सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 271, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंन बोलतां करी चिंता न मारितां पळे । वादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥ ३ ॥ देखत आंध बहिर कानों बोल बोलतां मुकें । तुका म्हणे पतन सोयरीं ऐसीं जालीं एकें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- रिती-रिकामी, धेडवाडा-महारवाडा, गरतीबो-कुलीन स्त्रीची अर्थ :- ही मोकळी असून गुंतली आहे. दर डोक्यावर कांही ओझे नसूनही भाराने कुथत आहे आणि आपल्याच देहभावाच्या छोडघामध्ये, देहरूपाम्च्या महारवाड्यात अडकून बसली आहे. १ आणि एक बाई, त्या कुलीन स्त्रीची लाज तुला वाटत नाही का ? ती पतीची सेवा करुन कशी समाधानात उंच ठिकाणी असते. २ कुणी काही रागाने बोलत नसताही चिंता करणे व कुणी मारीत नसताना पळून जाणे, शेजेवर आपला नवरा न आवडणे हे जगझोडीचे, चवचाल स्त्रीचे चाळे असतात. ३ देव पाहात नसल्यामुळे याचे डोळे आंधळेच असतात. त्यांची कीर्ती कानावर येत नसल्याने ते बहिरेच असतात, त्याची स्तुती तोंडात नसल्याने ते मुके असतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची माणसे नरकलोकाचेच पाहुणे झाले आहेत ४ ४५९ सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारों नाचों फेर घरा ॥ १ ॥ या साहेबाचें जालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटों काशासाठीं हिंडों पाटी बुकानें ॥ २ ॥ अवघ्या जणी मुंडा धणी नाचों एकें घाईं । सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे वोळगों एका तोड चिंता माया । देऊं उद्गार आतां जाऊं मुळींचिया ठाया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सातें-बाजारात, वोळगो-शरण जाऊं अर्थ :- शायांनो, चला बाजारात जाऊ डोळ्यात काजळ घाला, तेलफणी नीट करा. समोर पारावर दारात दिवाणजी बसले आहेत त्याच्या भोवती फेर धरून नाचू या. १ या साहेबाचे आपणांस वरचेवर कर्ज झाले आहे, देणे आहे. ते एकदा देऊन टाकले म्हणजे मग पुनः वरचेवर यायला नको. आता बाजारात त्याच्यासाठी मग दुकानांतून हिंडावे लागणार नाही. २ या निर्विकार धन्याभोवती आपण सर्वजण फेर धरून नाच करू या या एका ठिकाणी जर सुख मिळाले तर मग निरनिराळ्या ठिकाणी जाण्याचा चाळा उगाच कशासाठी ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, चिंता व मायाममता सोडून यासच शरण जाऊ. याच्यापाशी सर्व काही सांगून याच्या मूळ गांवे जाऊ या. ४ ४६० सोरी सुर जालें दुर डोर घेतला हातीं । माया मोह सांडवले तीही लोकीं जालें सरती ॥ १ ॥ चाल धिठाबाई अवघो पांज¹ देईं । न घरीं गूज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ २ ॥ हिंडोनि चौऱ्याशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रूपयासाठीं आंचवलें संसारा ॥ ३ ॥ १ पाच.