भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 284, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 284

सार्थ तुकारामगाथा २५१ शब्दार्थ व टीपा :- पोरी-मोठी, आस-इच्छा, आसार, निरवावें-सोपवावे. अर्थ :- देवा, तुझ्याविषयीचे उचित असे प्रेम माझ्या हृदयात निर्माण होऊ दे. १ हेच दान देवा, मी तुला मागायला आलो आहे. मला तुझी फार मोठी आशा आहे. २ देवा, मी तुझे चिंतन जेव्हा करीन तेव्हा तुझीच सेवा माझ्या हातून व्हावी. ३ तुकयाबंधू म्हणत आहे, देवा, तुझ्याविषयीच्या भावाजवळच मला सोपवावे. तो भाव सतत माझ्या चित्तात असावा. ४ ४८८ गाऊं वाऊं टाळी रंगों नाचूं उदास । सांडोनि भय लज्जा शंका आस निरास ॥ १ ॥ बळियाचा बळी तो कैवारी आमुचा । भुक्तिमुक्तिदाता सकळां ही सिद्धींचा ॥ २ ॥ मारूं शब्दशस्त्रबाण निःशंक अनिवार । कंटकांचा चुर शिर फोडूं काळाचें ॥ ३ ॥ म्हणे तुकयाबंधु नाहीं जीवाची चाड । आपुलिया तेथें काय आनिकांची भीड ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कंटकांचा-दुष्टांचा, चुर-चुरा, शिर-डोके अर्थ :- श्रीहरीच्या भक्तिप्रेमाच्या रंगात येऊन, टाळी वाजवून त्याचे नाम गाऊ. त्याच्या नादात उदास वृत्तीचे होऊन नृत्य करू. यावेळी लौकिकाची आशा, भीती, लाज, शंका, इच्छा, निराशा इत्यादी वृत्तींचा त्याग करू. १ सर्व बलवंतांचा बलवंत असणारा हा श्रीहरी आता आमचा कैवारी झाला आहे. तोच आम्हांस भक्ती, मुक्ती देणार असून सर्व सिद्धी त्याच्याच कृपेने आम्हांस प्राप्त होणार आहेत. २ आता कुणाचीही शंका व भीती न धरता शब्दशस्त्रांच्या व तीक्ष्ण बाणांच्या साहाय्याने दुष्टांचे चूर्ण करून टाकू प्रत्यक्ष काळाचेही डोके आम्ही फोडू. ३ तुकयाबंधू म्हणत आहे, या बाबतीत आम्हाला आमच्या जीवाची काही पर्वा नाही. येथे इतरांची भीड धरण्याचे कारण तरी काय आहे ? ४ ४८९ सांडूनि वैकुंठ । उभा विटेवरी नीट ॥ १ ॥ आला आला रे जगजेठी । भक्ता पुंडलिकाचे भेटी ॥ २ ॥ पैल चंद्रभागे तीरीं । कट धरूनियां करीं ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे अंबर । गजर होतो जयजयकार ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सांडूनि-सोडून, अंबर-आकाश अर्थ :- प्रत्यक्ष वैकुंठ सोडून हा श्रीहरी या पृथ्वितलावर येऊन एका साध्या विटेवर उभा राहिला आहे. १ हा जगन्नायक या भक्त पुंडलिकासाठी या भूमीवर आला आहे २ चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर कमरेवर हात ठेवून हा उभा आहे. ३ तुकयाबंधू म्हणत आहे की, याच्या जयजयकाराने सारे आकाश भरून गेले आहे. ४ ४९० कृपाळु भक्तांचा । ऐसा पति गोपिकांचा ॥ १ ॥ उभा न पाचारितां दारी । न सांगतां काम करी ॥ २ ॥ भाव देखौनि निर्मळ । रजां बोडवी कपाळ ॥ ३ ॥ तुकयाबंधु म्हणे न भजा । कां रे ऐसा भोळा राजा ॥ ४ ॥