सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 338, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३०४ सार्थ तुकारामगाथा दुसऱ्याला काय देणार ? १ आपल्या इच्छेसाठी, तृप्तीसाठी दुसऱ्यांना छळतात त्या आशाळभूत दैवतापासून आपणास काय मिळणार आहे ? त्याच्या प्राप्तीचा उपयोग तरी काय ? त्याची बुद्धी थोडी असून त्याच्या अंगी धैर्य तर थोडेच असते २ दासीच्या पासूनच जर पाहुणचाराची इच्छा केली, तर स्वतःस वेतन देणाऱ्या आपल्या धन्यास तिला प्रथम विनंती करावी लागते मग ती उचित अशा करून भावनांनी काही स्वागत करील अशा प्रकारची ही रिकामी दैवते दाक्षिण्यहीन अशी असतात ३ एखाद्या डबक्यातील पाण्याचा काय उपयोग ? त्या पाण्यात ओठही भिजत नाही, तहान भागल्याची तृप्ती कधी होत नाही जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व त्रास मात्र सदोदित होतो एखाद्या पुरश्चरणात काही कमी पडल्यास जसा क्षोभ होतो व फळ नष्ट होते, तसे या क्षुद्र दैवताचे आहे ४ या दगडी दैवताचे तोंड शेंदराने झाकून टाकलेले असल्याने त्या भाराची लोळ ती नेहमी वागवीत असतात कधी हिंसाचाराने आपली आपणासच दंड अथवा शासन करून घेतात अशांना देव ढुंगी म्हणेल तर तो मनुष्य भांडखोर व खलबडघा म्हणावा लागेल ५ अशा प्रकारचा हा माझा नारायण नाही हा सर्व जगाला व्यापून राहणारा जनार्दन आहे तुकाराम महाराज म्हणतात, त्याचे चिंतन मनापासून करा, म्हणजे ही क्षुद्र दैवते तुमच्या पायाशी नम्र होतील ६ विवरण - तुकारामबुवा सगुण मूर्तीचे उपासक असले तरी, भावभक्तीशिवाय जर कोणी दगडास शेंदूर फासून देवदेवतांचा पसारा मांडू लागला तर मात्र त्यांना खपत नसे एका विठ्ठलावाचून दुसरी दैवतं नमावीत अस त्यांच्या मनास वाटते दुसरी क्षुद्र देवदैवते व्यर्थ कष्ट देणारी, फसविणारी एकसारखी कशाची तरी मागणी करणारी असतात त्यांच्यात आपण समजतो तेवढेही सामर्थ्य नसते आसुरी वृत्तीनी ती नेहमी भारावलेली असून भक्तांना त्रास देणारी व पुन पुन नव्या देणगीची इच्छा करणारी असतात यांच्या नादी कशास लागावे ? सर्व देव सारखेच, सर्व वस्तूत एक परमेश्वर तत्त्व भरून राहिल आहे हे खरे पण हे कुणासाठी ? जो मनात एकनिष्ठ भाव धरून भक्ती करावयास उत्सुक आहे त्यासाठी मनात भावभक्ती नसताना उगाच आपले लौकिक सुखासाठी रोज नवीन दैवते निर्माण करून त्यांच्या वेड्यावाकड्या व तामसी भावना पुऱ्या करणाऱ्यांना तुकोबानी या अभंगात चांगलाच धडा दिलेला आहे दगडास शेंदूर फासून रोज नवे देव निर्माण करून गरीब बायाबापड्यांना फसविण्याचाही धंदा तुकाराम- बुवांच्या वेळेस जोरात चालू असावा भक्तवत्सल अंतःपारा पंढरीनाथ सोडून या क्षुद्र व अघोरी देवदेवतांची उपासना करणाऱ्याचा निषेध सर्वच साधुसंतांनी केलेला आहे ज्ञानेश्वरांनी तर ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायात माणसाच्या अज्ञानाचे वर्णन करताना, त्याच्या या रोज नवा देव शोधण्याच्या वृत्तीचा निषेधच केला आहे केवळ लौकिक सुखासाठी देव आठविणे व मनकामना पूर्ण न झाल्यास त्याच देवास नाव ठेवून दुसरा शोधणे ही काय खरी भक्ती म्हणायची ? अशी भक्ती करणारी माणसे कशी असतात ? ज्ञानेश्वरांनी तीव्र शब्दात सांगितले आहे- 'नातरी कांताच्या मानसीं । रिगोनि स्वैरिणी जैसी । राहाटे जारेंसीं । जावया लागीं ।।' नवऱ्याच्या अंतःकरणात शिरण्याचा प्रयत्न करणारी, पण मनातून दुसऱ्याच प्रियकराचे ध्यान करणाऱ्या जारिणीप्रमाणे या माणसाचे असे वर्तन असते एका दैवताने समाधान झाले नाही, मग दुसरे शोधायचे व पहिल्यांस नांवे ठेवायची- 'कुचवट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी । आदिलीची परवडी । वरी तया ' अशी त्याची स्थिती असते या नव्यानाव्या देवाच्या शोधात असणाऱ्या माणसांस कधी समाधानच होत नाही तो सारखा भटकत असता बाजारबसवीप्रमाणे त्याचे भ्रमण चालू असते 'ऐसा अखंड भ्रमण करी । उषा नोहे क्षणभरी । अवघे न गावद्वारीं । आहेव जैसो ' असे म्हणून ज्ञानदेवानी या दैवतांचा व त्यांना भजणाऱ्यांचा निषेधच केलेला आहे तुकारामबुवांच्या वेळी तर या क्षुद्र व हिंसाचारी देवांचा सुळसुळाट झाला होता नवे नवे धर्मपंथ, शेंदराचे दैव, रक्ताचा, मांसाचा नैवेद्य, अघोरी उपाय याच्यासारख्या हीन मागणीला या दैवताचा बुवानी धिक्कार केलेला दिसून येता 'नव्हे जाणाई जोखाई मायराणी मेसावाई । बळिया माझा पंढरिराव जो या देवांचाही देव' असा स्पष्ट खुलासा बुवानी आणखी एका अभंगात (अ २३८४) करून 'वेताळें कंताळें । अळो त्याचे तोंड काळें' म्हणून आपल्या नेहमीच्या शब्दांत त्यांनी थेटपणे निषेध केला आहे