सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 299, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२६६ सार्थ तुकारामगाथा अर्थ - आम्ही त्या बलवान प्रभूचे बक्ति झालो असल्याने आम्ही पण त्याच्याइतकेच बलवान झालो आहोत १ आम्ही संसारास लाथ हाणून षड्रिपूचा अथवा षडूमींचा नाश केला आहे. २ लोक, आप्तस्वकीय, धन, शरीर याना आम्ही गवताप्रमाणे क्षुद्र मानले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, आणि आता तर आम्ही मुक्तीच्याही माथ्यावर उभे आहोत आम्हास मुक्तीची काही किंमत नाही ४ विवरण -याही अभंगात तुकोरावाच्या मनाचे सामर्थ्य प्रकट झाले आहे ईश्वराच्या सगतीने आपण एवढे बळवत झाला आहोत की मुक्तीचीही किंमत यापुढे त्याना वाटेनाशी झाली आहे माधुर्यताना मोक्षाची अथवा मुक्तीची महती भक्तीपुढे कधीच वाटत नाही ' सांडुनि सुखाचा वाटा । मुक्ति मागे तो करटा' असे तुकोबांनीच एके ठिकाणी म्हटले आहे जे बद्धताच मानायला तयार नाहीत त्यानी मुक्तीची वाटाघाट न करावी हेच युक्त होय. ५२२ मृत्युलोकी आम्हा आवडती परी । नाहीं एका हरिनामें विण ॥ १ ॥ विटलें हे चित्त प्रपंचापासूनी । वमन१ हे मनीं बैसलेसें ॥ २ ॥ सोनें रूपें आम्हा मृत्तिके समान । माणिके पाषाण खडे तैसे२ ॥ ३ ॥ तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हापुढें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - परी-प्रकार, वमन-वाती, आव रिसाचिया परी-अस्वलोप्रमाणे अर्थ - या मृत्युलोकात आम्हास एका हरिनामाशिवाय दुसरे कोणतेही प्रकार आवडत नाहीत १ या प्रपंचापासून आमचे चित्त पूर्णपणे विटून गेले असून एखाद्या वातीप्रमाणे घृणा त्याच्याविषयी आमच्या मनात बसली आहे २ सोने, रुपे, आम्हा हरिदासांना मातीप्रमाणेच वाटते आणि रत्ने, माणके दगडाच्या खड्याप्रमाणे वाटतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे या बायका आमच्यापुढे येणाऱ्या एखाद्या भयानक अस्लो- प्रमाणेच वाटतील ४ ५२३ स्त्रियाचा तो सग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥ १ ॥ नाठवे३ हा देव न घडे भजन । लाचावले मन आवरे ना ॥ २ ॥ दृष्टिसुखें मरण इंद्रियाच्या द्वारे । लावण्य ते खरे दु खमूळ ॥ ३ ॥ तुका म्हणे जरी अग्नि जाला साधू । परी४ पावे बाधूं संघट्टणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सग-महवास काष्ठा-लाकडाच्या, नाठवे-आठवत नाही अर्थ - नारायणा, या स्त्रियाची संगत मला नको ह्याचे रूपलावण्य कितीही असले तरी मी त्याना लाकडाच्या, दगडाच्या किंवा मातीच्या समानच मानीन १ कारण याच्या सगतीत देव कधी आठवत नाही, कधी भजन होत नाही , व लालचावलेले मन कधी आवरले जात नाही २ याच्या नुसत्या दृष्टीच्या सहवासानेही मरणच येते खरोखर अशा स्त्रियाचे सौंदर्य हे दुःखाचे मूळच समजावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, अग्नी हा साधू झाला तरी त्याच्याशी विशेष संघटन केल्यास त्यास आलिंगन दिल्यास अग पोळणारच. ४ ५२४ पराविया नारी ५रखुमाईसमान । हे गेले नेमून ठायींचेचि ॥ १ ॥ जाईं वो तू माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास नव्हो तैसे ॥ २ ॥ न साहावे मज तुझें हे पतन । नको हे वचन दुष्ट वदो ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पराविया-परक्याच्या, ठायींचेची-प्रथमपासूनच अर्थ -बाई, परक्याच्या स्त्रिया आम्हास रखुमाईमातेसमान आहेत. हा नियम आमचा प्रथमपासूनच ठरलेला आहे १ माते, तू परत जा आम्हाला गुंतविण्याचे प्रयत्न तू करू नकोस, आम्ही हरिभक्त त्या वश होणाऱ्याच्या १ बैसलेस मनी रामनाम, २ जैसे, ३ अंतरे, ४ तरी, ५ माउली