सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 285, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२५२ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा - पाचारितां-बोलाविता, रजां-धूलिकणासाठी, घोडवी-पुढे परितो अर्थ - हा गोपियांचा पती श्रीहरी आपल्या भक्तावर मोठा कृपाळू आहे १ न बोलविताही हा भक्ताच्या दारात त्याच्या साह्यार्थ उभा असतो न सांगता तो त्याचे काम करीत असतो २ आपल्या भक्ताच्या मनातील निर्मळ भाव पाहून हा देव त्याच्या चरणांच्या धूलिकणासाठी आपले कपाळ पुढे करीत असतो ३ तुकयाबंधू असे म्हणत आहे की, अशा या मोकळ्या देवाच्या राजास तुम्ही का नाही भजत ? ४ ४९१ केला अंगीकार पंढरीच्या देवे । आता काय करिती काळ मशक मानवे ॥ १ ॥ घातलीं बाहेर तों भय होते ज्याने । बैसला आपण तेथें घालुनिया ठाणे ॥ २ ॥ लागे नेदी वारा दुजियाचा अंगासी । हा पुरता निर्धार कळो आला आम्हासी ॥ ३ ॥ म्हणे तुकयाबंधु न लगे करावी चिंता । कोणेविशीं आतां बैसलो हस्तीवरी माथा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अंगीकार-स्वीकार, मशक-चिलट, निर्धार-निश्चय अर्थ - आता या पंढरीच्या देवाने एकदा माझा स्वीकार आपला म्हणून केल्यावर आता कसली भीती ? आता तो प्रत्यक्ष काळसुद्धा क्षुद्र चिलटासारखा मानावा १ शरीरात कामक्रोधादिक वृत्ती ज्या भीती निर्माण करणाऱ्या होत्या त्याना बाहेर घालवून तो स्वतःच हृदयामध्ये ठाण मांडून बसला आहे २ दुसऱ्या कुठल्याही वाऱ्याचा स्पर्श अंगास होऊ नये म्हणून हा काळजी घेत असतो हा त्याचा निश्चय आम्हास पूर्णपणे समजला आहे ३ तुकयाबंधू म्हणत आहे की, आता आम्हास कसलीही चिंता करावी लागत नाही याच्या कृपेने आम्ही आता जणू हत्तीच्याच मस्तकावर बसलो आहोत एवढे श्रेष्ठ झालो आहोत ४ विवरण - एकदा ईश्वराने आपला स्वीकार केल्यावर मग आपणास कसलीही चिंता उरत नाही हा भाव संतांच्या अभंगात वारंवार प्रकट झालेला आहे मज का लागणे करावा विचार। ज्याचा भारभार त्याच्या माथा' असा निर्वाळा तुकोबांनी इतरत्र दिलेला आहे आपल्या भक्ताचे सर्व दाढी कोडकौतुक परमेश्वर करतो त्याची टाच हृदयावर धारण करण्यात परमेश्वरास धन्यता वाटत त्याला आपल्या माथ्यावरील मुकुट वरून नाचण्यात तो तृप्त होतो 'तैसा मी वाचूनि कांहीं । आणिक गोमटेंचि नाहीं । मजचि नाम पाहीं । जिणे या ठेविलें ॥ ऐसे अनन्य गतिके चित्तें । चिंतितसाते माते । जे उपासिती त्यातें । मीचि सेवी ॥ आपुली तहानभूक नेणे । तान्हया निके तें माउलीसीचि करणे । तैसे अनुसरले जे मज प्राणे । तयांचे न काइसेनिहि न लजे मो?' इतकी चिंता ईश्वर आपल्या भक्ताची करीत असता आपल्या हृदयाचा पिंजरा करुनच जणु तो त्यास जपत असतो एखादा भक्त शरीराने विकल असेल तर त्याची काळजी भगवंत अधिकच घेतात अशी साक्ष आहे ' देहदुबळ्याचा वारा । क्षणे लागेल या सुकुमारा । म्हणोनि आत्मबोधाचे पांजिरा । सुर्ये तयाते' असे श्रीज्ञानेश्वरांनी भगवंताच्या मुखातील वक्तव्य प्रकट केले आहे एकदा या परमेश्वराने हृदयामध्ये स्थान केले, तथे निवास केला म्हणजे मग तुकारामबुवा म्हणतात त्याप्रमाणे कामक्रोधादी वृत्ती निघून जातात त्याचे वास्तव्यच तिथे उरणार नाही याविषयीही ज्ञानदेवांनी निर्णय दिला आहे 'तैसा हृदयामध्ये मी रामु । असता सर्वसुखाचा आरामु । का भ्रातासि कामु विषयपायरी' मी एकदा हृदयात असता तेथे कामादिव वृत्तीच उमटणार नाहीत असा भावार्थ एकनाथांनीही भागवतात म्हटले आहे, ' जेथें भी श्रीढे आत्मारामु । तेथ केवी रिघे बापुडा कामु ? जेथ मी रमेँ पुरुषोत्तमु । तेथें कामकर्म रिघेना ।'