सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 251, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २१७ शब्दार्थ व टीका - मनु-मन, देहपुरी-देहरूपी शहरान, आचपळें-अति चपळ अर्थ - देहरूपी एका गावात मन नावाचा राजा राज्य करीत आहे प्रवृत्ती व निवृत्ती या त्याला दोन बायका असून तो पुत्रपौत्रादिकांनी अतिशय संपन्न असा आहे त्याने आमच्यावर फार मोठी कृपा केली हो ? म्हणून तर आम्ही या देशात येऊन पोचलो मानी दिशा सुकून भलतीकडेच मी गेलो असतो येथे आल्यावर इच्छेप्रमाणे दान देणारा दाता भेटला त्याने आम्हाला फार चांगला मार्ग दाखविला २ मनोरूपी राजा आपले चार सुलझणी कुमार घेऊन आमच्याबरोबर आला वाडे व काटे चुकवून त्यानेच आम्हास आणले त्याच्याबरोबर कोण कोण मुलेहोती त्याची नावे ऐका ३ त्याच्यापुढे भक्ती स्वतः चालत होती व तिच्याबरोबर ज्ञान, वैराग्य व धर्म हे येत होते जे अति चपळ होते ते स्थिर झाले सिद्धही याच पथास त्यानी आणून लावले ४ त्यानी आमच्यावर जे उपकार केले त्याचे महत्त्व काय सांगू ? आईबापसुद्धा असे उपकार करणार नाहीत त्याच्याच धर्मामुळे मला देवाचे हे पाय दिसले व मला अभयदान कायमचे मिळाले ५ पूर्वी अनेक जन्मी अनेक यात्रौ दु खोरुष्टी होऊन हिंडत होतो त्यावेळी धड नीट पोट भरले नाही की राहायला नीट जागा कधी मिळाली नाही पण या मनरूपी राजाने सर्व संशय फेडले व हा तुकोबाना याघवासारखा त्यामुळे वाढतो ६ ४३० गातो वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावे एका । डोळे झाकुनि रान करूं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥ १ ॥ राम राम स्मरा आधीं । लाहो करा गाठ घाला मूळबदीं । सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावूनि राहा गोविंदों गा ॥ २ ॥ ऐसा अल्प मानवी देह । शत गणिले अर्ध रात्र खाय । पुढें बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरले ते पाहे गा ॥ ३ ॥ क्षणभगुर नाहीं भरवसा । व्हा रे सावध सोडा १ माया आशा । न चले बळ पडेल मग फासा । पुढें हुशार थोर आहे वोळसा गा ॥ ४ ॥ कांहीं थोडें बहुत लागपाठ । करा भक्ति भाव धरा बळकट । तन मन ध्यान लावूनिया नीट । जर असेल करणे गोड शेवट गा ॥ ५ ॥ विनवितो सकळा जना । कर जोडुनि थोरा लाहना । दान इतुले द्या मज दीना । म्हणे तुकयावधु राम म्हणा गा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीका - लेखा-हिशेब, शत-शंभर, लाहो-लाभ, वोळसा-फेरे, लागपाठ-त्वरा अर्थ - मी वासुदेव गात आहे त्याचा अर्थ नीट लक्ष देऊन ऐका डोळे मिटून व्यर्थ आयुष्य घालवू नका कारण त्याचा काटेकोर हिशेब यम किंवा काळ करीत बसला आहे १ आधी रामराम असे स्मरण करा पाहू त्याचा लाभ करून घेऊन त्याला मूळ स्वरूपात गाठा इतर बाकीच्या संसाराच्या सर्व उपाधी सोडून द्या या एका गोंविदावर सर्व चित्त ठेवून राहा तुम्ही २ या मानवी देहास फार थोडे आयुष्य आहे शंभर वर्षे आहे असे मानले तरी त्यातील अर्ध रात्रीच्या झोपेतच जाते मग बालपण, दुख, रोग, क्षयासारख्या व्याधी यात काही वर्षे जाणारच मग ईश्वराच्या भजनासाठी किती उरले पाहा बरे ३ जे काही हाताशी असलेले आयुष्य आहे तेही क्षणभंगुरच यासाठी तुम्ही सर्व सावध होऊन याह्या आशा किंवा माया सोडून द्या एकदा यमाचा फास गळ्याशी पडला म्हणजे मग मात्र कुणाचे काही चालत नाही पुढे फार मोठ्या फेऱ्याच्या संकटात पडावे लागणार आहे हे ओळखून असा ४ काही थोडी त्वरा करून भक्तीचा भाव नीट बळकट करून ठेवा नीट तन, मन, ध्यान लावून या देवास सर्व अर्पण करुन शेवट गोड करण्याचे कार्य साधा ५ सर्व लहानथोराना मी वासुदेव हात जोडून सांगत आहे की, एवढेच दान मला द्या तुकयावधू सुद्धा म्हणत आहेत की, तुम्ही मुखाने नेहमी रामराम म्हणावे ६ १ तोडा तु गाथा २८