सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 291, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२५८ सार्थ तुकारामगाथा तांबूल देणे, माथ्यावर तुळसीदल समर्पिणे, देहाचे आसन देणे, हृदयाच्या माजघरात देवास झोपविणे आणि न बोलोनि देवाची चरणसेवा करणे इत्यादी विविध भावछटातील कोमल वृत्ती तुकोबाच्या भक्तिप्रेमाची साक्ष पटविणाऱ्या आहेत दसरा - अभंग १ ५०६ पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सापडला तो साधा आजि मुहूर्त बरा । गर्जा जयजयकार हरि हृदयीं धराँ । आळस नका करूं लहाना सांगतो थोरां ॥ १ ॥ या हो या हो वाइयानो निघाले हरी । सिलगणा वेगें घेउनि आरत्या करीं । ओवाळू श्रीमुख वंदू पाउले शिरीं । आम्हा देव आले येथें घरिच्या घरीं ॥ २ ॥ अक्षय मुहूर्त ओटामध्ये साधे ते । मग येरी गर्जे जैसे तैसे होत जाते । म्हणोनि मागें पुढें कोणी न पाहावें येथें । साडा परते काम जाऊ हरी सांगाते ॥ ३ ॥ बहुता बहुता रीती चित्तीं धरा हे मनीं । नका गे करू आइकाल ज्या कानीं । मग हे सुख कधीं न देखाल स्वप्नीं । उरेल हायहाय मागें होईल कहाणी ॥ ४ ॥ ऐसियास वचती त्याच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार । मग हे वेळ घटिका न ये अजरामर । फळले अमो द्या मग पडतील विचार ॥ ५ ॥ जयासाठीं ब्रह्मादिक जालेति पिसे । उच्छिष्टा कारणे देव जळीं जाले मासे । अर्द्धांगी विश्वमाता लक्ष्मी वसे । तो हा तुक्यावधु म्हणे आले अनायासे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीका - सिलगणा-सीमोल्लंघन, ओटामध्ये-साडेतीन मुहूर्तांपैकी एक, पिसे-वेडे, अर्धांगी- पत्नी हे पतीचे अर्धांग मानले जाते या अर्थाने लक्ष्मी अर्थ - आमचा हा दसऱ्याचा दिवस फार चांगला व उत्तम असा आहे हा मुहूर्त बरा सापडला असे समजून श्रीहरीचे नाम हृदयात धारण करा त्याची गर्जना जयजयकाराच्या स्वरूपात करा आळस करू नका मी हे सर्व लहान थोर लोकांना सांगत आहे १ या बायानो या तुम्ही श्रीहरी आज दसऱ्याच्या निमित्ताने सिलगणास निघाले आहेत लौकर आरती घेऊन या तुम्ही या श्रीहरीचे मुख आपण भक्तिभावाने ओवाळू, याची पाऊले वंदन करू आपल्या घरच्या घरीच हा थोर देव आपणास प्राप्त झालेला आहे २ साडेतीन सणातील दसरा हा एक महत्त्वाचा व अक्षय असा मुहूर्त आहे त्यावर जे काही साधावयाचे असेल ते साधून घ्या तुम्ही बाकीचे मुहूर्त असे तसेच असतात म्हणून मागेपुढे न पाहता दुसरी कामे सोडून या हरीच्या संगतीत या ३ पुष्कळ रीतींनीं याच श्रीहरीचे नाव मनात धरा ज्यांनी कोणी याचे नाव कानांनी ऐकले असेल त्यांनी याविषयी हयगय करू नये कारण मग हे सुख स्वप्नातसुद्धा कोणास दिसणार नाही उगाच हायहाय करण्याची परिस्थिती मात्र मागाहून निर्माण होईल ४ अशा या हरीस जे बचतील त्याच्या दुर्दैवास सीमा उरणार नाही असे मी त्रिवार गर्जून सांगत आहे मग अशी ही अजरामर घटना पुन काही येणार नाही हे सर्व तुम्ही नीट ध्यानात घ्या नाही तर मग पुन विचारात पडाल ५ या देवासाठी ब्रह्मादिक देवही वेडे झाले असून याचे उष्टे मिळावे म्हणून स्वर्गचे देवही पृथ्वीवरील पाण्यात माशाच्या जन्मास येतात विश्वमाता लक्ष्मी ज्याची पत्नी आहे असा हा योग तुक्यावधू म्हणत आहे की अनायासे लाभला आहे ६ विवरण - तुकोबा किंवा तुक्यावधू कान्होबा याचा हा दसऱ्यावरील अभंग असून याचा अर्थ रूपकात्मकही लावण्यात येतो दशेन्द्रियाचा हा दसरा मुहूर्त अशा अर्थाने मधी याचा अर्थ लावण्यात येतो परंतु दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक उत्तम असल्याने या सुप्रसंगी ईश्वरास मनात साठवून त्याची भक्ती करा हा साधा अर्थ अधिक समर्पक व उद्बोधक वाटण्यासारखा आहे हिंदू परंपरेत आश्विनातील नवरात्रानंतर येणाऱ्या दसऱ्याचा मुहूर्त अनेक