भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 248, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 248

२१४ सार्थ तुकारामगाथा रूपविहीनाची स्तुती केली मग त्या छदाने तो दाता जागा झाला व त्याने मला हे दान दिले त्याने मला निज बोधाचे, निजतत्त्वाचे ज्ञान दिले आपल्या स्वरूपात मिळवून घेतले ईश्वर व भक्त हा भेद केवळ तात्पुरता ठेवला ४ सर्वांत शब्द हे एकच सार आहे तीच एक परोपकाराची रास आहे म्हणूनच माझ्या मागून येणाऱ्यासाठी हा दगड दान दिलेला आहे खरे म्हणजे ही वाट पूर्वीपासूनच चालत आलेली आहे अनेक सिद्ध लोक या वाटेने गेले व भव सागर तरले त्यामुळे इतरांनाही या वाटेसंबंधी विश्वास निर्माण झाला आहे ५ या वाटेवरचे धर्म एकच आहे आणि ते म्हणजे ईश्वरावर दृढ विश्वास ठेवावा त्याखेरीज जाणतेपणीही नागवण होण्याचा संभव आहे मग देवाचा ठायठिकाणाही सापडेनासा होतो म्हणून हा बाह्य सोंग सोडून त्या प्रभूशी एकत्वाचा भाव तेवढा कायम करावा तुकाराम महाराज म्हणतात, मागील संतानी हाच उपाय केलेला होता ६ ४२७ आंधळयापांगळ्याचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तोचि सर्व होय जाणता । घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचीता । भवदु ख कोण वारी तुजवाचुनि चिंता ॥ १ ॥ धर्म गा जागो तुझा तूंचि कृपाळू राजा । जाणसी जीर्वीचे गा न सागता सहजा ॥ २ ॥ घातली लोळणी या पुंडलिके वाळवटीं । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटी । न देखें दुसरे गा । जाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥ ३ ॥ आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें । न देखे न चलवे जना चालते वाटे । घातली लोळणी या हरिनामा घोभाटे । पावला त्याकारणें धाव घातली नेटें ॥ ४ ॥ बैसोनि खोळीं शुक राहे गर्भ आंधळा । झीणला येरझारी दु ख आठवी वेळा । मागील सोसिले तें ना भी म्हणे गोपाळा । पावला त्याकारणे । लाज राखिली कळा ॥ ५ ॥ न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदु खा मोहो साठवी १ घना । आपपर तेही नाहीं बंधुवर्ग सज्जना । तुकया तेचि परी जाली पाये नारायणा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - हेळामात्रें-एक क्षणात, वोळला-प्रसन्न झाला उपमन्यू-व्याघ्रपादचा मुलगा खोळीं- आईच्या पोटात, शुक-शुकाचार्य अर्थ - या आंधळ्यांना, पांगळ्यांना दान देऊन संतुष्ट करणारा फक्त विठोबाच आहे सर्व विश्व त्याच्या पासूनच निर्माण झाले असल्यामुळे तो मोठा सर्व काही जाणणारा आहे एक क्षणात तो या विश्वाची घडामोड करतो पापपुण्य, संचित कर्म, भवदु ख यांचे निवारण त्याच्यावाचून दुसरे कुणीही करीत नाही देवा, तुझ्यावाचून माझी १ नाठवी