भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 300, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 300

सार्थ तुकारामगाथा २६७ जातीचे नाहीत, २ तुझे हे पापकृत्य मला सहन होत नाही. तुझ्या तोंडून येणारी ही दुष्ट वचनाची वाणी मला ऐकवत नाही तू असे बोलू नकोस ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुला जर पती हवाच असेल तर गावात इतर लोक का थोडे आहेत ? त्यांच्यातील एखादा निवड ना ४ विवरण - वरील दोन अभंगांना तुकोबांच्या आयुष्यातील एका विशिष्ट प्रसंगाचा आधार सांगितला जातो. कुणी एक स्त्री त्यांच्याकडे विषयसुखाच्या प्राप्तीसाठी आली होती. तिला उद्देशून या अभंगाची निर्मिती झाली असावी. तुकोबांचा लौकिक जसजसा वाढू लागला तसतसा त्यांच्या भोवती अनेक स्त्रीपुरुषांचा जमाव जमत असावा. तुकारामबुवांच्या मुखावरील तेज पाहून, त्यांच्यापैकी एका रूपवान स्त्रीच्या मनात भलतीच वासना निर्माण झाली. तिला उद्देशून तुकारामांनी आपल्या हरिभक्तीचे जे मर्म सांगितले आहे, ते सर्वच प्रापंचिकांना व साधकांना उपयुक्त आहे. मोह, काम, क्रोध या वृत्ती नैसर्गिक उभ्या, पण त्यांचा आविष्कार यथोचित मार्गाने होणेच युक्त आहे. त्यांचा स्वैर संचार व्यक्तीला व समाजाला अहितकारकच होय 'दुभत्याची स्त्री मातेसमान' हे एक ब्रीदवाक्य मराठी साधू- संतांचे व श्रीशिवरायांचे होते. यातील मर्म फार मोठे होते. स्त्रीने समाजाचे स्थैर्य व नैतिक आदर्श यांच्यावर राष्ट्राची उभारणी होत असते. या दोन्ही अभंगांकडे अगदी साध्या प्रपंचिकाच्या दृष्टीने पाहिल्यावरही त्यातील मथितार्थ पटण्याजोगा आहे असे दिसेल. ईश्वरचिंतनात व आत्मसुखात तल्लीन झालेल्या महात्म्याला या शुचितेची केवढी गरज आहे हे सांगावयास पाहिजे असे नाही. त्याची दृष्टीच निवडून गेलेली असल्यामुळे स्त्री सर्व सौंदर्य हरिरूप आहे, माऊलीरूप आहे, हा अधिकार प्राप्त होणे अवघड असले तरी याच आदर्शाप्रत सर्वांना जावयाचे असते. ‘स्त्रियांचा तो संग नको नारायणा’ असे तुकोबा म्हणतात त्यावरून संदर्भ न जाणता व त्या अभंगातील रहस्य न ओळखता तुकारामबुवांचा किंवा एकूण संतांचाच स्त्रीविषयक दृष्टिकोन किती खोटा व चुकीचा आहे याचे विवेचन करण्याकडे प्रवृत्ती काही आधुनिक टीकाकारांची असते, ती रीती व्यर्थ आहे. हे संतांच्या वचनाचा चार- बाजूने अर्थ पाहिल्याशिवाय ध्यानात येणार नाही. स्त्रीमोहवासना, स्त्रीसौंदर्याचा एक प्रकारचा तिरस्कारच संतांच्या मनात असतो हे वरवर दिसने हे खरे आहे. ‘नको नको स्त्रियांचा सांगात । नको स्त्रियांचा एकांत । नको नको स्त्रियांचा परमार्थ । करिती आघात पुरुषासी’ असे थोर प्रपंचिक संत एकनाथ यांनी तरी का म्हटले आहे ? ‘स्त्रीसंगा तडफडूनि जाण । वैराग्यासी ये मरण’, ‘तेथ वासना उपदेश जाण । आली नागवण परमार्था’, ‘ज्ञानी पोळी धरितां हातीं । तैशी स्त्रियाशी संगति ।’ इत्यादी अनेक ओवींतून एकनाथांनीसुद्धा स्त्रीसहवासाची निंदा केलेली दिसने खरी. तुकाराम व रामदास यांनीही स्त्रीदेहाची यथेच्छ टवाळी वरवर केलेली दिसते. मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई या थोर स्त्रिया भक्तिमार्गात फार मोठ्या पदावर आरुढ झालेल्या असताना मग स्त्रीबद्दल असे उद्गार काढतात, याचा स्पष्ट अर्थ असा की अतिरिक्त स्त्रीसहवास प्रपंचिकानाही बाधक आहे. केवळ स्त्री, केवळ विषयभोग, केवळ कामसुखाची चटक यापासून साध्या प्रपंचिकासही बाधा होणारी आहे आणि साधकास, मग तो फार मोठी ऐहिक ध्येय मिळविणाराही असो, स्त्रीलोभ अतिशिक्तपणे किती बाधक होईल हे काय सांगावयास हवे ? नटूनथटून तुकोबांसारख्याही सत्पुरुषाकडे येणाऱ्या स्त्रीस तुकोबांनी या स्त्रिया काष्ठाच्या, पाषाणाच्या, मूर्तिवेच्या मी मानीन असेच म्हणणे यथायोग्य नव्हे काय ? ‘परस्त्रीया सदा मातृप्रायहिणी’, ‘परद्रव्य परनारीचा अभिलाष । तेणोनिया म्हार सर्व भाष्या’, ‘विटाळ तो परद्रव्य परनारी’ अशा वचनाचा श्वासोच्छ्वासां वर्षाव करून समाजास मार्गदर्शन करणाऱ्या तुकोबांनी पुढे येणाऱ्या नटव्या स्त्रीस कुणीतरी पती निवडून संसार कर, असा उपदेश केला हे यथायोग्यच झाले असे मानावे लागने. तुकोबांच्या किंवा संतांच्या स्त्रीविषयक मनाचा निर्णय याही अभंगा- वरून आता घेता येण्यासारखा आहे. ‘कोमल ज्ञानीं विखो विघ्न’ असे श्रीचक्रधरांचेही एक सूत्र होते. कोणत्याही ध्येयाच्या साधनासाठी विषयाचे विघ्नच असते. अगदी रोजचा प्रपंच करणाऱ्यासन्ही त्याचा अतिरेक बाधक आहे. माझी बायको, माझी मुले यांचाच ध्यास घेणाऱ्या गाढव प्रपंचिकांची चित्रेही तुकोबांनी उत्तम रीतीने रेखाटली आहेत. सर मग विषयसुखार्थ बुवांच्याकडे येणाऱ्या या स्त्रीसंबंधी बुवांनी त्यांचा खडतर स्वभाव ध्यानात घेता सौम्यच भाषा वापरली आहे असे म्हणावे लागते.

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 300, कुल 611 में से · BharatKosha