सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 311, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २७७ को काय याविषयी तू सावध हो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे कर्मकांडाविरहित अथवा नैष्कर्म्य असणारे जे ब्रह्म आहे ते साधून घे. ४ ५५६ कांहींच मी नव्हें कोणिये गांवौंचा। एकट ठायाँचा ठायीं एक ॥ १ ॥ नाहीं जात कोठें येत फिरोनियां। अवघेंचि वांयांविण बोलणें ॥ २ ॥ नाहीं मज कोणी आपुलें दुसरें। कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥ ३ ॥ नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत। आहों अखंडित जैसे तैसे ॥ ४ ॥ तुका म्हणे नांवरूप नाहीं आम्हां। वेगळा ह्या कर्मा अकर्मासी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- ठायाँचा-मूळचा, ज्यावें-जगावे, कर्मअकर्म-विधिनिषेध अर्थ:-मी तसे पाहिले तर काहीच नाही. मी कोणत्या एका गावचा आहे असेही नाही. एकाच जागी असणारे जे काही आहे ते मी आहे १ मी कुठे जात नाही, आणि कुठून फिरूनही येत नाही. माझे सर्व हे बोलणेही व्यर्थच आहे. २ मला कुणी आपले नाही, मी तसा खरा कुणाचाच नाही ३ आम्हांला जगावे लागत नाही, मरावे लागत नाही, आम्ही जसे अखंडित आहोत तसेच आहोत. ४ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हांस नाव, रूप, काही नाही. या कर्मअकर्म किंवा विधिनिषेध त्याहूनही आम्ही वेगळेच आहोत. ५ लोहगांवास परचक्रवेढा पडला-अभंग ३. ५५७ न देखवे डोळां ऐसा हा आकांत। परपीडे चित्त दुःखी होतें ॥ १ ॥ काय तुम्ही येथें नसालसें जालें। आम्हीं न देखिलें पाहिजे हें ॥ २ ॥ परचक्र कोठें हरिदासांच्या वासें। न देखिजें देश राहिलािया ॥ ३ ॥ तुका म्हणे माझी लाजविली सेवा। हीनपणें देवा जिणें जालें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-आकांत-दुःखद प्रसंग, परपीडे-दुसऱ्याच्या दुःखाने, परचक्र-शत्रूचे राजकीय संकट अर्थ :- देवा, मला हा दुःखद प्रसंग आता पाहवत नाही. दुसऱ्यांना पीडा झाल्याने देवा, मला भारी दुःख होते १ तुम्ही काय येथे नाहीत असे झाले? पण हे संकट यापुढे आम्हांस दिसता कामा नये. २ हरिदासांचा निवास ज्या ठिकाणी आहे, त्या स्थानी असे परचक्र कुठून असणार? जेथे हरिभक्त राहतात, तेथे संकटांना वाव कुठला? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आजपर्यंत माझी सेवा लाजविलीत. देवा, या संकटाने माझे जिणे हीनपणाचे झाले आहे. ४ ५५८ काय म्यां मानावें हरिकथेचें फळ। तरिजे सकळ जनों¹ ऐसें ॥ १ ॥ उच्छेद तो असे हा गे आरंभला। रोकडें विठ्ठला परचक्र ॥ २ ॥ पापाविण नाहीं पाप येत पुढें। साक्षीसी रोकडें साक्ष आलें ॥ ३ ॥ तुका म्हणे जेथें वसतील दास। तेथें तुझा वास कैसा आतां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - तरिजे-रक्षण होते, उच्छेद-नाश, रोकडें-स्पष्ट अर्थ :- देवा, हरिकथेमुळे काय साधते असे मानावे ? असे हे परचक्र येते, की सर्व जनांचे रक्षण होते ? हरिकथेचे फळ कोणते मानावे ? १ आज तर विठ्ठला, सर्वांचा नाश तुम्ही आरंभिला आहे. या परचक्रावरून हे स्पष्टच दिसत आहे. २ पापावाचून पाप पुढे येत नाही, याचाच प्रत्यय या अनुभवाने येत आहे. ३ तुकाराम महा- राज म्हणतात, जेथे तुमचे दास राहतात तेथे तुमचे वास्तव्य असते असे आता मानावे तरी कसे ? ४ ५५९ भीत नाहीं आतां आपुल्या मरणा। दुःखी होतां जना न देखवे ॥ १ ॥ आमची तो जाती ऐसी परंपरा। कां तुम्ही दातारा नैंणों ऐसें ॥ २ ॥
- १ जन.