सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 242, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२०८ सार्थ तुकारामगाथा अर्थ - ही आमंची प्रमुख देवी पंढरपूर शहरात भीमेच्या काठावर नांदत असल्याने तेथरावी इतर क्षुद्र दैवते हिच्यापुढे थरथर कापत असतात १ आता या देवीच्या नावाने हजार नावांनी एकदम हाक मारा मग तो तुमचा अगसंग करून या इतर क्षुद्र दैवताना दूर करेल २ इतर दैवताची अशीच बाधा सीतामाईस झालेली असल्यामुळे तिला अशोकवनात बंदिस्त व्हावे लागले पण या वेळीही जगन्माता केस मोकळे सोडून तिच्या साह्यास धावली व तिला हिनेच मुक्त केले त्या हिरण्यकशिपु नावाच्या महिषासुराने थोर भक्त प्रल्हादाला त्रास देण्यास सुरुवात केली मग हीच माता एकदम दात ओठ खात नृसिंहाच्या रूपाने आली व या दैत्याच्या तिन नाश केला ४ ज्या कसाने वसुदेवाची सात मुले निर्दयपणे मारिली होती त्याचा नाश करण्यासाठी हीच कृष्णरूपाने वसुदेवाचे दुख दूर करण्यास सिद्ध झाली ५ सर्व सामर्थ्यांनी सिद्ध असलेले पाडववीर या क्षुद्र दैवताच्या कोपानी त्रस्त झाले व वनवासात भटकू लागले, पण या श्रेष्ठ देवीनेच त्याचे रक्षण करून अगसंग येऊन त्याची लाज राखली ६ जेथे श्व हिच्या नामाचे चिंतन सुरू असते तेथे तेथे ही जाऊन मदत करते रक्षण करते अशा वेळी ही देवी कृपाचा कमोपणा न पाहता फक्त भावभक्तीकडे लक्ष देते ७ तुकाराम महाराज म्हणतात, ही कुळीची देवता आम्हास मातेप्रमाण आहे ही एकदा प्रसन्न झाल्यावर मग प्रत्यक्ष यमाचे किंवा यमदूताचे भय कसाल ? ८ ४२० देवी देव जाला भोग सरला¹ यावरी । सांगाया दुसरी ऐसी² नाही उरली ॥ १ ॥ हरिनामे देवनाम तुम्ही गाऊनियां जागा । पैठवणी मागा नका ठेवू लिंगाड ॥ २ ॥ शेवटीं सुताळी वरवी वाजवावी डाक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥ ३ ॥ गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी । तुका म्हणे बरी आजि कोडीं उगविलीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पैठवणी-विदागी पाठवणी, लिंगाड-खटपट लचाट सुताली-चांगल्या ताळावर अर्थ - देव झाला देवी झाली सर्व प्रारब्ध कर्मानुसार भोगावयाचे भोगही संपले आता काही दुसरे करावचे आहे असे सांगायलाही काही उरले नाही १ आता तुम्ही या देवाचे हरीचे नाव घेऊन जागे राहा व त्यासाठी आपली नेहमीची कृपेची विदागी मागा, उगाच मागे खटपट ठेवू नका २ आता या शब्दाच्या प्रसंगात चांगल्या तालावर, सुरावर डाक वाजवा, व सरतेशेवटी संपल्यावर एक तालाने शेवटचा मेळ साधा ३ आता सर्व मानकर्याचे मान देऊन झाल आहेत हा देव्हारा आता गुंडाळून ठेवा तुकाराम महाराज म्हणतात, कारण आता सर्व संकटाचा परिहार झाला आहे सर्व रहस्ये उलगडली गेली आहेत ४ ४२१ झाली झडपणी खडतर देवता । सचरली आतां³ निघो नये ॥ १ ॥ मज उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ २ ॥ नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी काही आता ॥ ३ ॥ तुका म्हणे कळो आले वर्तमान । माझें तो बचन आच्छादले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - झडपणी-बाधा अर्थ - अरे मला कसली तरी बाधा झाली आहे कसल्या तरी खडतर देवतेने झपाटले आहे आता ती जी अंगात झिरली आहे ती काही बाहेर निघत नाही १ आता मला लोकर काही तरी उपचार करा आता मला काही ही १ सरले २ उरी ३ चित्ता रिघो नये