भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 282, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 282

सार्थ तुकारामगाथा २४१ अर्थ :- देवा, आम्ही मंत्रतंत्र जाणीत नाही, आम्हांस विधिपूर्वक क्रियाकर्म माहीत नाही. त्यासंबंधी आम्हांस काही विचारू नकोस. तरीसुद्धा तुला विनंती अशी की आमच्या दिनचर्येचा तू फार विचार करू नकोस २ आमचे जे काही कमी पडेल ते आमची जी सेवा तुमचेकडे रुजू आहे त्यात जमा करून घ्यावे; व शेवटी आमच्यावर कृपाच करावी. ३ देवा, आता या तुकारामापाशी कसलाही हेवादावा नाही, कसलीही हाव नाही किंवा कशाच्याही विषयी घाई नाही. ४ ४८३ ऐकें वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥ १ ॥ कर जोडितों कथाकाळों । आपण असावें जवळी ॥ २ ॥ घेईं ऐसी भाक । मागेन जरि कांहीं आणिक ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुका^१ राखावा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कमळापती-श्रीविष्णू, रंकाची-गरीबाची, भाक-वचन. अर्थ :- कमळापती विष्णू, माझे एवढे वचन ऐका ना. माझी गरिबाची एक विनंती ऐका १ कथेच्या वेळी हात जोडून मी विनवितो की आपण मजजवळ असावे. २ याशिवाय मी आणखी काही दुसरे मागणार नाही असे वचन देतो देवा ३ तुकयाबंधू म्हणत आहे, देवा एवढे वचन पूर्णपणे राखावे. ४ ४८४ आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥ १ ॥ लाहो करा वेगीं स्मरा । टाळी भाउनि^२ विश्वंभरा ॥ २ ॥ जालिया अवसान । न संपडती चरण ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे थोडे । अवधि उरली आहे पुढें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लळिताची-फजितीची, लाहो-लाभ, अवसान-शेवट अर्थ:- एकदा का फजितीची वेळ आली की मग काही उरत नाही. म्हणून सावध असा. १ पटकन त्या ईश्वराचे स्मरण करून त्याचा लाभ करून घ्या. त्या विश्वंभरास टाळी वाजवून संतुष्ट करा. २ एकदा का देहाचे पतन झाल्यावर मग काही या ईश्वराची पावले दिसणार नाहीत. ३ तुकयाबंधू म्हणत आहे, या गोष्टीस दिवस काही फार उरले नाहीत थोडाच अवधी आहे. ४ ४८५ नेणें गाऊं कांहीं घड बोलतां वचन ।^१ कायावाचामनेंसहित आलों शरण ॥ १ ॥ करीं अंगीकार नको मोकलूं हरी । पतितपावन ब्रिदैं करावीं खरीं ॥ २ ॥ नेणे भक्तिभाव तुझा म्हणवितों दास । जरि देसी अंतर तरि लज्जा कोणास ॥ ३ ॥ म्हणे तुकयाबंधु तुझे धरियेले पाये । आतां कोण दुजा ऐसा आम्हांसी आहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपाः- अंगीकार-स्वीकार, मोकलूं-दूर करु, ब्रीदें-प्रतिज्ञा. अर्थ - देवा, मला कांही सुस्वर गळ्याने गाता येत नाही. धड चार शब्द बोलता येत नाहीत. कायावाचा- मनासहित मी तुम्हांस शरण आलो आहे. १ तेव्हा माझा तुम्ही स्वीकार करावा. श्रीहरी, मला तुम्ही दूर करू नये पतिताला पावन करण्याची तुमची प्रतिज्ञा आहे. हा तुमचा लौकिक तुम्ही खरा करून दाखवावा. २ देवा, मी १ इतुकाचि, २ वाहोनि तु. गाथा ..३२