सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 292, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २६९ शरणासाठी प्रसिद्ध आहे याच दिवशी दस्त्रस्त्राचे पूजन करून शत्रूचा नाश करण्यासाठी सीमेचे उल्लघन होत असे विद्येच्या उपासनेचाही याच दिवशी प्रारंभ होत असे कौल्य नावाचा ब्राह्मणपुत्र रघुराजाकडे दान मागण्यासाठी आला होता नुकताच विश्वजित् यज्ञ करून रघुराजान आपला खजिना रिकामा केला होता परंतु आलेल्या ब्राह्मणास विन्मुख करून पाठवावयाचे नाही असे ठरवून रघूने कुबेरावर स्वारी केली. कुबेराने भयभीत होऊन नगराबाहेर शमीच्या वृक्षावर सुवर्णाची वृष्टी केली. चौदा कोटी सुवर्णमुद्रा कौत्स्यास मिळाल्या हा दिवस दसऱ्याचाच होता या वेळेपासून दसऱ्यास सोने लुटण्याची प्रथा रूढ झाली असावी. असेही सांगतात की, प्रभू रामचंद्रांनी लंकेवर स्वारी करण्यासाठी याच दिवशी प्रयाण केले अशा रीतीने हा दिवस पराक्रमाचा, विद्यार्जनाचा, धनार्जनाचा म्हणून पवित्र व महत्त्वाचा मानला जावा वर्षप्रतिपदा, अक्षय्यतृतीया, विजयादशमी किंवा दसरा हे तीन पूर्ण व बलिप्रतिपदा हा अर्धा असे साडेतीन मुहूर्त प्रसिद्ध आहेत या महत्त्वाच्या दिवशी श्रीहरीच्या पाउलांना वंदन करून हा मुहूर्त साधा असा भावार्थ या अभंगाचा वाह् ५०७ ओवाळू आरती' पंढरीराया । सर्वभावे शरण आलो तुझिया पाया ॥ १ ॥ सर्व व्यापून कैसे रूप आकळ । तो हा गौळ्या घरी झाला कृष्ण बाळ ॥ २ ॥ स्वरूप गुणातीत झाला अवतारधारी । तो हा पाडुरंग उभा विटेवरी ॥ ३ ॥ भक्तीचिया काजा कैसा रूपास आला । ब्रिदाचा तोडर' चरणी मिरविला ॥ ४ ॥ आरते आरती ओवाळिली । वाखाणिता कीर्ति वाचा परतली ॥ ५ ॥ भावभक्तित्वळे होसी कृपाळू देवा । तुका म्हणे पाडुरगा तुझ्या न कळती मावा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - काजा-तारणासाठी, आकळ-न समजण्यासारखा, ब्रिदाचा-वडघासारख्या दागिन्याचा, तोडर-नोडर, आरतें-मनोभाव, मावा-माया अर्थ – पंडरीराया, तुझी आरती मी मनोभावे ओवाळीत आहे मी सर्वभावाने तुला, तुझ्या पायाना शरण आलो आहे १ तू सर्वत्र व्यापून असतास तरी तुझे रूप वळू। येत नाही परंतु हा अनारूपनेष ईश्वर गोकुळात गवळ्याच्या घरी कृष्णरूपाने बाळ होऊन आला आहे २ रूपातीत व गुणापलीकडचा असणारा हा अवतारधारी पाडुरंग भक्तासाठी विटेवर उभा राहिलेला आहे ३ भक्तीच्या कारणासाठी हा या सगुणरूपात झाला याने पायात वडघासारखा दागिना घातलेला आहे ४ यान मोठ्या भक्तिभावाने मी आरती ओवाळीत आहे याची कीर्ती वर्णन करताना वाणीही परत फिरते ५ भावभक्तीच्या मुळे देवा, तू फार कृपाळू होतोस तुकाराम महाराज म्हणतात, पाडुरंगा, तुझी माया कधी ध्यानात येत नाही ६ ५०८ करूनि आरती आता ओवाळूं श्रीपती ॥ १ ॥ आजि पुरले नवस । धन्य झाला हा दिवस ॥ २ ॥ पाहा वो सकळा । पुण्यवता तुम्ही बाळा ॥ ३ ॥ तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - बाळा-या बालरूप देवास, पाहे-वात्रविना अर्थ - आता आरती करून या श्रीपतीला ओवाळू या १ आज माझे सर्व नवस पूर्ण झाले असून आजचा हा दिवस मला धन्यतेचा वाटतो आहे २ तुम्ही सर्व पुण्यवंत आहात, या बालरूप देवास आज नीट पाहा ना ३ तुकाराम आनंदाने आज टाळो वाजवीत आहे हा देवाच्या अगदी जवळ होता ४ ५०९ घाल माझ जरी' पडेन मी पाया । दडयत वाया कोण वेची ॥ १ ॥ आले ते हिशोवे' अवघिया प्रमाण । द्यावे तरी दान मान होतो ॥ २ ॥ १ माझ्या, २ तारडू, ३ तरी, ४ ही शोभे