सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 373, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३३९ कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवाची बंदशाळ । संहारूनि राक्षसदाळ । शरणागत राजीं स्थापिला ॥ ३ ॥ उपक्रम करावा बहुत । तरी तूं जाणसी धर्मनीत । उचित काय तें अनुचित । राखें शरणागत आलों आतां ॥ ४ ॥ किती म्यां काय विनवावें । शरण आलों जीवें भावें । तुकयाबंधु म्हणे करावे । क्षेम अवघें येणें काळें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- प्रतापदिनकर-पराक्रमरूपी सूर्य, बंदशाळ-बंदिशाळा, तुरुंग. 'अर्थ :- देवा, या त्रिभुवनांत तू सर्व बलवानांचा बलवान आहेस, म्हणूनच मी तुझ्या पाठीमागे निघालो आहे. आता माझ्या मनात जे असेल ते मी करीन. १ देवा, तू पराक्रमरूपी सूर्य आहेस, देवासुरांचा वेध आहेस, महावीरांचा धनुर्धर वीर आहेस. अशा तुझ्यापुढे मी पामर काय ? २ तू कृपासिंधू आहेस, दीनवत्सल आहेस, तू देवांची बंदीशाळा फोडलीस, राक्षसांचा संहार केलास आणि जे शरण आले त्यांना राज्यावर बसविलेस. ३ मला खूप नये नये उपक्रम करावेसे वाटतात. परंतु तू धर्मनीती जाणणारा आहेस, उचित काय, अनुचित काय, हेही तू जाणतोस. मी तुला शरण आलो आहे. तू आता माझे रक्षण कर. ४ मी आता तुला किती विनंती करावी ? मी जीवाभावाने तुला शरण आलो आहे. तुकयाबंधू म्हणत आहे की, या वेळेस माझे सर्व कल्याणाचे असेल ते करावे ५. ६७० देवा मी चांडाळ चांडाळ । म्हणतां लागताहे वेळ । नसे पाहातां भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥ १ ॥ जन्मा उपजल्यापासुनी । असत्य कर्म तें अझुनी । सत्य आचरण नेणें स्वप्नीं । निखळ खाणी अवगुणांची ॥ २ ॥ भक्ति दया अथवा कथा । कानीं न साहवे वार्ता । अखंड विषयांची वेथा । अधम पुरता अधमाहुनी ॥ ३ ॥ काम क्रोध दंभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर । यांचे तरी माहेरघर । परउपकार वैरी तैसा ॥ ४ ॥ निंदा द्वेष घात विश्वास । करितां नाहीं केला आळस । करूं नये ते केले संतउपहास । अभक्ष तें ही भक्षिलें ॥ ५ ॥ पाळिलें नाहीं पितृवचन । सदा परद्वारीं परधनीं ध्यान । बोलों नये घडलें ऐसें अन्योन्यविण । दासीगमन आदिकरूनी ॥ ६ ॥ कायामनें वाचाइंद्रीयांशीं । सकळ पापांचीच राशी । तुकयाबंधु म्हणे ऐसियासी । आलों हृषीकेशी तुज शरण ॥ ७ ॥