भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 278, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 278

सार्थ तुकारामगाथा २४५ ४६८ तुम्ही तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥ १ ॥ कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवुनी देईं ॥ २ ॥ टोकत बैसलों देखा । इच्छीतसें ग्रासा एका ॥ ३ ॥ प्रेम देउनि यहुडा जाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- टोकत-टुकुटुकू बघत, बहुडा-बदली. अर्थ :- रुक्मिणी आई, रखुमाई, तुम्ही तरी या विठ्ठलास आमच्याबद्दल काही सांगा ना. १ काही उरले असेल तर सत्वर पाठवून द्या ना आमच्यासाठी. २ पाहा ना मी कसा तुमच्याकडे टुकुटुकू पाहात बसलो आहे. एकाच घासाची इच्छा धरून मी आहे. ३ प्रेमभक्ती देऊन मी या पांडुरंगास बदली म्हणून घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाचा जयजयकार करा ना. ४ ४६९ वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टि लागलें चित्त ॥ १ ॥ कईं येतां देखें माझा मायबाप । घटिका घोटें दिवस लेखीं धरुनियां माप ॥ २ ॥ डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उताविल भाव सांडुनियां देहे ॥ ३ ॥ सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक । नाठये घर दार तान पळाली भूक ॥ ४ ॥ तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- बाहे-बोलावतो, निडळीं-कपाळावर, बाहे-बाहू, मूळ-आमंत्रण. अर्थ :- मी कपाळावर हात ठेवून या विठ्ठलाची वाट पाहात आहे. माझी दृष्टी पंढरीच्या वाटेस लागली असून माझ्या चित्तात तोच एक विषय आहे १ हा माझा विठ्ठल मायबाप आलेला मी कधी बरे पाहीन ? घटिका, बोटे वगैरेंच्या साहाय्याने मी दिवस मोजून, लिहून ठेवीत आहे. २ मला शकुनही फार चांगले होत आहेत. डावा डोळा लवत आहे आणि उजवा हात स्फुरण पावत आहे. माझे मन उतावीळ बनून देह सोडून जणू भावभक्तीने त्याला भेटावला निघाले आहे. ३ सुखाच्या खाटेवर मला काहीही गोड लागत नाही. मला घरदारसुद्धा आठवत नाही. माझी तहानभूक पळून गेली आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, असा धन्यतेचा दिवस कधी उगवेल ? पंढरपूरच्या वाटेचे आमंत्रण मला केव्हा येईल ? तो पंढरीराणा मला केव्हा बोलाविल ? ५ ४७० तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग्¹ जालें जिणें माझें पंढरीराया ॥ १ ॥ काय गा विठोबा तुज म्हणावें । थोराच्या दैवें गोड शुभअशुभ ॥ २ ॥ संसाराचा धाक निरंतर आम्हांसी । मरण भलें परि काय अयफळा तैसी ॥ ३ ॥ तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी । तुका म्हणे कवणा लाज हें कां नेणसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आणिकां-दुसऱ्याना. अर्थ :- देवा, तुझी भक्ती आम्ही करावी, तुझे दास्य करावे व खायला मात्र दुसऱ्यांना मागावे. असे माझे जगणे पंढरीनाथा, धिक्कारयुक्त बनले आहे. १ विठोबा, तुला म्हणावे तरी काय ? तुझ्यासारख्या थोराच्या सहवासात सर्व शुभ अथवा अशुभ आम्हांला गोडच आहे. २ देवा, या संसाराची धास्ती आम्हांस निरंतर असते. आणि या संसारास अशी दशा प्राप्त झाली आहे की ती अवस्था पाहून मरण बरे असे वाटावे. ३ तुकाराम १ धन्य जिणे झाले