सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 246, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२१२ सार्थ तुकारामगाथा आता मज दृष्टी देईं । पांडुरंगा मायबापा । शरण आलो आतां । निवारूनिया पापा । अंजन लेववूनी । करीं मारग सोपा । जाईन सिद्धपंथें । अवघ्या चुकती खेपा ॥ २ ॥ होतसे खेद चित्ता । काहीं नाठवे विचार । जात होतो जना मागें । तोही सांडिला आधार । हा ना तोसा ठाव जाला । अवघा पडिला अंधार । फिरलीं माझों मज । कोणी न देती आधार ॥ ३ ॥ जोवरि चळण गा । तोवरि म्हणती माझा । मानिती लहान थोर । देहसुखाच्या काजा । इंद्रियें मावळलीं । आला बागुल आजा । कैसा विपरीत जाला । तोचि देह नव्हे दुजा ॥ ४ ॥ गुंतलो या संसारे । कैसा जालोसे अंध । मी माझें वाढवुनी । मायातृष्णेचा बाध । स्वहित न दिसेचि । केला आपुला वध । लागले काळ पाठीं । सवे काम हे क्रोध ॥ ५ ॥ लागती चालता गा । गुणदोषांच्या ठेंसा । सांडिली वाट मग । जालो निराळा कैसा । पाहातो वास तुझी । थोरी करुनी आशा । तुका म्हणे वैधराजा । पंढरीच्या निवासा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा — पडळ-पडदा, चळण-चलती, सिद्धपंथें-तयार मार्गाने, साधुसंताच्या मार्गाने अर्थ - देवा, यापूर्वी मी सर्व काही पाहात होतो. मागेपुढे पाहून सर्वत्र तू भरून राहिला आहेस हे दिसत होते पुढे माझी दृष्टी गेली माझ्या डोळ्यावर पडदा येऊन अंधाराने सारे भरून आले. सर्वत्र अंधार वाढला पुढे तो अधिकच वाढला मी मग भयभीत झालो मी हा असा आंधळा झाल्यामुळे जन्मास येऊन काय उपयोग देवा ? १ पांडुरंगा, मायबापा, आता मला दृष्टी दे ना मी तुला मनोभावे शरण आलो आहे माझी काही पापे असतील ती दूर कर माझ्या डोळ्यात चांगली दृष्टी येईल असे अंजन घालून पुढचा मार्ग चांगला सोपा असा दाखव मग मी ह्या सिद्ध झालेल्या मार्गाने जाईन व जन्ममरणाच्या फेऱ्या चुकवीन २ देवा, माझ्या चित्तास फार खेद होत आहे रे कोणताही विचार सुचत नाही मी लोकांच्या मागे मागे जात होतो, तोही आधार माझा संपला मी आंधळा झाल्यामुळे त्यांनीही माझा संग सोडून दिला सर्वत्रच अंधार झाला माझी माझी म्हणून जी माणसे होती तीही फिरली, त्यांनीही मला सोडून दिले आता मला कुणीच आधार देत नाही ३ जोपर्यंत माझे सर्व इंद्रिये चलनवलन करीत होती, जोवर चलती होती, तोवर सर्व आप्तवर्ग मला आपला म्हणत होता लहानथोर लोक मला मान देत होते देहसुखासाठी लोक मला जवळ करीत होते पण आता माझ्या इंद्रियांचे सामर्थ्य संपले तेव्हा तीच माणसे मला पाहून 'हा पाहा आजोबा बागुल बुवा आला' असे म्हणू लागली आहेत कसे विपरीत घडत आहे माझा देह पहिलाच आहे दुसरा नवीन नाही पण लोकांची दृष्टी फिरली ना ४ या लौकिक संसारात गुंतल्यामुळे मी हा असा आंधळा झालो मायेची व नाना तृष्णांची बाधा मला झाल्यामुळे स्वहित नेमके कशात आहे हे मला समजेनासे झाले असा मीच आपला वध करुन घेतला आहे. माझ्या पाठीमागे हे काम क्रोधाचे काळ लागले आहेत ५ मी आंधळा