सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 361, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३२७ संसार तो तयांचा दास । मोक्ष तें' पाहातसे वास । Riddhisiddhi deshavata tras. Na shivati yas vaishnavajan ॥ ५ ॥ जन्ममृत्युस्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें । तुका म्हणे अखंडित सुखें । वाणी येदे मुखें प्रेमामृताची ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाव-अवकाश, जागा, वेठीं-विगारीने, गिन्हे-ग्रह, देशवटा-देशाच्या हद्दीबाहेर अर्थ :- हा श्रीहरी जसा आहे, तसेच त्याचे दासही भय, मोह, चिंता व आशा यांच्या विरहित आहेत. ते सर्वस्वी उदास झाले आहेत. त्यांनी भवतीची कास बळकटपणे घातली आहे. १ या श्रीहरीचे पाय ज्यांनी लोकांचा त्याग करून धरिले आहेत, त्यांना कुठल्याही मानसन्मानाची जरूरी नसते. त्यांना धनही मातीच्या किंमतीचे वाटते. त्यांच्या मुखांत नेहमी नामामृताचेच पान असते. त्यांना दुसऱ्या कशाचीच जरूरी नसते. २ त्यांच्या पोटांत दयेस फार मोठी जागा असते. समुद्राप्रमाणे ते धीरगंभीर असतात. त्यांची ईश्वराच्या पायांवरील मिठी कामक्रोधादि- कांनाही सुटत नाही. हे ग्रहांसारखे तापदायक असले तरी ते त्यांना विगारीने वेठीला धरतात. ३ हे श्रीहरीचे भक्त इतके बलवान आहेत की, ते प्रत्यक्ष काळासही पराजित करतात आणि नम्र तर इतके आहेत की, सर्वांच्या खाली क्रमाने उभे राहतील. देहाविषयी हे सर्वस्वी उदार आहेत सर्व कला यांनी जाणलेल्या असूनही न जाणल्या- सारखे ते वागतात ४ इतरांना कष्टदायक वाटणारा संसार हा त्यांचा दास बनतो. मोक्ष तर यांचीच वाट पाहात असतो. रिद्धीसिद्धींना यांनी आपल्या देहरूपी देशाच्या सीमेपलीकडे हद्दपार केले असल्याने त्याचाही त्रास यांना कधी होत नाही. अशा रिद्धीसिद्धींना वैष्णव लोक चुकूनही स्पर्श करीत नाहीत. ५ हे हरीचे दास जन्ममृत्यूंनाही स्वप्नासारखेच मानतात. त्यांना आपले अथवा परक्याचे असा भेद मुळीच दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात. ते निरंतरपणे सुखी असतात. त्यांच्या वाणीतून अखंडपणे प्रेमामृतच बाहेर स्रवत असते. ६ ६५४ बहुत जाचलों संसारीं । वसें गर्भी मातेच्या उदरीं । लक्ष चौऱ्याशी योनिद्वारीं । जालों भिकारी याचक ॥ १ ॥ जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥ २ ॥ न सरे पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा । नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाही' जीवा खापरीं तडफडी ॥ ३ ॥ काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक पुढें नेणों किती । खंडणा नाहीं पुनरावृत्ती । मज कल्पांतीं तरी वेगळें ॥ ४ ॥ ऐसें दुःख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपुलें ओझें । भवसिंधुतारक नाम तुझें । धांवसि काजें आडलिया ॥ ५ ॥ आतां धांव घालीं नारायणा । मजकारणें रंका दीना । गुण न विचारों अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा:- भोवंडिती-गरगर फिरवितात. अर्थ:-देवा, मी या संसारात फार गांजून गेलो आहे. चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून मी मातेच्या उदरात वास केला असून मी सुखासाठी दोन याचक व भिकारी बनलेलो आहे. १ माझे हे जगणेही दुसऱ्याच्या स्वाधीन आहे. कर्मबंधनाच्या फासात मी बांधून पडलो आहे. माझयाबरोबर माझे प्रारब्ध व क्रियमाण असून त्याच्या सत्तेने ते मला गरगर निरनिराळया जन्मांतून फिरवीत आहेत. २ इतके भ्रमण करूनही माझे पोट भरत नाही; की १ तो, २ लाहे.