सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 395, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३५९ ७२४ न संडवे अन्न । मज न सेववे वन ॥ १ ॥ म्हणउनी नारायणा । कीव भाकितो करुणा ॥ २ ॥ नाहीं अधिकार । काहीं घोकाया अक्षर ॥ ३ ॥ तुका म्हणे थोडें । आयुष्य अवघेंच कोडें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -न सडवे-त्याग होत नाही, कोडें-अडचण अर्थ:- मला अन्नाचा त्याग करवत नाही, वनवास पत्करावा असेही वाटत नाही १ म्हणूनच नारायणा, मी तुझी प्रार्थना करीत आहे २ मला वेदांची अक्षरे म्हणण्यासही अधिकार नाही. ३ तुकाराम महाराज म्हण- तात, देवा, हे आयुष्य थोडे व अडचणी फार अशी स्थिती आहे. ४ विवरण -या एका महत्त्वाच्या अभंगात दोन प्रमुख बाबींचा निर्देश आहे पहिली अशी की, ईश्वरप्राप्तीसाठी कुणासही रानावनात जावयास नको, मला काही ते नीट घडत नाही, असे तुकारामबुवांनी येथे स्पष्टपणे सांगितले आहे संसाराचा मोह सोडून तुकोबा भंडाऱ्याच्या किंवा भामनाथावरील वृक्षवल्लीच्या सहवासात वावरले, याचा अर्थ त्यांनी सर्व संसार त्यागून केला असा नाही, किंवा देवासाठी या सर्व गोष्टी आग्रहाने सोडाव्यात असेही नाही मनात भाव नसेल तर नुसत्या बाह्य त्यागाने काय होणार ? त्यापेक्षा अलप्त अनुसंधान राखून, आहे हे श्रीहरीचेच रूप समजून बसल्या ठिकाणीच त्या प्रभूची आळवणी केली तर ती अधिक फलदायी ठरते दुसरी महत्त्वाची बाब या अभंगातील अशी की, त्यांनी यात 'नाहीं अधिकार। काहीं घोकाया अक्षर' असा स्पष्ट निर्देश केलेला आहे वेदांचे अध्ययन करण्यास स्त्रीशूद्रादिकांना अधिकार नसे, याचा उल्लेख या अभंगात आहे तुकोबांनी ग्रंथांचे व वेदांचे अध्ययन किती केले होते, याविषयी भरपूर चर्चा अभ्यासकांनी केलेली आहे गीता, भागवत व इतर पुराणे, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, विष्णुसहस्रनाम इत्यादी ग्रंथांच्या वाचनाने बुवांचे मन संस्कारित झाले होते, यात संशय नाही. या सर्व ग्रंथातून वेदांचेच सार आले असल्याने प्रत्यक्ष वेदांचे अध्ययन करण्याचीही जरुरी नाही तरीसुद्धा असे दिसते की, आपणास वेदांची अक्षरे घोकावयास अधिकार नाही, असे बुवा म्हणत असले, व त्यांनी तसे अध्ययन केले नसले तरी गीता, भागवत, ज्ञानेश्वरी याच्या परिशीलनाने बुवांचे मन कितीतरी प्रगल्भ व बहुश्रुत बनले होते पण या अभ्यासापेक्षाही महत्त्वाची बाब अशी की, गुरुकृपेने व विठ्ठलप्रसादाने त्याच्या प्रतिभेत झालेला 'परतत्त्वाचा स्पर्श' एवढा थेट होता की, ते जे बोलले त्यातूनच वेदाचा अर्थ प्रकट होत राहिला याही स्वानुभवाची यथार्थ जाणीव त्यांना होती 'वेद अनंत बोलिला । अर्थ इतकाची साधिला । विठोबासी शरण जाये । निर्लाभिष्ठें नाम गाये', 'वेद विहित तुम्ही आइका हो कर्म', 'वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वहावा भार माथा' इत्यादी वचनावरून तुकोबांच्या वाणीतून वेदांचेच सार प्रकट होते, हे स्पष्ट आहे त्यामुळे वेद जेथून स्फुरले, तेथूनच बुवांच्या वाणीला पालवी फुटली, असे मानणे अधिक सयुक्तिक दिसते ७२५ एकांचीं उत्तरें । गोड अमृत मधुरें ॥ १ ॥ ऐशा देवाच्या विभूती । भिन्न प्रारब्धाची गती ॥ २ ॥ एकांचीं वचनें । कटु अत्यंत तीक्ष्णे ॥ ३ ॥ प्रकाराचे तीन । तुका म्हणे केले जन ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- तीन-सत्त्व, रज व तम अशा गुणांचे. अर्थ :- काही लोकांचे बोलणे अमृताप्रमाणे गोड व मधुर असते १ अशा या देवाच्याच विभूती असून प्रारब्धाप्रमाणे भिन्न भिन्न गती त्यांना प्राप्त होतात. २ काही लोकांचे बोलणे अत्यंत कडक व कडवट असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे सत्त्व, रज, तम या तीन गुणाना अनुसरून लोकांचे वर्ग बनलेले असतात ४ ७२६ वचने ही नाठ । न बोले तें मुके खोड ॥ १ ॥ दोहीं वेगळें तें हित । बोली अबोलणी नीत ॥ २ ॥