सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 290, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २५७ शब्दार्थ व टीपा- आंचवण देणे-पाणी सोडणे, सुरग-रंगीत अर्थ - शब्दांचीच रत्ने व त्याचे अलंकार करून मी या विश्वंभराचे पूजन केले १ भक्तिभावाने अंत- करणपूर्वक उपचार करून मी भगवंतास, नारायणास भोजन घातले आहे २ मी या प्रभूसाठीच माझ्या संसारावर हाताने पाणी सोडले आहे. हेच प्रभूसाठी आचवण आहे माझे मन हीच मुखशुद्धी म्हणून मी त्यास अर्पण केले आहे. ३ श्रीहरीच्या भक्तीने रंगलेली इंद्रिये हाच गुणी एक विडा मी प्रभूंस दिला आहे त्याच्या मस्तकावर तुळसीदल अर्पण केले आहे ४ तुझ्याविषयीचा एकाग्रभाव हाच मी दीप लावून निराजन सिद्ध केले आहे मी आपल्या देहाचे आसन देवा, तुला समर्पण केले आहे ५ या माझ्या देवास माझ्या हृदयरूपी माजघरात झोपवून न बोलता त्याची चरणसेवा मी करीत आहे ६ ५०५ उठोनिया तुका गेला निजस्थळा । उरले राउळा माजी देव ॥ १ ॥ निउल जाले सेवका स्वामींचे । आज्ञे करुनी चित्त समाधान ॥ २ ॥ पहुडलिया हरी अनंतशयनावरी । तेथें नाहीं उरी कांहीं काम ॥ ३ ॥ अवघी बाहेर घालूनि गेला तुका । सागितले लोका निजले देव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - राउळा माजी-देवळामध्ये, निउल-नवल अर्थ - शेजारतीचा सर्व प्रकार झाल्यावर तुकारामबुवा हे आपल्या राहण्याच्या ठिकाणी गेले आणि देवळात एकटा देवच उरला १ या स्वामींचे व तुकोबासेवकाचे जे रहस्य या वेळी जमले होते ते एक नवलच होय. त्याच्या आज्ञेवरून या भक्ताच्या चित्ताचे समाधान झाले २ श्रीहरी अनंतशय्येवर पहुडले आहेत; आता येथे काही काम उरले नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांना मी मंदिराबाहेर घालविले व त्यांना देव आता झोपले आहेत असे सांगितले ४ विवरण - अभंग क्र ४६७ पासूनचे बहुतेक सबंध अभंग शेजारतीच्या प्रसंगी म्हटले जातात आवडत्या दैवताच्या उपासनेचे, पूजेचे, स्तवनाचे जे अनेक प्रकार आहेत त्यात आरती हा प्रकार महत्त्वाचा आहे आरती म्हणजे देवास धूपदीपांनी मनोभाव ओवाळून गीतात त्याची स्तुती करणे, त्याचे गुणवर्णन करणे या आरतीचेही काकड आरती, दुपारती, शेजारती असे काही प्रकार असून मराठीत याचे विषयीही भरपूर वाङ्मय विविध प्रकारचे आहे आराध्य दैवताचे एकदा सगुणरूप मान्य झाले म्हणजे त्याच्या पूजनाचे, उपासनेचे, गुणस्तवनाचे विविध प्रकार आपोआपच आले षोडशोपचारे पूजन आले देवास नाना अलंकारांनी नटवावे, थटवावे त्याच्या सर्व लीलांचे मानवीकरण करून त्या भावात दंग राहावे हे भक्ताच्या दृष्टीने ओघानेच आले तुकोबांच्या या शेजारतीच्या अभंगातून त्यांनी अत्यंत भक्तियुक्त अंत करणाने संध्याकाळी देव झोपी जात आहेत अशी कल्पना करून मोठ्या कळकळद्याने, विनयाने, प्रासादिक वृत्तीने या अभंगाची निर्मिती केली आहे तुकोबांच्या मनाची सारी कोवळीक व हळुवार वृत्ती या अभंगातून प्रकट झालेली आहे अभंग शेजारतीचे असले तरी एकदा भक्तीच्या रंगात भक्त रंगून गेला की मग देवाची सारी दिनचर्याच त्या थाटात रात्रौत असतो रत्नजडित सिंहासनावर देव बसला आहे आणि तुकाराम सेवकाप्रमाणे पादुका घेऊन उभा आहे स्वयपाकाची तयारी झाली असून रखुमाई देवाची वाट पाहात आहे गोपिका पाण्याचे कलश घेऊन उभ्या आहेत, नाना रंगाच्या फुलांनी शेज सजून तयार आहे, ताटात रत्नदीप उजळले आहेत, पायघड्या घालून बनमाळी चालत असून त्याच्या कुकुमाच्या पावलाचे ठसे भूमीवर उमटले आहेत, देवानी उष्णोदकानी स्नान केले असून रुक्मिणी त्याचे अंग पुसून कोरडे करीत आहे, देवानी रेशमी अथवा जरोधठी पीतांबर नेसला आहे जेवण करून देव पलंगावर आनंदाने पहुडले आहेत, तुकारामादी संत मग उरलेल्या घासासाठी आमुकलेले आहेत, रखुमाईसहित विठ्ठल पलंगी असून तुकास्वामी हातात टाळवीणा घेऊन 'आवडी उत्तरे' गात आहे देवा, आता उठा पाहू, निद्रा करा रुक्मिणी पलंगाशी वाट पाहात आहे, स्वामी, आता तुम्ही सुखाने निद्रा करा इत्यादी वचने तुकोबांनी म्हणणे, शब्दाच्या रत्नांनी या विश्वंभराची पूजा करणे, मुखशुद्धीस मन समर्पित करणे, रंगलेल्या इंद्रियांचा तु गाथा ३३