सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 281, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२४८ सार्थ तुकारामगाथा होय त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष देवाचीच वस्ती असते ३ तुकाराम महाराज म्हणतात खरोखर भोळ्या भावाने भक्ती करणाऱ्याच्या स्वाधीन देव असतो ४ ४७९ आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची ॥ १ ॥ कल्याण तें असे क्षेम । वाढे प्रेम आगळें ॥ २ ॥ भक्तिभाग्यगाठी धन । त्या नमन जीवांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे हरिचे दास । तेथें आस सकळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - क्षेम-सुखदायक स्थिती आस-आशा अर्थ - ज्याच्या चित्तात देवाची अपार आवड असते त्यास पुढीलप्रमाणे आशीर्वाद असोत १ त्याचे कल्याण असावे त्याला सुखदायक स्थिती प्राप्त व्हावी देवाविषयींचे त्याचे प्रेम असेच विशेष रूपाने वाढावे २ ज्याच्या जवळ भक्तिभावाचे धन असेल त्या जीवाला माझा नमस्कार असो ३ तुकाराम महाराज म्हणतात जेथे हे हरीचे दास असतात त्याच्या ठिकाणी माझी सर्व आशा आहे ४ ४८० तया साटीं वेचू वाणी । आइकू कानीं वारता ॥ १ ॥ क्षेम माझे हरिजन । समाधान पुसता त्या ॥ २ ॥ परत्रींचे जे सांगाती । त्याची याती न विचारीं ॥ ३ ॥ तुका म्हणे धैर्यवंतें । निर्मळचित्तें सर्व्वीं तीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वेचू-खर्च करून, परत्रीचे-परलोकाचे, याती-जात अर्थ - पुढे दिलेल्या कार्यासाठी आम्ही आमची वाणी खर्च करू व कानांनी त्याचीच हकीगत आम्ही ऐकू १ माझे सर्व कुशल ते हरीचे दासच आहेत त्यांना विचारल्यास मला पूर्ण समाधान आहे २ परलोकीचे जे माझे सांगाती, सोबती आहेत त्याची जात मी विचारणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व हरीचे सेवक मोठे ध्येयवंत व निर्मळ असे आहेत ४ ४८१ अभय उत्तर सती केले दान । जाले समाधान चित्त तेणे ॥ १ ॥ आता प्रेमरसे न घडे खंडण । द्यावे कृपादान नारायणा ॥ २ ॥ आले जें उचित देहविभागासी । तेणे पायांपासीं उभी असो ॥ ३ ॥ तुका म्हणे करी पूजन वैखरी । बोबडा उत्तरीं गातो गीत ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वैखरी-वाणीन अर्थ - तू काही भिऊ नकोस अशा शब्दांनी या संतांनी मला अभयदान दिले आहे त्यामुळे माझ्या मनास फार समाधान झाले आहे १ आता या भक्तिप्रेमाच्या रसास खड पडणार नाही नारायणा, हीच कृपा आपण मला द्यावी २ या देहाचे म्हणून जे जे उपचार असतील ते सर्व कर्तव्य म्हणून आम्ही करू याच्यासाठी आम्ही आपल्या पायाशी उभे आहोत ३ तुकाराम महाराज म्हणतात मी देवाची पूजा माझ्या वाणीने करीत असतो व माझ्या बोबड्या वाणीने त्याचे गीत गात असतो ४ ४८२ असो मनहीन क्रिया । नका चर्या विचारू ॥ १ ॥ सेवेमधीं जमा धरा । कृपा करा शेवटीं ॥ २ ॥ विचारूनि ठाया ठाव । येथें भाव राहिला ॥ ३ ॥ आता तुक्यापाशीं हेवा । नाहीं देवा तातडी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चर्या-रोजचे आचार, दिनचर्या