवणही त्यांना श्रीकृष्णवेधात उरत नसे त्या सर्व गोपिकांच्या डोळ्याची पाती श्रीकृष्णदर्शनाने तटस्थ, स्थिर बनली होती ३ कुणी गोपिका दात घासत होत्या, त्यांचा हात मुखा- तच राहिला तिये माना यांचे वाजत होती तो आवाज लोकांच्या गलबल्यामुळे कमी वाटत होता परंतु पुरुषाचा स्वामी हा श्रीकृष्ण सर्वांचे मनोरथ पूर्ण करील या सर्व गोपी त्याचे वेणुगीत ऐकण्यात तल्लीन झाल्या होत्या ४ ३९७ कोठें मी तुझा धरू गेले संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥ १ ॥ सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥ २ ॥ रूपाच्या लावण्यें नेली चित्तवृत्ती । न देखें भोवतीं मी ते माझी ॥ ३ ॥ तुकयाचा स्वामी माझे जीवीं च बैसला । बोलोंच अबोला करूनिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संग-सोबत, गोवळा-गोपाळा अर्थ - या कृष्णाची संगत कुठून मी धरली असे मला झाले आहे त्यामुळे सारे जग माझ्या पाठीमागे लागले आहे १ अरे अवगुणी गोपाळा, दूर सर ना तू येथे कसलेही खोटे चाळे करू नकोस २ तुझ्या रूपलावण्याच्या नेध मला लागल्याने माझी चित्तवृत्ती तुझ्या स्वरूपीं जडली आहे रे तिला मी व माझे भाव दिसेनाने झाले आहेत ३ तुकाराम महाराजांचा हा स्वामी आता त्याच्या जीवात जाऊन स्थिर झाला आहे त्याच्या बोलण्यातच अबोला आहे ४ ३९८ गोड लागे परी सांगताचि न ये । बैसें मिठी सये आवडीची ॥ १ ॥ वेधलें वो येणे श्रीरंगरंगें । मीमाजी १ अगें हारपलीं ॥ २ ॥ परतेचि ना दृष्टी बैसली ते ठायीं । बिसावोनि पायीं ठेले मन ॥ ३ ॥ तुकयाच्या स्वामीसवे झाली भेटी । तेंव्हा झाली तुटी मागिल्याची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सये-सखे, आवडीची-प्रेमाची, वेधले-हरून घेतले अर्थ - या श्रीकृष्णाची संगत इतकी गोड आहे की ती किती गोड आहे हे सांगताच येत नाही सखे, प्रीतीची मिठी त्याच्या पायाशीच मी मारली आहे १ या श्रीरंगाने माझे चित्त हरून घेतले आहे माझी सर्व अंगे विकारा- सहित माझ्यातच सामावली आहेत २ त्याच्या ठिकाणी जी एकदा दृष्टी स्थिर झाली ती पुन परत वळतच नाही त्याच्याच पायाशी मन विसावले आहे ३ तुकयाच्या या स्वामीशी एकदा जीवाची भेट झाल्यानंतर मग पूर्वीचा संबंध सर्व सुटतो ४ ३९९ पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥ १ ॥ बैसला तो माझे मनीं । नका कोणी लाजवू ॥ २ ॥ जीवा आवडे जीवाहुनि । नव्हे क्षण वेगळा ॥ ३ ॥ जाले विश्वंभरा ऐसी । तुकया दासी स्वामीची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नभा-आभाळात १ मी हे माझी.

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 230, कुल 611 में से · BharatKosha