भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 265, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 265

सार्थ तुकारामगाथा २३३ पराविया नारी माउली समान । परधनीं बाटो नेदीं मन । जीवित्त्व तें तृणासमान । स्वामिकाजी जाण शूर म्हणो तया ॥ ६ ॥ क्षपित्त येचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा । सत्य ते भवनदीचा तारा । आळस तो न करा येथें अहो सांगतो ॥ ७ ॥ व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर । पुण्य ते असे गाता नाचता बहु फार । पुन्हा योलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥ ८ ॥ संग संताचा करिता बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा । पथ तो सुपंथ चालावा । उगवा वासना लिंगाड ॥ ९ ॥ तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोलडी । पुढती पुढती अधिक गोडी । भरुनि कळस भजन आवडी केशवदास नटतसे ॥ १० ॥ शब्दार्थ व टीपा - कावडे-पाण्याची कावड घालणारे पान्हेरी-पाणपोई, कापटि-यात्रेकरू पण-पैज, घाडघाय-अधिकार, सधी, लिंगाड-लचाड, खटपट अर्थ - अहो बंधुनो, प्रथम गुरुचरणांना वंदन करुन गणपतीस नमस्कार करु त्याच्या कृपेने प्रासादिक वाणीत हरिहराचे गुणसंकीर्तन करु १ असे दास्यत्व करण्याची माझी योदावड्टी विशेष प्रकारची आहे पाणपोई घालून मी मार्ग आक्रमत आहे, सेवा करुन जीवन जगत आहे यात्रेकरू बंधुनो, तुम्ही हे पाणी खुशाल घ्यावे २ हे प्रेमा- मृताचे जीवन शीतलाहून शीतल, पातळाहून पातळ असे रसाळ व गोष्ट आहे याचे सेवन मोठ्या भाग्याने घडते ३ अगोदर तुम्ही अभिमान जिंका, लज्जा आणि मानसन्मानाची हौस सोडून द्या आणि घरणध धरावयाचे असतील तर महादेवाचे धरावेत काही पैज दाखवयाची असेल तर ती अशी असू द्यात ४ तुमच्या जीवनात काळाला शिरकाव करु देऊ नका त्याचा अधिकार नीट राखून मनात शुद्ध, सात्त्विक भाव धारण करून हरिहर महादेव अशी गर्जना याणीने करा ५ दुसऱ्याची स्त्री मातेसमान माना दुसऱ्याच्या धनसंपत्तीवर मन ठेवू नका आणि स्वामीच्या कामासाठी आपले जीवन तुम्ही गवतएवढे क्षुद्र समजा तरच मी तुम्हांस शूर म्हणेन ६ तुमची सर्व शक्ती दुसऱ्या- वर उपकार करण्यासाठी खच व्हावी, प्रपंच हा सर्व खोट्याचा पसारा आहे असे तुम्ही माना भवनदी तरून जाणे हेच एक सत्याचे रूप आहे असे समजा याबाबतीत आळस मुळीच करू नका असे मी तळमळीने सांगत आहे हो ७ एकादशी व सोमवार ही दोन व्रते नियमाने करा कथा, पूजा, हरिजागर करून नामसंकीर्तनाचा लाभ घ्या या नृत्यगीतात फार मोठे पुण्य आहे असा विश्वास धरा याच्यायोगे पुन संसार करण्यासाठी जन्म घेण्याचा प्रसंग येणार नाही हे सत्य आहे ८ संताची संगत धरणे हेच फार चांगले आहे यामुळे थोर कीर्तीचा लाभ होतो व वासनेचे लचाड दूर होऊन चांगल्या मार्गाचे आचरण ठेवावे ९ तुकाराम महाराज म्हणतात, मी प्रवृत्ती व निवृत्ती अशी कावड चालवीत आहे पुढे आणखी भजनातील गोडीने कळस भरलेले दिसतील केशवदासाच्या प्रीतीने मीही कायदयाच्या निमित्ताने सेवा करीत आहे १० ४५१ आहा आहा रे भाई । हे अन्नदानाचे सत्र । पन्हे घातली सर्वत्र । पर्थी अवघे पथ मात्र । इच्छाभोजनाचे आर्त पुरवावया ॥ १ ॥ यावे तेणे घ्यावे । न सरेसे केले सदाशिवे । पात्र शुद्ध पाहिजे वरवे । मगळभावे सकळ हरि म्हणा रे ॥ २ ॥ मध्ये हे काहीं मोकळें । साक्षी चौघांचिया वेगळें । नेदी नाचो मतांचिया थळें । अणु अणोरणीया आगळें । महदि महदा साक्षित्वे हरि म्हणा रे ॥ ३ ॥ तु गाथा ३०