सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 372, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३३८ सार्थ तुकारामगाथा अर्थ - अरे हृषीकेशी, तुझ्याजवळ एकच मागणे आहे मी नीट सांगतो, ते तू चित्त लावून ऐक तुझ्या चरणांशी माझें अंतर पडू देऊ नकोस, येवढी कृपा कर १ याशिवाय मजविषयी दुसरी बुद्धी तू धरू नकोस मला रिद्धीसिद्धी नकोत, मला परलोक नको केवळ तू स्वामी व मी सेवक असे एकच नाते राहू दे यामध्ये मात्र विरोध होऊ नये २ तुझ्या मनास येईल तो जन्म मला तू दे कोणत्याही कुळात, कोणत्याही ठिकाणी तू मला जन्मास घाल हे सकट काही मी तुझ्यावर घालत नाही पण माझ्या हृदयातून तू दूर होत नाहीस हे मात्र पाहा ३ तू एवढेच करावेस, मग मी कोणत्याही प्रकारे, कोणत्याही भावाने तुझ्या दारात येईन व तुझे काम करणारा सेवक होऊन राहीन माझी वाणी तुझेच नाम नेहमी गात राहील ४ आता या खेरीज दुसरे काही विचारू नकोस पंढरीनाथा, मी तुला आता शरण आलो आहे तुकयाबंधू म्हणत आहे की, अरे अच्युता, तू दाता व दानशूर असा आहेस ५ .. ६६८ कईं देखतां होईन डोळीं । सकळा भूतीं मूर्ति सावळी । जींवा नाव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥ १ ॥ ऐसा कृपा करील नारायण । जीव जगाचा होईन । प्रेमसागरीं बुडीन । होईल स्नान अनुतापीं ॥ २ ॥ ऐसा कईं येईन दैवास । दृश्य नासोनि जाईल आस । सदा सतचरणीं देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥ ३ ॥ कईं नवसा येतील अंकुर । सुखा नाहींसा होईल पार । अमृत ते पृथ्वीजळ सागर । वाहाती पूर आनंदाचे ॥ ४ ॥ प्रसन्न दया क्षमा शांति । कईं नवविधा होईल भक्ति । भोगीन वैराग्यसपत्ति । मनोरथ कळती तईं पुरले ॥ ५ ॥ तुकयाबंधु म्हणे साग । नव्हे तुजविण निरसेना पाग । म्हणोनि घातले साष्टांग । पांडुरंगा वरी चरणा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - अनुतापीं-वैराग्यान, पश्चात्तापाने धणीबरी-आनंदाने, पाग-इच्छा अर्थ - देवा, या माझ्या डोळ्यांनी सर्वभूतमात्रांमध्ये तुझी सावळी मूर्ती कधी, बरे पाहीन ? या भूमंडळात, जळात, स्थळात, काष्ठात, पाषाणात जीवांना तुझच नाव आहे १ नारायणा, माझ्यावर अशी कृपा कर की, या जगाचाच मी जीव होईन प्रेमसागरात बुडी देईन वैराग्याच्या किंवा पश्चात्तापाच्या पाण्यात स्नान करीन २ असे माझे दैव कधी होईल की, दृश्य असणारे जग नाहीसे होऊन माझी आशाही नष्ट होईल नेहमी सतचरणी वास करीन व त्याचे उच्छिष्ट मोठ्या आनंदाने सेवन करीन ३ या माझ्या नवसाला कधी अंकुर फुटतील ? अपार असे सुख मला कधी प्राप्त होईल ? या पृथ्वीवर आनंदामृताच्या सागराचे पूर कधी वाहू लागतील ? ४ प्रसन्नता, दया, क्षमा, शांती इत्यादींची व नवविधा भक्तीची प्राप्ती मला कधी होईल ? वैराग्यसंपत्ती मी कधी भोगीन ? माझे सर्व मनोरथ पूर्ण कधी होतील ? ५ तुकयावधू म्हणत आहे की देवा, तुझ्याशिवाय माझी ही इच्छा कुणीही पूर्ण करणार नाही म्हणूनच देवा, पांडुरंगा तुमच्या चरणावर साष्टांग नमस्कार मी घातले आहेत ६ ६६९ तू वळिया शिरोमणी । आहेसि माजी ये त्रिभुवनीं । रिघालो पाठी तुझी म्हणउनी । आता करीन मी असेल ते ॥ १ ॥ तूं देवा प्रतापदिनकर । सुरा असुराचा सुर । महावीरा वीर धनुर्धर । मी तो पामर काय तेथें ॥ २ ॥