भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 293, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 293

२६० सार्थ तुकारामगाथा मोकळिया मनें घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही जालिया कृपण । नामाची जतन मग कैंची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- धार्या-फुकट, कृपण-कंजुष. अर्थ :- देवा, तुम्ही कृपेची माळ मला द्याल तरच मी तुमच्या पायां पडत आहे. उगाच फुकट दंडवत कुणास करावा ? १ जे हिशेबाने द्याल ते प्रमाण मी मानून राहीन. जे दान द्याल तो मान म्हणून मी स्वीकारीन २ मोकळ्या मनाने माझी सेवा घ्यावी व आपला कृपाप्रसाद लवकर पाठवावा. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्हीच कृपण झाल्यावर मग पतितपावन या तुमच्या नामाची जपणूक कोण करणार ? त्यासाठी तरी तुम्ही माझ्या- वर कृपा करावी. ४ ५१० तुम्हीं जायें निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा ॥ १ ॥ विठोबा लोभ असों देईं । आम्ही असों तुमचे पाईं ॥ २ ॥ चित्त करी सेवा । आम्ही जातों आपुल्या गांवा ॥ ३ ॥ तुका म्हणे दिशा भुलों । फिरोन पायापाशीं आलों ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पाईं-पायावर अर्थ :- देवा, तुम्ही आता आपल्या मंदिरात जावे. आम्हीही आमच्या घरी जाण्यासाठी निघतो. १ देवा, विठोबा, आमच्यावर लोभ असू द्यावा तुमच्या पायावर आमचे जीवन सर्वस्वी आहे. २ आम्ही आमच्या गावास निघालो असलो तरी आमचे चित्त आपल्याच सेवेत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या गावात निघालो असलो तरी दिशा चुकून तुमच्याच पायाशी परत आलो असे होईल. ४ ५११ पाहे प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट ॥ १ ॥ शेष घेऊनि जाईन । तुमचें जालिया भोजन ॥ २ ॥ जालो एकसया । तुम्हां आडुनियां देवा ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्त । करुनि राहिलों निश्चित ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - शेष-उरलेमुरले, एकसया- एकरूप अर्थ :- देवा, मी तुमच्या प्रसादाची वाट पाहात आहे तुमचे भोजनाचे ताट मला धुऊन द्यावे. १ तुमच्या भोजनानंतर जे उरलेमुरले असेल ते मी घेऊन जाईन. २ देवा, तुमच्या आडून मी असलो तरी तुमच्या रूपाशी मी एकत्व पावलो आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी आपले चित्त चिंताविरहित करून मी निवांत राहिलो आहे ४ ५१२ केली कटकट गाऊं नाचो नेणता । लाज नाहीं भय आम्हां पोटाची चिंता ॥ १ ॥ बैसा सिणलेती पाय रगडू दातारा । जाणवून द्या वारा उब झाली शरीरा ॥ २ ॥ उशिरा उशीर किती काय म्हणावा । जननिये बाळका कोप कांहों न धरावा ॥ ३ ॥ तुझिये सगतीं 'आम्ही करूं कोल्हाळ । तुका म्हणे बाळें अवघीं मिळोन गोपाळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सिणलेती-दमलात, कोप-राग, कोल्हाळ-गोंगाट, गडबड, गर्जना अर्थ :- देवा, मी अज्ञानाने तुमच्याबद्दल काही न समजता नाचून, गाऊन कटकट केली. देवा, आम्हास कसलीच लाज किंवा पोटाची चिंता राहिलेली नाही १ देवा, दातारा, तुम्ही फार दमलेले आहात. खाली बसा ना मी तुमचे पाय रगडून देऊ का ? तुमच्या शरीराला उकाड्याचा त्रास होत असेल तर देवा, मी वारा घाल १ येऊ