भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 228, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 228

१९४ सार्थ तुकारामगाथा

केला सकळीं हाकारा तंव आलिया बाहेरा । आतां म्हणतील घरां जावे केंशा परी ॥ ५ ॥ तंव हासे वनमाळी वरी पाहोनी सकळी । लाजे रिघालिया जळीं मागें पुढें हात । लाज राखावी गोपाळा आम्हांजनौंची सकळां । काय मागसी ये वेळा देऊं गुळवाटी ॥ ६ ॥ जोडोनियां कर या गे सकळी समोर । वांयां न बोलावे फार वडबड कांहीं । भातुकें भूषण नाहीं चाड नेघें धन । करा एक चित्त मन या गे मजपाशीं ॥ ७ ॥ एक एकीकडे पाहे लाज सांडूनियां राहे । म्हणे चला आतां सये जाऊं तयापाशीं । जोडोनियां हात कँशा राहिल्या निवात । तुका म्हणे केली मात लाज राखिली तयांची ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा :- विंदान-कौशल्य, ख्याल-खेळ, विसंगत-वाकबूल, साउली-वस्त्रे, बुधी-तोशबदन घेण्याचे वस्त्र, हाकारा-गोंगाट, भातुके-खाऊ वगैरे, चाड-हौस, किमत अर्थ - खेळता खेळता श्रीकृष्ण एके दिवशी यमुनेच्या तीरावर येऊन पोहचला तेव्हा त्याने नग्न अवस्थेत न्हात असलेल्या स्त्रिया पाहिल्या त्यावेळी त्याने तेथे मौजेची क्रीडा सुरु केली आपले अंग दिसू न देता, मान खाली घालून त्याने यमतीचा खेळ केला. १ या श्रीकृष्णाने असा खेळ केला की काही विचारू नका. पाया पडल्याखेरीज त्यांची वस्त्रे त्याने दिली नाहीत २ कुणाच्या साड्या, कुणाची पातळे, कुणाच्या वेणीतले गोंडे, कुणाच्या चोळ्या, कुणाचे तोंडावर घेण्याचे वस्त्र, अशी सर्व वस्त्रे घेऊन तो पळाला व शेजारच्या कदबाच्या झाडावर चढून हातात फांदी धरून समोर नग्न स्त्रियाकडे त्याने आपली दृष्टी वळविली गोपींची ती धादल पाहून झाडाच्या पानाच्या आड आपले मुख लपवून तो खदखदून हसू लागला ३ आनंदाच्या कल्लोळात रममाण होऊन त्या गोपी पाण्यात खेळत होत्या कित्येक जणी मोठ्या चपळाईने पाण्यात उड्या मारीत होत्या दुसऱ्या काहीजणी आपापसात स्पर्धा लावून सुईर्शोप्रमाणे पाण्यात डुबून लांबवर निघत होत्या कित्येकजणी नाना प्रकारचे खेळ शरीत होत्या ४ मग काहीजणी बाहेर काठावर येऊन आपापली लुगडी पाहू लागल्या, तो ती वस्त्रे तेथे त्यांना दिसेनात मग त्या एकमेकींस म्हणत राहिल्या, 'या ठिकाणी आपली लुगडी दिसत नाहीत कुणी चोराने नेली काय ? केव्हा नेली ?' मग सगळ्यांनी एकत्र गोंगाट करून म्हटले, आता घरी तरी जावे कसे ? ५ इतक्यात वृक्षावरील श्रीकृष्ण हसला, तेव्हा त्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले मग त्या लाजल्या व मागेपुढे हात धरून त्या पुन: पाण्यात शिरल्या व श्रीकृष्णास म्हणू लागल्या, 'कृष्णा, आमची सर्वांची लाज राख, काय मागशील ती गूळघाटी आम्ही तुला देऊ ' ६ त्यावर कृष्ण म्हणाला, 'तुम्ही सर्वजणी हात जोडून माझ्यासामोर यावे, व्यर्थ बडबड उगाच करू नका मला खाऊची किंवा धनाची मुळीच गरज नाही एकचित्त मन करुन मला वंदन करा म्हणजे झाले' ७ मग त्या गोपी एकमेकींकडे पाहू लागल्या व आपण सारी लाज सोडून चला त्या कृष्णास जाऊन वदू या, असे म्हणत राहिल्या मग त्यानी हात जोडून, निवान्त राहून त्या श्रीकृष्णाची प्रार्थना केली तुकाराम महाराज म्हणतात, अशा योगाने श्रीकृष्णाने त्या सर्व गोपींची लाज राखली ८ विवरण - श्रीकृष्णचरित्रातील हा एक प्रसंग भागवत, ब्रह्मवैवर्त पुराणातून आलेला आहे श्रीकृष्णासारखा पती आपणाम मिळावा म्हणून गोकुळातील कुमारीनी हेमतऋतूत कात्यायिनी देवीचे व्रत केले भद्रकाली नावाच्या