सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 312, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंभजनीं विक्षेप तेचि पैं मरण । न वजावा क्षण एक वाया ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव¹ मागें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नेणा-जाणीत नाही, विक्षेप-अडचण, आघाताचा-संकटाचा, ठाव-ठिकाण अर्थ - देवा, मी आता आपल्या स्वतःच्या मरणास भीत नाही, पण इतर लोक दुःखी कष्टी होतात ते मात्र पाहवत नाही १ आमची भक्तांची व हरिदासाची ही अशीच परंपरा आहे दातारा, देवा, तुम्हास का हे माहीत नाही ? २ आमच्या हरभजनात अडचण आली की आम्हास मरणाप्रमाणे वेदना होतात भजनाशिवाय एक क्षणही वाया जाऊ नये असे वाटते ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, कसल्याही संकटाचा वाराही लागू नये असे ठिकाण दातारा, मला आता दाखीव ४ विवरण - पुण्याच्या शेजारी येरवड्याच्या पलीकडे ईशान्येस नऊ मैलावर असणाऱ्या लोहगावी तुकारामबुवांचे कीर्तन ऐन रंगात आले असताना, त्या गावास परचक्राचा वेढा पडला त्या प्रसंगी तुकोबांच्या मुखातून हे अभंग प्रगट झाले आहेत तुकारामबुवांचा संबंध लोहगावी प्रथमपासूनच होता या गावच्या मोझे घराण्यात तुकोबांचे आजोळ असून त्यांची पहिली बायको रखुमाबाई ही याच गावची होती तुकोबांचे अनुयायी या गावी विशेष असल्याने त्यांचे कथाकीर्तनाच्या निमित्ताने तेथे विशेष जाणे येणे असल्यास नवल नाही या गावात तुकारामबुवांचे एक देऊळही आहे पंढरपूरहून आळंदीस येणाऱ्या वारकऱ्यांना लोहगाव आजही तुकारामतीर्थ म्हणून महत्त्वाचे वाटते 'मधुरेस कृष्ण जन्मला पाहीं । परी गोकुळींच्या सुखास पार नाहीं । तैसा तुकयाचा प्रेमा सर्वही । लोहगावीं लुटिला ।।' अशा शब्दात महीपतीबुवांनी तुकोबांचा लोहगावसंबंध वर्णन केला आहे बहुधा श्रावण महिन्यात तुकोबांची अनेक कीर्तने लोहगावात होत असत सन १६३६ च्या सुमारास मोगलांचे परचक्र पुणे भागात एकसारख येत राहिले शहाजीविरुद्ध महाजान, खानजमान, रणदुल्लाखान इत्यादीचे भय वारंवार निर्माण होई सन १६३६ च्या जून महिन्यात खानजमान याने पुण्याकडे सैन्यासह आपला मोर्चा वळविला लोहगावी परचक्र झाले ते हेच असावे असा आधुनिक संशोधकाचा तर्क आहे या प्रसंगी महीपतीबुवांनी जे चमत्कारिक आख्यान जुळविले आहे त्यात स्थलकालाची विसंगती तर आहेच, शिवाय या प्रसंगी अभंग तीन की चार यासनंबंधीही मतभेदाची चर्चा अभ्यासकांनी केलेली आहे या गाथेतील पुढील १६०४ या नंबराचा 'बोलिलों तें आतां पाळावे वचन । ऐसे पुण्य कोण माझे गांठी ।।' या अभंगाचा समावेश वरील तीन अभंगाबरोबरच कधी कधी करण्यात येतो ५६० फिरगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणमोल ॥ १ ॥ पायरी प्रतिमा एकचि पाषाण । परि ते महिमान वेगळाले ॥ २ ॥ तुका म्हणे तैशा नव्हतीच परी । सतजना सरी सारिखिया ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - फिरगी-तरवार, वाखर-वस्तरा, सरी-योग्यता अर्थ - तरवार, वस्तरा व विळे हे सर्व पदार्थ एका लोखंडाचेच असले तरी ते आपापल्या गुणांमुळे वेगळेच ठरलेले असतात १ पाय देऊन घडावची पायरी व पूजेची प्रतिमा ही एका पाषाणाची खरी, पण प्रत्येकाचे महत्त्व किती वेगळे आहे २ तुकाराम महाराज म्हणतात, परंतु येथे मात्र तसा प्रकार नाही सर्व सतजन एकसारख्याच योग्यतेचे आहेत ३ ५६१ कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥ १ ॥ आतां माझा श्रोता वक्ता तूंचि देवा । करावी ते सेवा तुझीच म्या ॥ २ ॥ कुशळ चतुर येथें न सरते । करितील रिते तर्क मतें ॥ ३ ॥ तुका म्हणे जाले येणे एके घरीं । मज आणि हरी तुम्हा गाठी ॥ ४ ॥ १ ठेवी मज