सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 375, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३४१ नेणे भवभक्तीची निरपेक्षता । नेणे भूतदयेची ममता । तुका म्हणे पढरीनाया । सग साधुसता देई आता ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - हारिख-आनंद, हर्ष अर्थ - अखंडपणे पसरलेल्या या क्षीरसागराला प्रेमाचे भरते आले व त्यामुळे प्रमकृपेचे, अध्यात्मविद्येचे भाडार उघडले गेले या योगाने जणु कोटी सूर्याचे तेज फाकून राहिले व ते भरताच्या अंत करणातून प्रकट झाले १ ज्या बह्मज्ञानास प्रारभ नाही, अशाचे रहस्य आमच्या कानी यामुळे सहजच पडून परमानिर्वाणाचे बीजच हाती आल्या- सारखे झाले स्वतःच्यासाठी सर्व भाग्याचा ठेवाच हस्तगत झाला २ सर्व मागल्याचा साठा असा हा मंत्र अथवा महामंत्र सत्सगाच्या दर्शनाने प्रकट झाला धियेकवैराग्याची बुद्धी विकसित झाली एका नामानृताच्या सिद्धीने हे सर्व साघले ३ दया, क्षमा, शाती यानी साधलेले हे निजसुख किंवा चित्सुख पुडलीकाच्या मुखातून प्रकट झाले यामुळे र्पन्नत सुखाचा हर्ष या पंदरी क्षेत्रात निर्माण झाला आहे ४ भक्तोमध्ये निरपेक्ष कसे असावे, हे मला समजत नाही भूतमात्राविषयी ममता कशी बाळगायी, हेही समजत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीनाया, यासाठी तू साधुसताची सगत मात्र अखडपणे दे मला ५ ६७३ क्षीराब्धिवासा शेषशयना । लीळाविग्रहा गोपिकारमणा । सगुणस्वरूप भक्तभूषणा । गुणनिधाना गुप्तरूपा ॥ १ ॥ अनत अवतार धरितिया । अखडस्वरूपा करुणालया । अमरपाळका देवराया । हरी भवभया भक्ताचिया ॥ २ ॥ सर्वव्यापका सर्वातीता । गजेंद्ररक्षका वैकुंठनाथा । भोळया भक्तासि सौख्यदाता । तुजविण सर्वथा असेचि ना ॥ ३ ॥ चित्तचाळका चैतन्यघना । भक्तकैवारी असुरमर्दना । भक्तअभिमानी नारायणा । जगज्जीवना पाडुरगा ॥ ४ ॥ ब्रह्मादिकाचा निजजनिता । सकळकारण अकर्ता । अणुरेणुव्याप्यभरिता । पावन पतिता तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - अनत-अनंत, भवभय-संसाराची भीती अर्थ - क्षीरसागरात निवास करणाऱ्या देवा, शेषावर शयन करणाऱ्या नारायणा, अनेक लीला करून गोपिकाचे मन हरण करणाऱ्या श्रीकृष्ण तू सगुण स्वरूपाचा असून भक्ताचे भूषण आहेस गुप्त रूपाने असलेल्या अनेक गुणाचा साठा तुझ्या जवळ आहे १ तू अनेक अवतार धारण करतोस तुझे स्वरूप अखड असून तू करुणेचा सागरच आहेस देवराया, तू प्रत्यक्ष देवाचाही साभाळ करतोस तू आता आम्हा भक्ताचे ससारभय दूर करावेंस २ तू सर्वव्यापक असून सर्वातीत आहेस गजेन्द्राचे रक्षण तूच केलेस वैकुंठनाथा, भोळया भक्ताना तू सुख देणारा आहेस तुझ्याशिवाय दुसरे काही नाहीच ३ चैतन्याच्या मेघा, सर्वाच्या चित्ताचा चालकाही तूच आहेस तू भक्ताचा कैवार घेतोस, असुराचा नाश करतोस नारायणा, तू भक्ताचा अभिमानी असून सर्व जगाचे जीवन तूच आहेस ४ पाडुरगा, तू ब्रह्मादिकांनाही जन्म देणारा असून, सर्व कर्मे करणारा असूनही तू अकर्ता आहेस तू अणु रेणूपासून सर्व त्रिभुवनात भरून राहिला आहेस तुकाराम महाराज म्हणतात, तू पतिताना पावन करणारा आहेस ५ ६७४ अखडकर्मा कर्मप्रकाशका । मजसाठीं का रे जालासि मुका । धर्मा धर्मप्रतिपाळका । सर्वचाळका सर्वातीता ॥ १ ॥ न देखसी वर्णाश्रममर्यादा । त्याचा सर्वस्वे करिसी कामधंदा । कधीं न लाजसी तू गोविंदा । का रे मुकुदा बोल आता ॥ २ ॥