सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 376, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३४२ सार्थ तुकारामगाथा मत्स्यकूर्मादि अवतारांसाठीं । श्रमले असतील जगजेठी । करितां घडमोड सृष्टी । जालासि कष्टी काय जाणें ॥ ३ ॥ किती म्यां विनवावें श्रीपती । पुन्हा पुन्हा यावें काकुलती । पुरे आतां तुझी संगती । करुणामूर्ती काय जालें ॥ ४ ॥ काय म्यां तुजसी करावें आतां । कां रे कोपलासी पंढरीनाथा । सकळ दुःख निवारिता । पावन पतिता तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- कामधंदा-कर्तव्य, घडमोड-घडामोड. अर्थ :- अखंड कर्मात रममाण झालेल्या देवा, कर्माच्या प्रकाशा, सर्व कर्मात प्रकाशमान असणाऱ्या देवा, माझ्या बाबतीतच तू मूक का झाला आहेस ? धर्माधर्माचे प्रतिपालन करणाऱ्या देवा, सर्व जगताचे बालपत्य पत्करले असूनही तू सर्वातीत आहेस. १ तू वर्णाश्रम धर्माची मर्यादा पाहात नाहीस. या संबंधाचे सर्व कर्तव्यकर्म तूच स्वतः करतोस. कोणतेही काम करायला तू कधी लाजत नाहीस. मुकुंदा, आताच का रे तू बोलत नाहीस ? २ मत्स्य, कूर्म, इत्यादी अवतार धारण करून तू दुष्ट शक्तींचा संहार केलास; त्यामुळे हे जगजेठी, तू फारच श्रमला असशील या सर्व सृष्टीची अखंड घडामोड करीत असताना, तुला फार कष्ट झाले असतील. ३ श्रीपती, तुला मी किती विनवावे रे ? तुझ्यापाशी पुनः पुनः किती काकुलतीस यावे ? तू प्रसन्न होत नाहीस असे पाहून वाटते की, तुझी संगती आता पुरे झाली तू करूणेची मूर्ती असून मजबद्दलच तुला काय झाले रे ? ४ तुझ्यासाठी मी आता करावे तरी काय ? पंढरीनाथा, तू एवढा रागावलास तरी का रे ? तुकाराम महाराज म्हणतात, तू सर्व दुःखे निवारण करणारा आहेस ना ? तू पतितांना पावन करणारा आहेस ना ? ५ ६७५ वासुदेवा दिनानाथा । कमललोचना श्रीअच्युता । निजभक्तांसि सौख्यदाता । तुजविण सर्वथा असेचि ना ॥ १ ॥ विठ्ठला अनंता विश्वपती । विराटस्वरूपा वामनमूर्ती । ब्रह्मादिकर्ता वैकुंठपती । अगम्यस्थिती वेदशास्त्रा ॥ २ ॥ अद्वैतअखंडभरिता । विश्वबाहु अपरिमिता । विश्वचक्षु विश्वदेवता । आदिपिता ब्रह्मयाचा ॥ ३ ॥ भक्ताधीना भवभयभंगा । परमपुरुषा पांडुरंगा । अनादि अखिलअंतरंगा । संगा असंगा वेगळाची ॥ ४ ॥ हें विराटस्वरूप भोळिया भक्तांसी । सर्वथा न फळे हृषीकेशी । सगुण रूप धरुनि त्यांसी । लावीं भजनासी तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- भवभयभंगा-संसारसागराचे दुःख दूर करणाऱ्या देवा. अर्थ :- वासुदेवा, दीनांच्या नाथा, कमलाप्रमाणे डोळे असणाऱ्या देवा, अच्युता, तू स्वतःच्या भक्तांना सौख्य देणारा आहेस. तुझ्याशिवाय असे सुख देणारा दुसरा कुणीही नाही. १ विठ्ठला, अनंता, तू विश्वाचा धनी आहेस. तू विराट रूपाचा असूनही वामनमूर्ती आहेस. ब्रह्मादिकांनाही तूच निर्माण केले असून तूच वैकुंठाचा मालक आहेस. वेदशास्त्रांनाही तुझी स्थिती कळून येण्यासारखी नाही. २ तू अद्वैत स्वरूपाचा असून सर्व विश्वात अखंड रूपाने भरून राहिला आहेस. तू अपरिमित असल्याने तुझे मोजमापही करता येत नाही तुझे बाहू सर्व विश्वाला कवटाळून आहेत. तू विश्वदेवता असल्याने व तू या विश्वाचा नेत्रच असल्याने तुला सर्व काही समजते. देवा, तूच आदिपिता असून ब्रह्मदेवाचाही जनक तूच आहेस. ३ तू भक्तांच्या आधीन होतोस व त्यांच्या संसाराचे भय दूर