सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 269, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंविवरण - या सुदर अभंगात एक तत्त्व तुकारामबुवांनी फार चांगल्या प्रकारे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे श्रीकृष्ण व शिवशंकर यांची एकरूपता वर्णन करणे व तसे ऐक्य प्रस्थापित करणे हे तर भागवत संप्रदा- याचे धोरण होते. पण कृष्ण व शिव यांच्या वरवरच्या आचरणावरून त्यांना इतर सामान्य माणसाप्रमाणे समजू नये हे पटविण्यासाठी तुकारामबुवांनी अनेक उदाहरणे या अभंगात दिलेली आहेत. ज्या वस्तूस ईश्वराचा स्पर्श झाला आहे, अथवा जीत ईश्वरी तत्त्वाचा वास अंम आहे ती स्वजातीयापासून वेगळीच मानावयास हवी तुकोबांचा हा सामर्थ्याने शोभणारा अभंग वाचून भगवद्गीतेमधील विभूतिविस्ताराच्या निरुपणाचा प्रसंग आठवतो सर्व जगत्, स्थिरचर वस्तू यांची अभिव्यक्ती एकाच ईश्वरी तत्त्वापासून असली तरी ज्या वस्तूत परमेश्वराचा दिव्यांश विशेष रूपाने असतो त्या वस्तू आपल्या वैशिष्ट्याने वेगळयाच दिसतात व असतात, जी जी वस्तू वैभव, लक्ष्मी, प्रभाव, ईश्वरसान्निध्य, किंवा ईश्वरस्पर्शित आहे ती वेगळीच म्हटली पाहिजे
सौऱ्या – अभंग ११
४५५ वेसन गेले निष्काम जाले नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥ १ ॥ त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावले घालिती गळां ॥ २ ॥ जन वेपा भीते तोडा आमुच्या भांडपणा । कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥ ३ ॥ वेगळया याति पडिलो संतीं अवघ्या एका भावे । टाकियेली चाड देहभाव जीवें शिवे ॥ ४ ॥ सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करूं सेवा । धाय तुंबामूढासवे भक्ती नाचो भावा ॥ ५ ॥ म्हणे तुका टाक रुका नाचो निर्लज्जा । बहु जाले सुख काम चुकलो या काजा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- सौरी-निर्लज्ज स्त्री, चोचाल स्त्री, भावीण, मुरळी, देवदासी, वेसन-व्यसन, सावलें-वस्त्र, धाय-व्यर्थ
अर्थ :- सकामातेचे माझे व्यसन आता संपले. मी आता निष्काम झाले आहे त्यामुळे मी नारीही नव्हे व पुरुषही नव्हे, अशा स्थितीत आहे आपल्या स्वरूपाची संगत कमी होऊन परपुरुषाची म्हणजे परमेश्वराची जडू लागली की सौऱ्याच्या संगतीने असा प्रकार घडून येतो १ त्या श्रेष्ठ पुरुषाचा मला छंद एकसारखा लागल्यामुळे मी हरी, गोविंदा असे पुनः पुनः म्हणत आहे मग माझ्या पाठीमागे माझे सगेसोयरे मला हसत असतात व रागाने गळघात वस्त्र घालतात २ लोक आमच्या वेषाला भितात, आमच्या भाडखोर स्वभावामुळे कोणी आमच्या तोंडास लागत नाहीत. पण कमरेवर हात ठेवून भीमा नदीच्या तीरावर जो पंढरीराया उभा आहे, त्याच्याशी मी रमले आहे ३ त्याचीच एकाची भाव धरून भक्ती केल्यामुळे आमची जात वेगळी झाली. आम्ही देहभावाची व संसाराची लाज जीवाशिवाच्या ऐक्यासाठी सर्व सोडून दिली आहे. ४ सर्वांहून जी श्रेष्ठ बुद्धीची आहे तिची सेवा आम्ही मनोभावे करू, मोठ्या भक्तिभावाने नाचू व्यर्थ मूर्खाबरोबर न राहू ५ तुकाराम महाराज म्हणतात, पैशासाठी निर्लज्जपणे नाचण्याचे सोडून दे या कामातील तुझे लक्ष कमी झाले म्हणजे कायमचे सुख होईल ६