सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 247, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंझालो असल्याने रस्त्याने चालताना मला गुणदोषांच्या अनेक ठेचा लागतात. म्हणून मी तो रस्ता सोडला व या रानात येऊन पडलो. आता या निराळघाच मार्गावर राहून देवा, तुझी वाट पाहत आहे. मला तू कृपा करशील अशी फार मोठी आशा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, विठ्ठला, पंढरपूर येथे राहणाऱ्या पांडुरंगा, तूच खरा वैद्यराज आहेस, तूच माझे दुखणे बरे कर. ६
४२६ सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति जाली जन न दिसे तेथें । मी माजें हारपलें ठायीं जेथींचा तेथें । अदृश्य तेंचि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥ १ ॥ सुखी मी निजलों गा शून्य सारूनि तेथें । त्रिकूटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥ २ ॥ टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा घोळसा । न मागे मी भीक आतां हाचि जाला भरवसा । वोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्छा ॥ ३ ॥ उर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद । घेऊनि आला दान निजतत्त्व निजबोध । स्वरूपीं मेळविलें नांव ठेविला भेद ॥ ४ ॥ शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मार्ग येतील त्यांसीं । मागोनि आली वाट सिद्धओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥ ५ ॥ वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ठाव । म्हणोनि संग टाकी सेवीं अद्वैत भाव । तुका म्हणे ह्याचि संतों मार्गे केला उपाय ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- त्रिकूटशिखरीं-त्रिपुटीच्या शिखरावर, त्रिपुटी-ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, अथवा कर्म, कर्ता, क्रिया इत्यादी त्रिधाचा समुदाय कोल्हाळ-कटकट, घोळसा-त्रास, वोळली-प्रसन्न झाली, सत्रावी-जीवनकला, ज्ञानकला, अमृतवाहिनी ज्ञानभवनी, उपाय-उपाय.
अर्थ :- देवा, मी तर सहजच आंधळा आहे. निजस्वरूपाच्या, निराकाराच्या ठिकाणी मला दृष्टी नाही. बाह्य रूप पाहणे संपल्यामुळे माझी वृत्तीच निवृत्ती झाली. मला हे बाह्य जग दिसेनासे झाले. मी व माझे शरीर या माझ्या वृत्ती हा भाव पण संपला. जे होते ते आपल्याच ठायी अदृश्य झाले १ सर्व शून्याचा त्याग करून, त्रिपुटीच्या शिखरावर जाऊन मी सुखाने झोप घेतली तेथे मला आयतेच दान मिळाले २ धर्म व अधर्म अशा वृत्तींची झोळी मी फेकून दिली. पात्रही टाकून दिले. सर्व प्रकारची कटकट चुकविली सत्व, रज, तम या त्रिगुणांचा त्रास घालविला. आता भीक मागण्याचेही कारण उरले नाही कारण सत्रावीची जीवनकला आता प्रसन्न झाली असल्याने तिने माझी इच्छा पूर्ण केली. तिचाच मोठा भरंवसा मला वाटतो ३ वर मुख करून सोहम् शब्दाने त्याची आळवणी केली; त्या