सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 339, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३०५ ६२२ विषयओढीं भुलले जीव । आता याची कोण करील कींव । नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥ १ ॥ कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं । माप या लागले शरीरीं । जालियावरी सळे ओढिती ॥ २ ॥ बापुडीं होतील सेवटीं । आयुष्यासवे जालिय तुटी । भोगिले मागें पुढें ही फोटी । होईल भेटी जन्मासी ॥ ३ ॥ जतिली १ घाणा बांधोनि डोळे । मागें जोडी आर तेणेंही पोळे । चालिलों किती तें न कळे । दुःखें हारबळे २ भूकतान ॥ ४ ॥ एवढें जयाचें निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित । तें हें देह मानुनि अनित्य । न करिती नित्य नामस्मरण ॥ ५ ॥ तुका म्हणे न वेचता मोल । तो हा यासि महाग विठ्ठल । वेचिता फुकाचेचि बोल । केवढें खोल अभागिया ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - नुपजे निर्माण होत नाही, सळे-बलाने, आर-टोचणी, आरबळे-दुःखाने आरडतील अर्थ - या जीवनाविषयीच्या वृथा लोभाने हे जीव कसे भुलून गेले आहेत पाहा आता याची कोण कीव करणार ? कारण याच्या मनात नारायणबद्दल भक्तिभाव कधीच निर्माण होत नाही चांगला नरदेह मिळालेला असतो त्याचा काय उपयोग ? १ काळाच्या मुखात सापडलो असताना या संसारात कसले सुख आहे ? या शरीरास आयुष्याचे माप लागले आहे ते बळाने एकदा कधी तरी पूर्ण भरेल व मग यमदूत येतील २ बळाने ओढायला लागतील व पुढल्या जन्माचीही अशीच अवस्था होऊन जाईल ३ एखाद्या डोळे बांधून घाण्यास जुंपलेल्या बैलाप्रमाणे याची अवस्था होईल त्याला मागेपुढे आरेची टोचणी एकसारखी असते त्यामुळे तो दुःखातच नेहमी राहतो किती भ्रमण केले, हेही त्याला समजत नाही त्याच्या प्रमाणेच ही माणसे दुःखाने एकसारखी ओरडत असतात तहानेने व भुकेने व्याकुळलेली असतात ४ आपल्या प्रारब्धामुळेच, क्रियमाण व संचित्तामुळेच, हा असा त्रास आपणास होत असतो तर मग हा देह अनित्य मानून नित्य नामस्मरण त्या एका परमेश्वराचे हे लोक का करीत नाहीत ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, द्रव्य खर्च न होता या विठ्ठलाचे रूप हृदयात साठविता येत असूनही त्या विठ्ठलाचे चिंतन याना रिती दुर्लभ झाले आहे पाहा ना फुकटचे विठ्ठलाचे नामही या अभाग्याना दुर्लभ किती झाले आहे पाहा ६ ६२३ आले हो संसारा तुम्ही एक करा । मुक्तिमारग हळूचि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । का रे अघोरा दचकसी ना ॥ १ ॥ नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढिता कुडी प्राणा । ओढाळ सापडे जं धाम्या । चोर यातना धरिजेता ॥ २ ॥ नाहीं दिलें पावेल कैसा । चालता पथ तेणें वळसा । नसेल ठाउके ऐकतो जैसा । नेती बद जैसा धरोनिया ॥ ३ ॥ क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करिता कांहीं । ओढिती काटवणा सोईं । अग्निस्तंभीं याही कवटाळविती ॥ ४ ॥ देऊनि अगें कापती । तप्ते नदीमाजी चालविती । लागे ठाव न लगे बुडविती । वरि मारिती यमदंड ॥ ५ ॥ १ जुतिले, २ आरबळ तु गाथा ३९