सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 374, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३४० सार्थ तुकारामगाथा उपकार करणे, हा गुण तर मला वैऱ्यासारखा वाटतो. ४ दुसऱ्याची निंदा, द्वेष, विश्वासघात वगैरे करताना मी आळस केलेला नाही. जे करू नयेत ते दोष मी केलेले आहेत. संतांची थट्टा केली आहे. जे भक्षण करू नये ते भक्षण केले आहे. ५ मी आईवडिलांची आज्ञा कधी मानलेली नाही, माझे चित्त नेहमी दुसऱ्याच्या द्रव्यावर व दुसऱ्याच्या स्त्रीवर जडून राहिलेले होते. ज्या दोहोंच्या बाबतीत जे बोलू नये ते माझ्या हातून घडले आहेत. दासीगमनासारखे दोषही माझेकडून झाले आहेत. ६ काया, वाचा, मन, इंद्रिये या सर्वांची मिळून मी पापांचीच राशी आहे. तुकयाबंधू म्हणत आहे की, असे असतानाही, देवा, हृषीकेशी, मी तुम्हांस शरण आलो आहे. ७ ६७१ काय काय करितों या मना। परी नाइके नारायणा ॥ करूं नये त्याची करी विवंचना । पतना नेऊं आदरिलें ॥ १ ॥ भलतिया सवे धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट । न विचारी कुडें कांहीं कपट । घात बळकट मांडियेला ॥ २ ॥ न पुरती भ्रमणा दाही दिशा । सप्त ही पाताळ आकाशा । घाली उडी बळौंचि देखोनि फांसा । केलों या देशा पाहुणा ॥ ३ ॥ चेतवूनि इंद्रियें सफळ । आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुराविती शुद्ध बुद्धि केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार हैं ॥ ४ ॥ आतां काय ऐसें करावें यासी । बहु जाचिलों केलों कासाविसी । तुकयाबंधु म्हणे हृषीकेशी । धांव मज ऐसी परी झाली ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- संराट-बेफाटपणे, दरकुट-दरी, कुडें-खोटे, राळ-नाहीशी. अर्थ - देवा, मी या मनाला वळण लावण्यासाठी काय काय उपाय करून पाहतो? पण नारायणा, ते काही ऐकत नाही करू नये त्याची चिंता करीत बसते व मला पतनाकडे जलदीने नेते. १ भलत्याच्याच संगतीने ते बेफाटपणे धावत असते ते वाट, आडवाट, दऱ्या, दरकुटे काही पाहात नाही. खोटे किंवा कपटी आहे, कुणी मोठा घात आरं- भिला आहे, याचाही ते विचार करत नाही. २ याच्या भ्रमणाला दाही दिशा पुरत नाहीत. सात पाताळे व आकाश यांत बळेच उडी घालून फासात अडकत असते. यामुळे मी या दोषाचा स्वामो झालो आहे. ३ या मनानेच माझी सर्व इंद्रिये चाळविली आहेत आशा, तृष्णा, काम, क्रोध हे सर्व काळ असून यांच्यामुळे माझी सर्व शुद्धी नाहीशी झाली आहे माझी बुद्धीही नाहीशी झाली आहे. असे हे माझे मन मोठे अनिवार व चांडाळ आहे. ४ आता याला करावे तरी काय ? याच्यामुळे मला फार त्रास झाला. मी फार कासावीस झालो आहे. तुकयाबंधू म्हणत आहे, देवा हृषीकेशी, तू धावून ये. माझी कशी अवस्था झाली आहे ते नीट पाहा. ५ ६७२ अखंडक्षीराब्धी भरितें आलें । अध्यात्मविद्येचें भांडार उघडलें । सूर्यकोटीस तेज फांकलें । ध्यानीं प्रगटलें भक्तांचिया ॥ १ ॥ अनादि ब्रह्मज्ञानाचें गुज । श्रवणीं अवचित पडलें सहज । परमनिर्वाणाचें बीज । गुंडाळिले निजसर्वभाग्यें ॥ २ ॥ मंत्र महामंत्र मंगळनिधी । सत्संगदर्शन प्रगटलें आधीं । वैराग्यविवेकाची बुद्धी । नामामृतसिद्धी साधिले ते ॥ ३ ॥ क्षमादवाशांतीचें निजसुख । सच्चित्सुखें बोलला पुंडलीक । अनंतसुखाचा हारिख । उगवला देख पंढरीये ॥ ४ ॥