सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 270, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२३८ सार्थ तुकारामगाथा ४५६ आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा¹ वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥ १ ॥ तैसा नव्हे घाला आवरों मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ २ ॥ बाहिरल्या येषें आंत जसें तसें । झाकलें तों बरें पोट भरे तेणें मिसें ॥ ३ ॥ तुका म्हणे केला तरी करीं शुद्ध भाव । नाहीं तरी जासी यांयां हा ना तोसा ठाव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मुंढा-हिजड्याचा सोबती, हा ना तोसा-ना स्वार्थाचा, ना परमार्थाचा. अर्थ :- दुसऱ्यांना उपदेश देऊ नये. आपणच काय नाचायचे ते नाचावे. या मार्गास लागलेला सोबती मुढा हाही वायाच गेलेला असतो. त्याला लोक हसतात १ तेव्हा त्याच्याप्रमाणे खोटाच चाळा न करता मन आवरून धरावे. दृष्टी सावरावी. पुढे गेले आहेत त्यांचे गुण कौतुकाने घ्यावेत. २ बाहेरचा चांगला वेष काय उपयोगाचा ? आतील विकार जसेच्या तसेच असले तर ते झाकलेले बरे. बाह्य वेषाने पोट तरी भरेल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आपला भाव शुद्ध कराल तर बरे. नाही तर वाया जाल. ना स्वार्थ, ना परमार्थ अशी अवस्था तुमची होईल ४ ४५७ टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें शिवी ॥ १ ॥ आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाही या गोविंदें माझें मजसी केलें ॥ २ ॥ कोरडे ते बोल कां गे वेचितेसी वांयां । थतें करूनि दावीं तुझ्या मुळींचिया ठाया ॥ ३ ॥ याजसाठीं म्या डोर धरियेला हातीं । तुका म्हणे तुम्हा गांठी सोडायाची खांती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- रुका-अभिमान, गोवी-गुंतवणूक, डौर-एक वाद्य, डमरू अर्थ :- अग रांडे, तू देहाचा अभिमान सोडून दे ना ह्या गुंतवणुकीत का राहतेस ? चल मजबरोबर मी ह्या अभिमानाचे स्थान सोडून दिले आहे म्हणून तर तुला शिवी देत आहे १ या गोविंदाने माझा मीपणा नाहीसा केला; म्हणून आता याच्याच नादाने मोठ्या मस्तीने व गमतीने याच्या संगतीत नाचू या. २ तू तुझ्या अंतःकरणांतील हे कोरडे बोल व्यर्थ का खर्च करतेस ? तुझ्या मूळच्या ठिकाणी ते प्रकट करून दाखोव ना. ३ यासाठीच मी हातात हा डोर धरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देहाच्या अभिमानाची ही गाठ मला आता सोडवायची आहे. ४ ४५८ मोकळी गुंत रितो कुंथ्ये नाहीं भार दावें । घेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥ १ ॥ ऐका बाई लाज नाहीं² आणिकां त्या गरतीची । समाधानों उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ २ ॥ १ मुदा, २ काही