सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 277, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२४४ सार्थ तुकारामगाथा हृदय कोटवा सागातें । घोळ वाजवू अनुहाते । ज्ञानभंडाराचे पोते । रिते नव्हे कल्पातीं ॥ ३ ॥ लक्ष चौऱ्याशीं घरे चारी । या जन्माची केली वारी । प्रसन्न जाला देव मल्हारी । सोहंभाव्यों राहिलो ॥ ४ ॥ या देवाचे भरता वारे । अगीं प्रेमाचे फेंपरे । गुरुगुरु करी वेडे चारे । पाहा तुके भुकविले ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - जुगाचा-युगाचा, घुमारा-संचार बिरडें-माळ कोटबा-लाकडी भिक्षापात्र, घोळ-वाद्य अर्थ - अनंत युगाचा देव्हारा मी मांडला आहे यात निजबोधाचा संचार झालेला आहे या मल्हारी देवाचा भाव अप्रतिहतपणे यात भरून राहिला आहे १ शुद्ध सत्याची मोठी कवडी येथे असून बोधाच्या माळेची गाठ पक्की आहे गळध्यात वैराग्याचा पट्टा आहे आणि हा वाघ्या भक्तीच्या वाटा दाखवीत उभा आहे २ याने आपल्याबरोबर हृदयरूपी लाकडी भिक्षापात्र घेतले आहे घटाच्या घोषाने हा जणू अनुहाताचा नादच करीत आहे याच्या ज्ञानभांडाराचे पोते कल्पान्तीही कधी रिकामे होणारे नाही ३ चौऱ्यांशी लक्ष योनीत जन्म घेऊन या माणसाच्या जन्मी याने चार घराची वारी केली आहे व त्यामुळे याला मल्हारी देव प्रसन्न झाला आहे, म्हणून तो सोहम्भाव धारण करून आहे ४ या मल्हारी देवाचे वारे अंगात भरताच अंगात प्रेमाचे फेंफरे येते गुरुगुरु करून वेडे चाळे केले तेव्हा त्याची गुरुभक्ती पाहून तुकारामाने त्यास बोलते केले आहे ५ विवरण - वाघ्या हा खंडोबाचा भक्त मुरळीबरोबर असतो देवीचे जसे गोंधळी, भुत्ये तसेच खंडोबाचे, मल्हारीचे हे वाघे खांद्यावर घोंगडी, गळ्यात वाघाच्या कातड्याची भंडाऱ्याने भरलेली पिशवी असा हा वाघ्या मल्हारीची गाणी गात हिंडत असतो वाघ्या व मुरळी ही खंडोबास अर्पण केलेली असतात मुलगा वाघ्या होतो मुलगी मुरळी होते नवसास खंडोबा पावल्यास ही मुले देवास अर्पण करण्याची चाल असे वाघ्या स्वतःस खंडोबाचे कुत्रे समजून गुरगुर आवाज काढतात याही अभंगात 'गुरुगुरु करी वेडे चारें' म्हणून तुकोबांनी उल्लेख केलेला आहेच या वाघ्याच्या रूपावर एकनाथांनी काही भारूडे रचली आहेत 'अह वाघ्या सोह वाघ्या प्रेमनगरा वारी। सावध होऊनि भजनी लागा । देव करा कंवारी' अस एकनाथांचा वाघ्या म्हणत आहे या वाघ्यांनी व मुरळ्यांनी खंडोबाच्या भक्तीचा प्रसार महाराष्ट्रात केला असला तरी त्याच्या वागणुकीविषयी लोकांच्या मनात सदैव शंका असे तुकोबांनी सोरी च्या निमित्तान देवदासीचे अंतरंग स्पष्ट केलेले आहेच लळित - अभंग ११ ४६७ आजी दिवस जाला । धन्य सोनियाचा भला ॥ १ ॥ झाले सत्ताचे पंगती । बरवे भोजन निगुती ॥ २ ॥ रामकृष्णनामें । बरवीं मोहियेली प्रेमें ॥ ३ ॥ तुका म्हणे आला । चवी रसाळ हा काला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लळित-देवाच्या उत्सवप्रसंगा शेवटी सोंगे वगैरे आणून कीर्तन करतात ते, निगुती- सावधतेने अर्थ - आज मोठ्या धन्यतेचा दिवस उगवला आहे हा सोन्याचाच दिवस आहे १ आज सताच्या पंगतीचे भोजन सावकाशपणे झाले २ रामकृष्ण या नामस्मरणाने सर्व वातावरण मोठ्या प्रेमाने मोहित होऊन गेले ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा भोजनसमारंभाचा कालाही ईश्वरी प्रसादाच्या चवीने मोठा रसाळ झाला आहे ४