भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 398, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 398

३६२ सार्थ तुकारामगाथा याने घ्यावे नाम । तीसीकरणें त्याचें काम ॥ ३ ॥ तुका म्हणे भोळी । विठ्ठलकृपेची कोवळी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साहे-सहन करतो, अगें-स्वत अर्थ - ज्याने या श्रीहरीच्या प्राप्तीसाठी संसाराचा लोभ सोडला, त्याच्यावर देवाची फार मोठी माया असते १ अशा भक्ताचे काम देव त्याच्यामागे धावत जाऊन करीत असतो त्याचे सुखदु ख तो स्वतः होऊन सहन करीत असतो २ या भक्ताने ईश्वराचे नाव घ्यावे व ईश्वराने त्याची सर्व कामे करावीत असे नाते मग निर्माण होत असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही विठ्ठल माउली मोठी कृपाळू असून मनाची मोठी भोळी पण कोवळी आहे ४ ७३३ बैसो खेळूं जेवू । तेथें नाम तुझें गाऊ ॥ १ ॥ रामकृष्णनाममाळा । घालू ओवुनियां गळा ॥ २ ॥ विश्वास हा धरू । नाम बळकट करू ॥ ३ ॥ तुका म्हणे आता । आम्हा जीवन शरणागता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - शरणागतां-शरण आलेल्यांना अर्थ - बसत असताना, खेळत असताना, जेवण करीत असताना, प्रत्येक हालचालीत देवा, तुझे नाम आम्ही घेत राहू १ रामकृष्ण या नामाची माळ ओवून आम्ही आमच्या गळ्यात धारण करू २ याच नामाचा विश्वास धरून नामस्मरणाच्या भक्कम मार्गाने आम्ही जाऊ ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा शरण आले- ल्यांना या विठ्ठलाचे नाव हेच एक जीवन आहे ४ ७३४ पाठीं पोटीं देव । कैंचा हरिसा भेव ॥ १ ॥ करा आनंदें कीर्तन । नका आशंकितमन ॥ २ ॥ एथें कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥ ३ ॥ तुका म्हणे धनी । सपुरता काय वाणी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भेव-भय, आशंकित-संशयित, सपुरता-पूर्णत्व, वाणी-कमतरता अर्थ - हा देव मागे, पुढे, आत, बाहेर सर्वत्र वसलेला असल्यामुळे हरिदासांना भय कसले आहे ? १ आनंदाने तुम्ही कीर्तन करून त्या प्रभूचे गुणगान करावे मन कधीच संशयित असे ठेवू नका २ या देवापाशी प्रत्यक्ष काळाचेही बळ काही करू शकणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा धनी जर प्रसन्न झाला तर मग पूर्णत्वास काय कमतरता आहे ? ४ ७३५ मनोमय पूजा । हेचि पढीयेँ¹ केशीराजा ॥ १ ॥ घेतो कल्पनेचा भोग । न मानेती बाह्य रग ॥ २ ॥ अंतरींचें जाणे । आदिवर्तमान खुणे ॥ ३ ॥ तुका म्हणे कुडें । कोठें सरे त्याच्या पुढें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पडीयें-आवडती, कुडें-खोटा अर्थ - मनातील शुद्ध भावाने होणारी पूजा त्या श्रीहरीला फारच आवडते १ त्याच्या विषयी मनात ज्या विविध भावाच्या कल्पना असतात, त्याच्या भोगातच तो सुखावतो मग त्याला बाह्य रंगाचा थाटमाट नको असतो २ हा देव मागचे, चालू व पुढचे काळात जे जे मनात असेल ते जाणतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, खोटा भाव त्यापुढे कसा टिकून राहील ? ४ १ पडीये