भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 272, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 272

२४० सार्थ तुकारामगाथा लाज मेली शंका गेली नाचोँ महाद्वारीं। भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥ ४ ॥ जालें भांडीं जगा सांडी नाहीं भीड चाड। घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥ ५ ॥ तुका म्हणे रुकारो संसारतुटी। आतां तुम्हां आम्हां कैसी जालो जीवे साटीं ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- सुर-शूर, दुर-दुरावले, पांज-पंचभूतात्मक देह, सावले-वस्त्र, भांडी-भांडण अर्थ :- हातामध्ये ढोर घेऊन मी शूर सौरी झाले आहे. सर्व प्रकारचे मायामोह सोडून मी तीनही लोकांना श्रेष्ठ ठरले आहे. १ विठाबाई, हा देह पंचभूतात्मक आहे. पण वाळवंटात या पंढरपुरास आले असता काही गुप्त गोष्ट मनात ठेवू नकोस. २ चौऱ्याऐंशी लक्ष योनींचे जन्म हिंडून मी आज शेवटी तुझ्या घरी आले आहे; तुझ्या नामाच्या एका रुक्यासाठी मी माझा संसारही सोडून दिलेला आहे. ३ माझी सर्व लाज संपली; शंकाही दूर झाली; मी आता या महाद्वारात नाचत आहे. भ्रांतीचे वस्त्रही मी आता टाकून दिले आहे. आता देहभावाचे काय तसे उरले आहे ? ४ सर्वांशी माझे भांडण झाल्यामुळे मी सर्व जगाचा संबंध सोडून दिलेला आहे. मला आता कुणाचीच भीडभाड नाही. आता मी तुझ्याच चरणांवर मिठी घालून माझ्या जीवाची इच्छा पूर्ण करीन. ५ तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या नामाचा रुका मला प्राप्त झाला म्हणजे संसार संपून जाईल व जीवावर उदार होऊन तुमची-आमची कशीतरी भेट होईल. ६ ४६१ सम सपाट बेसरूकाट निःसंग जालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥ १ ॥ गाऊं रघुरामा हेंच उरलें आम्हां । नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ २ ॥ ठाव जाला रिता झाकुनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥ ३ ॥ सौरीयांचा संग आम्हां दुरावलें जग । भिन्न जालें सुख भाव पालटला रंग ॥ ४ ॥ लाज भय क्षणो नाहीं तजियेली दोन्ही । फिराविला वेष नव्हों कोणाचींच कोणी ॥ ५ ॥ तुका म्हणे हा आम्हां वेष दिला जेणें । जनाप्रचित सर्वै असों एकपणें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - कुडपीयेला-व्यापून टाकला, सर्वे-बरोबर. अर्थ :- सर्व संग सोडून, सर्व व्यसने संपवून मी निःसंगपणाने सौरी झाले आहे. आता हा देश मीच एकटीने व्यापला असल्याने दुसऱ्या कुणास येऊ देणार नाही इथे. १ आता त्या रघुरामाचे नामस्मरण गाऊ हेच एक काम आम्हांस उरले आहे. आता आम्हास आमच्या जिवाचीही काळजी नाही, की धनदौलत व नातेवाईक लोक यांची चिंता नाही. २ हा सर्वच देहभाव संपलेला असल्यामुळे आता त्यास झाकून काय उपयोग ? आता कुणासाठी लाज धारण करायची ? त्याच्यावाचून आता पाहणारे तरी दुसरे कोण आहे ? ३ सौऱ्यांच्या संगतीने आम्हांला हे जग दुरावले आहे; पण त्यामुळे फार वेगळ्या प्रकारचे सुख आम्हांस मिळून त्याने आमच्या मनाचा भाव पालटला आहे. ४ आता लोकांची भीती व लाज दोन्ही आम्ही सोडून दिली आहे. आता आम्ही पूर्वीचा वेषही टाकून देऊ.

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 272, कुल 611 में से · BharatKosha