सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 249, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २१५ चिंता कोण दूर करील ? कोण माझे दुःख कमी करील ? १ देवा, तू कृपाळू राजा आहेस. कृपा करण्याचा धर्म तुझा तूच राहा. आमच्यासारख्या जीवाच्या मनात काय आहे हे नेमके तूच जाणतोस तुला न सांगता आमचे दुःख समजते. २ त्या पुंडलीकाने या वाळवंटात लोळण घातली. असे हे पंढरपूर निरेभिमरेच्या तीरावर मोठ्या पुण्याचे स्थान निर्माण झाले आहे. त्या पुंडलीकास दुसरे काहीच दिसत नव्हते त्याची दृष्टी दुसरे पाहावयास तयार नव्हतो. मग हा प्रेमदाता पांडुरंग त्याच्यावर प्रसन्न झाला त्याने त्यांच्यावर कृपामृताचा वर्षाव केला. ३ एक उपमन्यू नावाचे लहान मूल होते. त्याला लोकाच्याबरोबर नीट चालवत नसे त्याला त्यामुळे नीट जग दिसतही नसे. मग त्याने हरिनामास सुरवात केली. हरिनामाचा गजर झाल्यावर मात्र हा देव सावध झाला व त्याने धावत जाऊन त्याचे तत्परतेने रक्षण केले. ४ जग न पाहावे म्हणून शुकाचार्य आईच्याच गर्भामध्ये आंधळा होऊन राहिला होता. कारण त्याला जन्ममृत्यूच्या रोपांनी फार दुख झालेले होते त्याने यापूर्वी फारच सोसले होते. याच्यासाठी देवाने धावत जाऊन भिऊ नकोस, भिऊ नकोस असे म्हटले व त्याचे रक्षण करून लाज राखली. ५ जो सुखदुःखापासून वेगळा आहे, ज्याला धनाचा मोह नाही, ज्याला आपपर भाव नाही, जो भोवतीच्या आप्त स्वकीयात रमत नाही अशा लोकांनाच देव दर्शन देतो, स्वतःचे मानतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यातही तोच भाव निर्माण झाल्यामुळे नारायणा, माझ्यावर कृपा करा. ६ विवरण :- दुःखाचे आघात झाल्यावर कष्टी झालेल्यांना देव कशी मदत करतो, एकचित्ताने ईश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यांना तो कशी मदत करतो हे सांगण्यासाठी तुकारामबुवांनी येथे उपमन्यू व शुकाचार्य याची उदाहरणे दिली आहेत पैकी उपमन्यू हा धौम्य ऋषीचा शिष्य होय हा आंधळा झाला होता याची निर्वाहाची सर्व साधने बंद झाल्यामुळे याने रुईची पाने भक्षण केली. त्यामुळे याची दृष्टी जाऊन यास भोवळ आले. तो एकदा चालताना विहि- रीत पडला. पुढे याने गुरूच्या सांगण्यावरून अश्विनीकुमाराची प्रार्थना करून स्वतःस दृष्टी प्राप्त करून घेतली. हा दरिद्री असल्यामुळे इतरत्र गोड दुधाची चव त्याने पाहिली होती, पण याला घरी दूध मिळत नव्हते. आईने पाण्यात पीठ कालवून त्याला दिले. मग दूध मिळविण्यासाठी याने शंकराची प्रार्थना करून अवघा क्षीरसमुद्रच मिळविला. ईश्वराने असे याचे अज्ञान दूर केले याची दुधाची इच्छा तृप्त केली. ४२८ भगवंता तुजकारणें मेलों जीताचि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी । न चलती हात पाय दृष्टि फिरली कैसी । जागतां न देखों गा खर आणि अक्षरासी ॥ १ ॥ विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥ २ ॥ भुक्ति मुक्ति तूं चि एक होसि सिद्धीचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता । सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां । कृपादान देईं देवा येउनि सामोरा आतां ॥ ३ ॥ संसारसागर गा भयदुःखांचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ । इंद्रियें वन्यघातें तपे उष्ण वरी जाळ । सोसिलें काय करूं दुर्धर हे चांडाळ ॥ ४ ॥ तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । थेंधलों यदि सोडा भाव धरुनि टँका ।