सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 280, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २४७ ४७५ हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥ १ ॥ तैसा दिसे नारायण । मुख सुखाचें मंडण ॥ २ ॥ कोटि चंद्रलीळा१ । पूर्णिमेच्या पूर्णकळा ॥ ३ ॥ तुका म्हणे दृष्टि धाये । परतोनि माघारी तें न ये ॥ ४ ॥ शब्दार्थ वटीपा :- धाये-संतुष्ट होते. अर्थ :- रत्नजडित कोंदणात एखादा हिरा शोभून दिसावा, किंवा खाणीत माणीक शोभून दिसावे, १ तसा हा नारायण शोभून दिसतो आहे सर्व सुखाने हे श्रीमुख तेजस्वी व शोभिवंत दिसत आहे. २ पौर्णिमेच्या कोटी चंद्रांच्या कळा याच्यापुढे फिक्याच वाटतील. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या सुंदर मूर्तीकडे पाहताच दृष्टी सुखावून गेली आहे. ती तेथून परत माघारी फिरतच नाही. ४ ४७६ पतित पतित । परी मी त्रियाचा पतित ॥ १ ॥ परी तूं आपुलिया सत्ता । मज करावे सरता ॥ २ ॥ नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि ॥ ३ ॥ अपराधाचा फेलो । तुका म्हणे किती बोलों ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सरता-परिपूर्ण, त्रियाचा-तीन वेळा. अर्थ:- देवा, मी पतित आहे असे त्रिवार, तीन वेळा मी म्हणत आहे. १ पण तू तुझी सत्ता गाजवून मला परिपूर्ण करावे माझे पाप दूर करावे २ माझे चित्त शुद्ध नाही. तुझ्या पायांशी बुद्धिही स्थिर होत नाही. ३ देवा, मी अपराधाचाच जणू बनलो आहे आणखी तुला सांगू तरी किती ? ४ ४७७ उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥ १ ॥ देव बैसले सिंहासनीं । आल्या याचका होय२ धनी ॥ २ ॥ एकाच्या केंवाडें । उगवे बहुतांचें कोडें ॥ ३ ॥ दोहीं ठायीं तुका । नाहीं पडों देत चुका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - केंवाडे-कैवारे, अंगीकार अर्थ:- या देवाने अभयासाठी हात वर केला आहे. सर्व जगात ही गोष्ट समजून आली आहे, १ हा देव आज सिंहासनावर बसून शोभत आहे. जो याचक भक्त येईल त्याचा तो धनी बनत आहे. २ एकाच्या अंगीकारामुळे त्याने पुष्कळांना निवारण दिला आहे पुष्कळांच्या आयुष्याचे कोडे सोडविली आहेत. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या देवाच्या व त्याच्या भक्ताच्या ठिकाणी मी कधी चुका करीत नाही. किंवा हा चुका करू देत नाही ४ आशीर्वाद-अभंग ४७८-जीवेसाटीं यत्नभाव । त्याची नाव बळकट ॥ १ ॥ पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाहीं भवनदी ॥ २ ॥ विश्वासाची धन्य जाती । तेथें वस्ती देवाची ॥ ३ ॥ तुका म्हणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥ ४ ॥ ब्दार्थ व टीपा - सदेह-शंका. अर्थ :- कोणताही प्रयत्न जीव समर्पण करण्याच्या भावनेने करावा. तरच बळकट नावेचे स्वरूप त्या प्रयत्नास येते. १ या नावेतून तो पैलतीराला जाईल यात काहीच शंका नाही २ श्रीहरीवर विश्वास ठेवणाऱ्याची जात धन्य १ चंद्रकला, २ पुरे