भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 397, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 397

सार्थ तुकारामगाथा ३६१ ७३० अनुतापें दोष । जाय न लगता निमिष ॥ १ ॥ परि तो राहे विसावला । आदीं अवसानीं भला ॥ २ ॥ हेचि प्रायश्चित्त । अनुतापी न्हाय चित्त ॥ ३ ॥ तुका म्हणे पापा । शिवो नये अनुतापा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अनुतापें-पश्चात्तापाने निमिष-क्षण अर्थ - खरोखरचा पश्चात्ताप झाला तर मग एका क्षणाचाही विलंब न लागता सर्व दोष नाहीसे होतात १ पण जन्माच्या आरंभापासून नीट स्थिर असलेला पश्चात्ताप असेल तर तो चांगला २ पश्चात्तापाच्या जलामध्ये स्नान करणे हेच खरे प्रायश्चित्त ३ तुकाराम महाराज म्हणतात, पश्चात्तापाच्या वृत्तीस पाप शिवत सुद्धा नाही ४ ७३१ चहू आश्रमाचे धर्म । न राखता जोडे कर्म ॥ १ ॥ तेंसी नव्हे भोळी सेवा । एक भावचि कारण देवा ॥ २ ॥ तपें इंद्रिया आघात । क्षणे एका वाताहात ॥ ३ ॥ मत्र चले थोडा । तरि घडचि होय वेडा ॥ ४ ॥ व्रतें करिता सांग । तरी एक चुकता भंग ॥ ५ ॥ धर्म सत्वचि कारण । नाहीं तरी केला सिण ॥ ६ ॥ भूतदयेसि आघात । उच्चनीच वाताहात ॥ ७ ॥ तुका म्हणे दुजें । विधिनिषेधाचें ओझें ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा - घड-शहाणा, सांग-पूर्ण अर्थ - ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व सन्यासी या चार आश्रमाचे धर्म न राखताच नुसतेच कर्म करीत राहिल्यास त्यात त्याचा काय उपयोग ? १ तशी या विठ्ठलाची भोळी सेवा नाही एकनिष्ठ भावानेच हा देव प्रसन्न होतो २ उग्र तपश्चर्येने इंद्रियावर आघात होतो, पण एखाद्या क्षणी विपरीत प्रसंग आला की, मग सर्व तपाचा नाश होतो ३ मंत्राने काही फायदा होईल हे खरे, पण त्यात थोडी जरी चूक झाली तरी, शहाणा मनुष्य वेडा होईल ४ व्रते-वैकल्ये पूर्णपणे केली तरच ठीक पण थोडे जरी त्यात चुकले तरी त्याचा भंग होतो ५ सत्व गुणाने युक्त असा धर्म केला तरच तो उपयुक्त होतो नाही तर विनाकारण त्रासच्च होतो ६ भूतदया चांगली खरी, पण तीमध्येही हा उच्च, हा नीच असा भाव निर्माण झाला तर मग त्याही उपायाची वाताहत होते ७ म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एका भक्तीशिवाय इतर मार्गांनी जाण्यात विधिनिषेधाचे ओझे फार मोठे आहे ८ विवरण - यज्ञयाग, जपतपादी साधने, तीर्थयात्रा, कर्मकांड, तपश्चर्या, योगादि निष्ठा यासारख्या मार्गापेक्षा भक्ती फार सोपी, अशी ग्वाही भगवद्गीतेने दिली तिचाच पाठपुरावा साधुसंत नेहमी करीत असतात भोळया- भाबड्या भाविकांना खडतर साधने व क्लेशकारक उपाय जमण्यासारखे नसल्यामुळे त्यांना हरिभक्ती हाच एक सहज व सोपा असा उपाय असतो 'नामसंकीर्तन साधन पै सोपें । जळतील पापें जन्मांतरें' असे तुकारामबुवांनी म्हटल आहे 'जरी तुज व्हावा देव । तरि हा सुलभ उपाय', 'भावाचि कारण भावाची कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें' यासारख्या वचनातून भक्तीची सुलभता तुकाराम महाराजांनी वर्णन केली आहे ७३२ सोडिला ससार । माया तयावरि फार ॥ १ ॥ धावत चाले मागें मागें । सुखदु ख साहे अगें ॥ २ ॥ तु गाथा ४६

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 397, कुल 611 में से · BharatKosha