सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 229, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १९५ कात्यायिनी देवीची आराधना करून त्या श्रीकृष्णस्वरूपांत दंग झाल्या होत्या एके दिवशीं श्रीकृष्णचरित्राचे गुणगान करीतच आपलीं वस्त्रे कांठावर ठेवून त्या पाण्यांत विहार करू लागल्या श्रीकृष्णाने त्यांची वस्त्रे दूर करून ती कदंब वृक्षावर नेऊन ठेविली गोपी त्याला वस्त्रे देण्याबद्दल गळघाडतबमा पाण्यात राहून विनवू लागल्या 'आपण थंडीने कांकडत आहात, आमची वस्त्रे द ना' अशी त्यांनी परोपरीने त्यांना विनंती केली त्याने सांगितले की, 'नग्न होऊन तुम्ही या यमुनंत स्नान करीत हाता त्यामुळे तुमच्या व्रताचा भंग झाला आह आता मला हात जोडून नमस्कार करा म्हणजे ता दोष दूर होईल' मग गोपी बाहेर आल्या व त्यांनी लज्जेचा भान दूर राखून श्रीकृष्णास वदन वेल व श्रीकृष्णाने त्यांनी वस्त्रे त्यांना परत दिली सर्व भावनांचा त्याग करूनच ईश्वरात शरण जावे लागते असे या कथेने तात्पर्य मागण्यात येते त्या मुग्ध युवतींना कृष्णाविषयी आणखीन प्रीती वाटू लागली घरी जाण्याचेही भान त्यांना उरले नाही व त्यांना त्यांच्या मनासारखेच घडेल असे आश्वासन देऊन त्यांना गोकुळात परत जाण्याम श्रीकृष्णान प्रवृत्त केले मग अंतर्यामी श्रीकृष्णाचे स्मरण करीतच त्या गाकुळात परत फिरल्या ३९५ धरिला पालव न सोडी माझा येणे। काहीं करिता या नदाचिया कान्हे। एकली न येतें मी ऐसे काय जाणे। कीठें भरले अवघड या राणे रे ॥ १ ॥ सोडों पालव जाऊ दे मज हरी। वेळ लागला रे खोपतील घरों। सासू दारुण सासरा आहे भारी। तुज मज सागता नाहीं उरी रे ॥ २ ॥ सह्या¹ वशिया होत्या मजपाशीं। तुज फावले रे फाकता तपासी। होतें अंतर तर सापडते फेंसी। एकाएकी अगी जडलासी रे ॥ ३ ॥ केंसी भागली हे करिता उत्तर। शमित मावळल्या आसुडिता कर। स्वामी तुकयाचा भोगिता चतुर। भोग भोगी त्याचा राखे लोकाचार वो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पालव-पदर, वशिया-प्रिय फाकता-दूर होताच अर्थ - या कृष्णाने माझा पदर धरला आहे तो काही केल्याने आता सोडायला तयार नाही असे हा नदाचा कान्हा काही करील हे मला ठाऊक असते, तर मी येथे एकटी आलेच नसते या भारी अशा अवघड रानात कधी येऊन पडले आहे कुणास माहीत ? १ श्रीहरी, तू माझा पदर सोड ना मला घरी जाऊ दे घरी जायला मला वेळ लागला तर सर्वजण माझ्यावर रागावतील ना माझ्या घरी माझे सासुसासरे फार रागीट आहेत त्याना जर हे समजले तर ते तुझी माझी काही भीड उरू देतील असे नाही २ माझ्या प्रिय मैत्रिणी माझ्याजवळ होत्या त्या दूर होताच तुला माझी खोडी काढण्याचे फावले रे मी तुझ्यापासून दूर असते तर तुला सापडलेच नसते पण तू माझ्या अगदी निकटच अगशी होतारा ३ याप्रमाणे तिने श्रीकृष्णास म्हटल्यावर ती श्रमाने थकून गेली कारण त्या श्रीकृष्णाने तिचा हात हिसकल्यामुळेच ती फारच फष्टी झाली होती तुकाराम महाराजाचा हा स्वामी असे भोग घेण्यात एवढा चतुर आहे की तो ज्यांच्याशी भोग भोगतो त्याचा लौकिक आचार तो नीट सांभाळीत असतो ४ ३९६ गाई गोपाळ यमुनेचे तटीं। येती पाणिया मिळोनि जगजेटी। चेंडू चौगुणा खेळतो वाळवटीं। चला चला म्हणती पाहू दृष्टी वो ॥ १ ॥ ऐसा गोपिका त्या कामातुरा नारी। चित्त विव्हळ देखावया हरी। मिस पाण्याचे करितील घरी। बारा सोळा मिळोनि परस्परी वो ॥ २ ॥ चिरें चोळिया त्या धुता विसरती। ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती। कोणा नाठवे कोण कुळ याती। जालों तटस्थ² सकळ नेत्रपाती वो ॥ ३ ॥ दंतधावनाचा मुखामाजी हात। वाद्ये वाजती नाइके जनमात। करी श्रवण कृष्णवेणुगीत। स्वामी तुकयाचा पुरवोल मनोरथ वो ॥ ४ ॥ १ सखिया वशिया होतिया, २ तटस्त