सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 394, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३५८ सार्थ तुकारामगाथा ७२० करावे चिंतन । तेंचि बरे न भेटून ॥ १ ॥ वरथा अंगीं राहे भाव । तग तोचि जाणा देव ॥ २ ॥ दर्शनाची उरी । अवस्थाचि अंग धरी ॥ ३ ॥ तुका म्हणे मन । तेथें सकळ कारण ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - तग किंवा तग-दृढ अर्थ - देवाला प्रत्यक्ष न भेटता त्याचे चिंतन करीत असावे, हेच फार उत्तम आहे १ यामुळे मनात चांगला भाव राहतो व या दृढ भावाचा मनुष्यच देव आहे असे मानावे २ त्याचे दर्शन जरी झाले नाही, तरी दर्शन होणार हा भावच मनात स्थिर होतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, या मनात एकदा देवाचे स्थान नक्की झाले की, सर्व आले असे समजावे ४ ७२१ जें जें जेयें पावे । तें तें समर्पाये सेवे ॥ १ ॥ सहज पूजा याचि नावे । गळित अभिमाने व्हावे ॥ २ ॥ अवघे भोगिता गोसावी । आदीं अवसानीं जीवी ॥ ३ ॥ तुका म्हणे सिण । न धरिता नव्हे भिन्न ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -पावे-प्राप्त होतील अर्थ - या जन्मी जे जे भोग प्राप्त होतील, ते सर्व देवाच्या सेवेत समर्पण करावेत १ यालाच सहजपूजा असे नाव असून, ही घडण्यासाठी मात्र आपण आपला अभिमान सोडून द्यावा २ सर्व भोग भोगूनही मग आपण वैराग्य- शीलच राहतो जन्मापासून मृत्यूपर्यंत अशी व्यवस्था टिकून असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याग व भोग यात भिन्नता न मानल्यास मग मात्र सारा त्रासच्च आहे ४ ७२२ नसे तरी मनीं नसो । परी वाचे तरी वसो ॥ १ ॥ देह पडो या चिंतने । विठ्ठलनामसंकीर्तनें ॥ २ ॥ दंभस्थिती भलत्या भावे । मज हरिजन म्हणावे ॥ ३ ॥ तुका म्हणे काळें तरी । मज साभाळील हरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हरिजन-हरिभक्त अर्थ - मनात देवाविषयी प्रेम नसले तरी, वाणीतून ते प्रकट झाले तरी चालेल १ विठ्ठलनामाच्या संकीर्तनात व चिंतनातच हा देह पडून जावा अशी इच्छा असावी २ मला लोकांनी हरिभक्त म्हणावे, या दंभाच्या भावाने देवनामाचे चिंतन घडले तरी हरकत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात थोडा काळ का होईना, पण यामुळे मला तो श्रीहरी साभाळील ४ ७२३ नये जरी फाहीं । तरी भलतेंचि वाहीं ॥ १ ॥ म्हणविल्या दास । कोणी न धरी वेठीस ॥ २ ॥ समर्थाच्या नावे । भलतेंसे विकाये ॥ ३ ॥ तुका म्हणे सत्ता । वरी असते बहुता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -वाही-ओघाने, मार्गाने अर्थ - तुला जरी पाहोही येत नसले तरी, कोणत्याही मार्गाने तू जा १ ईश्वराचा मी दास आहे, असे म्हटल्याने तुला कुणी बळजबरीने कामास जुंपत नाही २ त्या समर्थ अशा ईश्वराच्या नावावर काय वाटेल ते खपले जाते ३ तुकाराम महाराज म्हणतात, या समर्थ अशा ईश्वराची सत्ता सर्वांवर सारखीच असते ४