भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 243, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 243

सार्थ तुकारामगाथा २०९ फार सहन होत नाहीं २ मला असे करा ना. चंद्रभागेच्या तीरावर एक देव आहे. त्याच्या पायांवर घाला ना मला. आता माझ्या जीवात काही उरलेले नाही, म्हणून ही विनवणी करीत आहे. ३ तुम्हांस मी हे वर्तमान कळवीत आहे तोवर तुकाराम महाराज म्हणतात, तो माझी वाणीही बंद होण्याची वेळ आली. ४२२ अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे सुख दुःख न मनितां ॥ १ ॥ मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं । पालटाचा घेईं । भाव खरें लोपे ना ॥ २ ॥ आपुलाले तुम्ही पुसा । सोवा एव्याच सरिसा । स्थिरावल्या कैसा काय जाणों विचार ॥ ३ ॥ तुका म्हणे लाभकाळ । तेथें नसावें शीतळ । मग तैशी वेळ । कोठें जाते सांपडों ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सोवा - मनातील गोष्टी, एथ्याच - उगाच अर्थ:- माझ्या अंगात देवी संचारली आहे हे तुम्हांस कुणास समजत नाही काय ? माझी सर्व सुखदुःखे व त्याचे चाळे कुणी संपविले ? १ मी तर आता बेहभानावर नाही माझ्या या बोलण्यावरूनच काही ओळख पटल्यास पाहावी. माझ्यात जो पालट झाला आहे त्याचा खरा भाव काही लपणारा नाही २ आपल्या मनातल्या गोष्टी तुम्ही उगाच विचारून तर पाहा. त्या कशा स्थिर झाल्या आहेत याचा नीट विचार करा ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा लाभ होण्याचा काळ असून थट राहण्याचे येथे कारण नाही अशी संधी आता पुन: कशी व केव्हा येणार ? ४ ४२३ पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय । खेतितां फुंप फांटी । खुंट दरडी न पाहे । आधार' नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥ १ ॥ दाते हो दान करा । जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी । अल्लमाचा सोयरा ॥ २ ॥ हिंडतां गव्हाणें गा । शिणलों बारोदारीं । न मिळेचि दाता कोणी । जन्मदुःखातें वारी । कीर्ति हे संतां मुखीं । तोचि दाखवा हरी । पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥ ३ ॥

  • या पोटाकारणें गा । जालों पांगीला जना । न सरेचि बापमाय । भीक नाहीं खंडणा । पुढारा म्हणती एक । तया नाहीं करुणा । श्वान हे लागे पाठीं । आशा बहु दारुणा ॥ ४ ॥ काय मी चुकलौं गा । मार्गे नेणवे फांहीं । न कळेचि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं । १ आधार नाही कोणी। मज बाप ना माय ॥ २ येरझारी, ३ जन्मदु ख निवारी, ४ नाही भीक, ५ नेगवेचि. तु. गाथा....२७